AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तारक मेहता का उल्टा चष्माच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, दयाबेन, मेहता साहब यापैकी एकाची होणार एन्ट्री?

नुकताच तारक मेहता का उल्टा चष्माचा नवा प्रोमो रिलीज झाला आहे. जेठालालला अमेरिकेला जाण्याची संधी मिळाल्याचे दाखवण्यात आले आहे. दयाबेन गेल्या काही वर्षांपासून तारक मेहता का उल्टा चष्मापासून दूर आहे. मात्र, प्रेक्षक दयाबेनला मिस करत आहेत.

तारक मेहता का उल्टा चष्माच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, दयाबेन, मेहता साहब यापैकी एकाची होणार एन्ट्री?
Image Credit source: sonyliv.com
| Edited By: | Updated on: Aug 25, 2022 | 11:55 AM
Share

मुंबई : घरातील प्रत्येक सदस्याला तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta ka Ooltah Chashmah) ही मालिका बघायला प्रचंड आवडते. गेल्या अनेक वर्षांपासून तारक मेहता का उल्टा चष्मा सर्वांचे मनोरंजन करताना दिसते आहे. या मालिकेमधील प्रसिध्द कॅरेक्टर जेठालाल सर्वांनाच आवडते. मालिकेमध्ये जेठालालच्या आयुष्यामध्ये (Life) अनेक संकटे नेहमीच येतात. जेठालालच्या आयुष्यात एक संकट संपत नाही की तोवर दुसरे येते. परंतु आता जेठालालसाठी एक आनंदाची बातमी आहे. जेठालालच्या आयुष्यात आनंद फार कमी राहतो. परंतू ही बातमी फक्त जेठालालसाठीच नाही तर प्रेक्षकांसाठी (Audience) देखील खूप आनंदाची आहे.

येणारा एपिसोड बघण्यासाठी चाहते आतुर

गेल्या अनेक दिवसांपासून तारक मेहता का उल्टा चष्माच्या टिमपासून चाहत्यांपर्यंत सर्वचजण दयाबेनची आतुरतेने वाट पाहात आहेत. टप्पू के पापा….टप्पू के पापा हे शब्द ऐकण्यासाठी चाहते गेल्या काही वर्षांपासून वाट पाहात आहेत. मात्र, येणाऱ्या एपिसोडमध्ये दयाबेन, मेहता साहब यापैकी कोणीतरी येण्याची शक्यता आहे. यामुळे येणाऱ्या एपिसोडचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, नेमके कोण शोमध्ये येते हे बघण्यासारखेच ठरणार आहे.

तारक मेहता का उल्टा चष्माचा नवा प्रोमो रिलीज

नुकताच तारक मेहता का उल्टा चष्माचा नवा प्रोमो रिलीज झाला आहे. जेठालालला अमेरिकेला जाण्याची संधी मिळाल्याचे दाखवण्यात आले आहे. दयाबेन गेल्या काही वर्षांपासून तारक मेहता का उल्टा चष्मापासून दूर आहे. मात्र, प्रेक्षक दयाबेनला मिस करत आहेत. तसेच मालिकेमधील अनेक कलाकार बदलण्यात आले आहेत. मात्र, प्रेक्षकांना दयाबेनच्या आगमनाची आतुरता आहे. दयाबेनच्या आगमनाकडे गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांच्या नजरा लागल्या आहेत.

प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.