तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येनंतर अली बाबा: दास्तान ए काबुल मालिकेच्या सेटवरील फोटो समोर, निर्मात्यांनी घेतला हा निर्णय

पुढील काही दिवस शीजान खान याला कोठडीमध्येच राहवे लागणार आहे. शीजान खान याची चाैकशी पोलिस अजूनही करत आहेत.

तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येनंतर अली बाबा: दास्तान ए काबुल मालिकेच्या सेटवरील फोटो समोर, निर्मात्यांनी घेतला हा निर्णय
Follow us
| Updated on: Jan 13, 2023 | 6:16 PM

मुंबई : टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मा (Tunisha Sharma) हिने अली बाबा: दास्तान ए काबुल मालिकेच्या सेटवर आत्महत्या केली. तुनिशा आणि शीजान खान यांचे ब्रेकअप झाल्यामुळे ती तणावामध्ये होती. तुनिशा हिने मालिकेच्या सेटवर आत्महत्या केल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. इतकेच नाहीतर यानंतर सेटवर एक भीतीचे वातावरण निर्माण झाले. आता मालिकेच्या निर्मात्यांनी नव्या जोमाने मालिकेच्या शूटिंगला (Shooting) परत एकदा सुरूवात केलीये. शीजान खान याचा जामीन अर्ज न्यायालयाने आजच फेटाळला आहे. पुढील काही दिवस शीजान खान याला कोठडीमध्येच राहवे लागणार आहे. शीजान खान याची चाैकशी पोलिस अजूनही करत आहेत.

नुकताच अली बाबा: दास्तान ए काबुल मालिकेच्या सेटवरील काही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये मालिकेच्या सेटवर पूजा केल्याचे दिसत आहे. कारण तुनिशाच्या आत्महत्येनंतर मालिकेतील इतर कलाकारांमध्ये भीतीचे वातावरण होते.

शीजान खान याच्यासाठी मालिकेचे दरवाजे आता बंद करण्यात आले आहेत. शीजान खान ऐवजी आता मालिकेमध्ये अभिषेक निगम हा दिसणार आहे. तुनिशा शर्मा हिने २४ डिसेंबरला शीजान खान याच्या मेकअप रूममध्ये गळफास घेतला होता.

तुनिशाच्या आत्महत्येनंतर एक चर्चा अशी होती की, अली बाबा: दास्तान ए काबुल मालिका काही दिवसांसाठी ऑफ एअर होईल. मात्र, निर्मात्यांनी काही महत्वाचे निर्णय घेत मालिका ऑन एअर ठेवण्याचा निर्णय घेतलाय.

शीजान खान ऐवजी मालिकेमध्ये अभिषेक निगम हा मुख्य भूमिकेत असणार असल्याचे निर्मात्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. परंतू तुनिशा शर्मा ऐवजी मालिकेमध्ये नेमकी कोणती अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहे, हे अजून कळू शकले नाहीये.

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.