AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 16 | अर्चना गौतम आणि विकास मानकतला यांच्यामध्ये या कारणामुळे जोरदार भांडणे

तीन दिवसांनंतर परत सलमान खान हा अर्चना गाैतमला घरामध्ये घेतो.

Bigg Boss 16 | अर्चना गौतम आणि विकास मानकतला यांच्यामध्ये या कारणामुळे जोरदार भांडणे
| Updated on: Dec 27, 2022 | 3:38 PM
Share

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बिग बाॅसच्या घरामधील वादग्रस्त स्पर्धेक म्हणून अर्चना गाैतम हिचे नाव पुढे येतंय. विषय नसताना देखील अर्चना ही अनेकदा घरातील इतर सदस्यांना भांडताना दिसते. शिव ठाकरे आणि अर्चना गाैतम यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वी भांडणे सुरू असताना भांडणामध्ये अर्चना थेट शिव ठाकरेचा गळा पकडते. त्यानंतर घरातील इतर सदस्य हे भांडणे मिटवतात. मात्र, यानंतर बिग बाॅस अर्चनाला घराबाहेर काढतात. तीन दिवसांनंतर परत सलमान खान हा अर्चना गाैतमला घरामध्ये घेतो.

भांडणामध्ये शिव ठाकरेचा गळा पकडल्यामुळे एकदा बिग बाॅसच्या घराबाहेर पडलेल्या अर्चनाने परत एकदा जोरदार भांडणे केली आहेत. मात्र, यावेळी अर्चनाच्या निशाण्यावर शिव ठाकरे नसून विकास मानकतला आहे.

विकास मानकतला याने बिग बाॅसच्या घरामध्ये वाइल्डकार्ड म्हणून प्रवेश केला. विकास याने घरामध्ये आल्यापासूनच अर्चना गाैतम हिच्यासोबत पंगा घेण्यास सुरूवात केली होती.

इतकेच नाहीतर पहिल्याच दिवशी विकासने अर्चनाचा आवाज काढून तिची नक्कल केली होती. आतातर किचनमध्ये या दोघांमध्ये मोठे भांडण झाले आहे. अर्चना किचनमध्ये जेवण तयार करत होती.

विकास किचनमध्ये जातो आणि चहा करण्यासाठी पाणी ठेवतो. यावर अर्चना म्हणते की, इथे चहा नको करू मी जेवण तयार करत आहे. यावेळी दोघांमध्ये वाद होतो आणि दोघे भांडण करतात. यांच्या भांडणामध्ये अर्चना गॅसवरील गरम पाणी फेकते.

आता अर्चना आणि विकास यांच्या भांडणाचा हाच प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या भांडमामध्ये नेमकी चुक कोणाची हे आजच्या एपिसोडमध्ये कळेल. मात्र, एकदा बिग बाॅसच्या घराबाहेर पडूनही अर्चना सुधारली नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान