Aggabai Sunbai | नव्या बबड्याचे नवे नखरे, पुन्हा एकदा शुभ्रा आणेल का सोहमला वठणीवर?

जुनी शुभ्रा आणि जुन्या बबड्या बदलल्यामुळे काहीसा हिरमोड झालेले प्रेक्षक पुन्हा एकदा नव्या बबड्याच्या कारनाम्यांमुळे या मालिकेकडे वळले आहेत.

Aggabai Sunbai | नव्या बबड्याचे नवे नखरे, पुन्हा एकदा शुभ्रा आणेल का सोहमला वठणीवर?
अग्गबाई सुनबाई
Follow us
| Updated on: Apr 01, 2021 | 11:15 AM

मुंबई : मालिका विश्वात सध्या नव्याने सुरु झालेल्या ‘अग्गबाई सुनबाई’ (Aggabai Sunbai) या मालिकेची विशेष चर्चा सुरु आहे. जुनी शुभ्रा आणि जुन्या बबड्या बदलल्यामुळे काहीसा हिरमोड झालेले प्रेक्षक पुन्हा एकदा नव्या बबड्याच्या कारनाम्यांमुळे या मालिकेकडे वळले आहेत. नवा बबड्या अर्थात अभिनेता अद्वैत दादरकर (Adwait Dadarkar) मालिकेत ‘सोहम’ साकारत असून, तिरसट व्यक्तिरेखा त्याने चपखल साकारली आहे. घरी बायको असतानाही बाहेर लफडी करणारा सोहम अर्थात त्याचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे (Aggabai Sunbai zee marathi Serial Update Soham playing holi with suzan shubhra get jealous).

सध्या मालिकांमध्ये होळीचा माहोल कायम आहे. जरी होळी उलटून गेली असली तरी मालिकांमध्ये अद्याप होळी फिव्हर ओसरलेला नाही. याच ट्रॅकवर सुरु असलेल्या ‘अग्गबाई सुनबाई’मध्ये नवी शुभ्रा या सोहमला वठणीवर आणू शकेल का?, हा प्रश्न रसिकांच्या मनात उपस्थित झाला आहे.

कसा आहे नवा ‘बबड्या’?

‘अग्गबाई सासूबाई’ या मालिकेत अभिनेता आशुतोष पत्की ‘बबड्या’ अर्थात ‘सोहम कुलकर्णी’ हे पात्र सकारात होता. मात्र, आताच्या नव्या मालिकेत म्हणजे ‘अग्गबाई सासूबाई’च्या सिक्वेलमध्ये ‘सौमित्र’ म्हणून गाजलेला अभिनेता अद्वैत दादरकर हा ‘सोहम कुलकर्णी’ साकारत आहे. अद्वैत साकारत असलेला ‘सोहम’ हा जुन्या ‘सोहम’ प्रमाणे तिरसट आणि हेकेखोर आहे. पण, तो घाबरट मुळीच नाही. बेधडकपाने चुकीची कामे करणारी व्यक्तीरेखा असून, यात काहीशी नकारात्मक छटा देखील आहे. ‘शुभ्रा’, ‘अभिजित राजे’, ‘आसावरी’, ‘आजोबा’ आणि चिमुकला ‘बबडू’ असं सुखी कुटुंब असतानाही तो सुझॅन नावाच्या एका मुलीच्या प्रेमात पडला आहे.

या मुलीला त्याने आपली सेक्रेटरी म्हणून कामावर ठेवून घेतले आहे. इतकेच नाही तर, एरव्ही आई आणि बायकोसमोर, शांत आणि सुस्वभावी दिसणारा हा सोहम त्यांची पाठ फिरताच एका नव्या अवतारात प्रकट होतो. या अवतारातच तो सगळी गैरकृत्य करतो (Aggabai Sunbai zee marathi Serial Update Soham playing holi with suzan shubhra get jealous).

नवी शुभ्रा आणू शकेल का त्याला वठणीवर?

बायकोने घरात राहावं, अशी अपेक्षा बाळगणारा हा नवरा मात्र स्वतः स्वैराचार करत आहे. तेव्हा आता जुन्या शुभ्राने जसं तिच्या नवऱ्याला वठणीवर आणलं तसं ही शुभ्रा देखील या बबड्याला वठणीवर आणेल का?, असा प्रश्न रसिक प्रेक्षकांना पडला आहे. अर्थात ही मालिका नुकतीच सुरु झाली आहे आणि प्रेक्षकांना पुढे काय पाहायला मिळणार, हे हळूहळू उलगडत जाणार आहे.

होळीच्या कार्यक्रमात नवऱ्याला दुसऱ्या मुलीबरोबर डान्स करतना पाहून चिडलेल्या शुभ्राने मोठ्या हुशारीने आता आपली जागा पुन्हा मिळवली आहे. मात्र, जेव्हा सत्य तिच्या समोर येईल, तेव्हा ती काय करेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

(Aggabai Sunbai zee marathi Serial Update Soham playing holi with suzan shubhra get jealous)

हेही वाचा :

उमेश कामत-प्रिया बापट यांची कोरोनावर मात, लवकरच चित्रीकरणावर परतणार!

Aai Majhi Kalubai | वीणाची एक्झिट, ‘या’ अभिनेत्रीची ‘आर्या’ म्हणून एंट्री! सोशल मीडियावर शेअर केला खास लूक

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.