AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 19 Eviction : ‘बिग बॉस’ मधून या स्पर्धकाचा पत्ता कट, नाव ऐकूनच..

Bigg Boss 19 Eviction: 'बिग बॉस 19' हा शो सध्या एकदम रंजक वळणावर असून त्या घरात रोज काही ना काही ड्रामे घडतच असतात. पण वीकेंड येताच एव्हिक्शनचे वारे घोंगावू लागतात. या आठवड्यात जो स्पर्धक घराबाहेर जाणार, त्याचं नाव समोर आलं आहे. ते ऐकूनच..

Bigg Boss 19 Eviction : ‘बिग बॉस’ मधून या स्पर्धकाचा पत्ता कट, नाव ऐकूनच..
बिग बॉस 19
| Updated on: Sep 27, 2025 | 12:05 PM
Share

Bigg Boss 19 Eviction : छोट्या पडद्यावरील बहुचर्चित रिॲलिटी शो असलेला ‘बिग बॉस 19’ सीझन सुरू होऊन एक महिन्यापेक्षा अधिक काळ झाला आहे. एवढ्या काळातच या शोमध्ये बरंच काही घडलं असून रोज नवनवे ड्रामे सुरू असतातच. गेल्या चार आठवड्यांपासून अनेक स्पर्धक गाजत आहेत, तर इतके दिवस जे शांत होतं, तेही आता चांगलेच ॲक्टिव्ह झालेले दिसत आहे, त्यांचा गेम दिसायला लागला आहे. दबंग स्टार सलमान खान हा शो होस्ट करत असून आत्तापर्यंत या शोमधून दोन स्पर्धक घराबाहेर पडले आहे, त्यामध्ये नतालिया आणि नगमाच्या नावाचा समावेश आहे. तर गेल्या आठवड्यात नेहल ही देखील शो मधून बाहेर गेली होती, पण ‘बिग बॉस’ने नेहमीप्रमाणेच गेम खेळत तिला सीक्रेट रूममध्ये पाठवलं आहे.

वीकेंड येताच बिग बॉसमध्ये एव्हिक्शनचे वारे वाहू लागतात, आता यावेळेस या शोमधून जो स्पर्धक बाहेर जाणार आहे, त्याचं नाव समोर आलं आहे.

हे स्पर्धक झाले होते नॉमिनेट

काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस 19’ मध्ये एक नॉमिनेशन टास्क होता, ज्यामध्ये प्रणित मोरेची टीम हरली. त्यानंतर, त्याची संपूर्ण टीम नॉमिनेट झाली. ज्यात प्रणित मोरे, मृदुल तिवारी, गौरव खन्ना, अवेज दरबार, अशनूर कौर आणि नीलम गिरी यांचा समावेश होता. आता, या स्पर्धकांपैकी एक हा, येत्या या वीकेंड का वारमधून घराबाहेर जाणार आहे.

कोणता स्पर्धक झाला आऊट ?

यापूर्वी अशी बातमी समोर आली होती की फरहाना भट्ट ‘बिग बॉस 19’ मधून बाहेर पडली आहे. मात्र, “बिग बॉस” बद्दल , सर्व छोट्या मोठ्या बातम्या देणाऱ्या एका पेजनुसार,  अवेज दरबार या आठवड्यात शोमधून बाहेर पडेल. पब्लिक व्होटिंगच्या आधारे बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वीकेंड का वार मध्ये येणार गौहर खान

या वीकेंड का वार एपिसोडमध्ये गौहर खान सलमान खानसोबत सेटवर दिसणार आहे. खरं तर, गौहर अवेजला पाठिंबा देण्यासाठी शोमध्ये येणार आहे. तसेच ती अनेक स्पर्धकांची प्रशंसा करेल आणि काहींना फटकारेल सुद्धा. मात्र. या आठवड्यात अवेजच्या खेळात लक्षणीय सुधारणा दिसून आली आहे. आता तो खरोखरच बाहेर पडेल की बिग बॉस त्याला नेहलप्रमाणे सीक्रेट रूममध्ये पाठवेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Follow Us
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...
राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार? पुण्यातील गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार? पुण्यातील गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?.
NEET परीक्षेबाबत मोठा निर्णय! परीक्षेसाठी 15 मिनिटे अतिरिक्त वेळ......
NEET परीक्षेबाबत मोठा निर्णय! परीक्षेसाठी 15 मिनिटे अतिरिक्त वेळ.......
भारतात पेट्रोल-डिझेल दरात विक्रमी वाढ, मुंबई, पुणे, नागपूर, अमरावीतील
भारतात पेट्रोल-डिझेल दरात विक्रमी वाढ, मुंबई, पुणे, नागपूर, अमरावीतील.
देशवासियांना सकाळ सकाळीच महागाईचा धक्का; नवी दिल्लीत पेट्रोल-डिझेल....
देशवासियांना सकाळ सकाळीच महागाईचा धक्का; नवी दिल्लीत पेट्रोल-डिझेल.....
खरात आधीच गुवाहाटीतील हॉटेलमध्ये... रुपाली चाकणकरांनी स्वतःच सांगितलं
खरात आधीच गुवाहाटीतील हॉटेलमध्ये... रुपाली चाकणकरांनी स्वतःच सांगितलं.
पुणे हादरलं! हॉस्पिटल उडवण्याचा कट; बाथरूममध्ये टाईम बॉम्ब ठेवणारा....
पुणे हादरलं! हॉस्पिटल उडवण्याचा कट; बाथरूममध्ये टाईम बॉम्ब ठेवणारा.....
मोठी बातमी! आता 'नीट' परीक्षा होणार... नवी तारीख जाहीर....
मोठी बातमी! आता 'नीट' परीक्षा होणार... नवी तारीख जाहीर.....