AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लेकीचा शाळेतला अनुभव ऐकून अली असगरला अश्रू अनावर; पहा Video

यानंतर या शोची परीक्षक माधुरी दीक्षितनेदेखील अली असगरचं कौतुक केलं. अली असगरने 1987 मध्ये 'एक दो तीन चार' या मालिकेतून टीव्हीवर पदार्पण केलं.

लेकीचा शाळेतला अनुभव ऐकून अली असगरला अश्रू अनावर; पहा Video
अली असगरच्या मुलीने सांगितला शाळेतला कटू अनुभव Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Sep 17, 2022 | 4:29 PM
Share

‘द कपिल शर्मा शो’ या कॉमेडी शोमधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा कॉमेडियन अली असगर (Ali Asgar) सध्या ‘झलक दिखला जा 10’मध्ये (Jhalak Dikhhla Jaa 10) नाचताना दिसत आहे. आपण केवळ अभिनयातच नाही तर डान्समध्येही उत्कृष्ट आहोत, हे तो या कार्यक्रमातून सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय. नुकताच या शोच्या पुढच्या भागाचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. यामध्ये अली असगर त्याच्या मुलीचा व्हिडीओ पाहून भावूक झाला.

शोदरम्यान अली असगरला त्याच्या मुलाचा आणि मुलीचा व्हिडिओ दाखवण्यात आला. या व्हिडिओमध्ये अलीच्या मुलीने सांगितलं की तिला तिचे वडील कॉमेडियन आहेत म्हणून शाळेत चिडवलं जातं. “चिडवणाऱ्या त्या लोकांना माहीत नाही की ते स्वतःचीच चेष्टा करत आहेत, कारण माझे वडील इतरांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचं काम करतात,” असं ती पुढे म्हणते. आपल्या मुलीचे हे शब्द ऐकून अली असगरचे डोळे पाणावतात.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

यानंतर या शोची परीक्षक माधुरी दीक्षितनेदेखील अली असगरचं कौतुक केलं. अली असगरने 1987 मध्ये ‘एक दो तीन चार’ या मालिकेतून टीव्हीवर पदार्पण केलं. यानंतर त्याने इतिहास, कहानी घर घर की, कुटूंब, कॉमेडी सर्कस, एफआयआर, जिनी और जुजू, कानपूर वाले खुराना आणि अकबर का बल बिरबल यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं.

अली असगरने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 1991 मध्ये आलेल्या ‘शिकारी’ चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर त्याने जान तेरे नाम, चमत्कार, खलनायक, जोरू का गुलाम, जोश, हम किसी से कम नहीं, ऐतबार, शादी नंबर 1, पार्टनर, संडे, जुडवा 2, पागलपंती आणि अमावस यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. आता झलक दिखला जा या डान्सिंग शोमध्येही तो प्रतिस्पर्ध्यांना जोरदार टक्कर देत आहे.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.