Anita Date: जो आवडतो सर्वांना.. अनिता दातेच्या फोटोला हार पाहून नेटकरी पेचात, सेलिब्रिटींनीही विचारला प्रश्न

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jul 07, 2022 | 4:38 PM

जो आवडतो सर्वांना.. असं कॅप्शन देत अनिताने स्वत:चीच फोटो फ्रेम पोस्ट केली आहे. मात्र या फोटो फ्रेमला हार घातल्याने चाहते पेचात पडले आहेत. ही नेमकी काय भानगड आहे, असा प्रश्न चाहते विचारत आहेत.

Anita Date: जो आवडतो सर्वांना.. अनिता दातेच्या फोटोला हार पाहून नेटकरी पेचात, सेलिब्रिटींनीही विचारला प्रश्न
Anita Date
Image Credit source: Instagram

‘माझ्या नवऱ्याची बायको’ (Mazhya Navryachi Bayko) ही मालिका प्रचंड गाजली. या मालिकेती पात्रं आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. गुरुनाथ, राधिका, शनाया या पात्रांच्या भूमिका साकारणारे कलाकार घराघरात लोकप्रिय झाले. ही मालिका बऱ्याच महिन्यांपूर्वी बंद झाली असून त्यातील कलाकार इतर प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र झाले. गुरुनाथची भूमिका साकारणारा अभिनेता अभिजीत खांडकेकर सध्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत काम करतोय. तर शनायाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रसिका सुनील तिच्या खासगी आयुष्यात व्यस्त आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राधिकाची (Radhika) भूमिका साकारणारी अभिनेत्री अनिता दाते (Anita Date) मात्र कुठेच दिसली नाही. अनिता पुन्हा कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची उत्सुकता चाहत्यांना असतानाच नुकताच तिने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो आणि त्यावरील कॅप्शन पाहून चाहते पेचात पडले आहेत.

जो आवडतो सर्वांना.. असं कॅप्शन देत अनिताने स्वत:चीच फोटो फ्रेम पोस्ट केली आहे. मात्र या फोटो फ्रेमला हार घातल्याने चाहते पेचात पडले आहेत. ही नेमकी काय भानगड आहे, असा प्रश्न चाहते विचारत आहेत. अनिताच्या कॅप्शनमुळे हे कोडं आणखीनच वाढलं आहे. तिच्या या पोस्टवर फक्त नेटकऱ्यांनीच नाही तर सेलिब्रिटींनीही कमेंट्स केल्या आहेत.

अनिता दातेची पोस्ट-

 

हे सुद्धा वाचा

View this post on Instagram

 

A post shared by Anita Date-Kelkar (@anitadate_kelkar)

काय हे, असा सवाल अभिनेत्री श्रुती मराठेनं केला. पर्ण पेठेनं अनिता असं लिहित आश्चर्यचकित झाल्याचा इमोजी पोस्ट केला आहे. तर सागर कारंडेनं मात्र खूप छान असं लिहिलंय. त्यामुळे कदाचित अनिताच्या आगामी मालिकेचं हे अजब प्रमोशन असावं, असा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला आहे. निपुण धर्माधिकारी यानेसुद्धा ‘हा हा हा’ असं कमेंट्समध्ये लिहिलंय. अनिताने तिच्या या फोटोमागचं कोडं अजून उलगडलं नसून लवकरच ती याबद्दल काहीतरी खुलासा करेल, अशी आशा प्रेक्षकांना आहे.


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI