लेकीच्या समर्थनार्थ थेट आई आली मैदानात, ते वाक्य श्रीजिता डे हिच्या अंगलट येणार?

शितल मुंडे, Tv9 मराठी

|

Updated on: Jan 14, 2023 | 9:10 PM

फॅमिली विकमध्ये बिग बाॅसच्या घरात टीना दत्ता हिची आई गेली होती. मात्र, यावेळी टीना दत्ता हिच्या आईने श्रीजिता डे हिला बोलणे टाळले होते. आता हा वाद वाढत आहे.

लेकीच्या समर्थनार्थ थेट आई आली मैदानात, ते वाक्य श्रीजिता डे हिच्या अंगलट येणार?

मुंबई : बिग बाॅसच्या घरामधून श्रीजिता डे ही बेघर झालीये. बिग बाॅसच्या (Bigg Boss) घरात दुसऱ्यांदा दाखल झाल्याने श्रीजिता डे हिचे तेवर बदलले होते. श्रीजिता डे हिच्या निशाण्यावर तिची मैत्रिण टीना दत्ता ही होती. कारण बिग बाॅसच्या घरातून श्रीजिता डे बाहेर पडल्यानंतर तिच्यामागे अनेक गोष्टी टीना दत्ता (Tina Dutta) हिने वादग्रस्त बोलल्या होत्या. मग श्रीजिता डे हिने देखील बिग बाॅसच्या घरात परत येत टीना दत्ता हिला टार्गेट करण्यास सुरूवात केली. साैंदर्या शर्मा हिला बोलताना श्रीजिता डे म्हणाली होती की, टीना दत्ता हिने आतापर्यंत अनेक लोकांचे घर तोडले असून ही फार खतरनाक आहे. टीना दत्ता आणि श्रीजिता डे या खूप वर्षांपासूनच्या मैत्रिणी आहेत.

फॅमिली विकमध्ये बिग बाॅसच्या घरात टीना दत्ता हिची आई गेली होती. मात्र, यावेळी टीना दत्ता हिच्या आईने श्रीजिता डे हिला बोलणे टाळले होते. मात्र, नुकताच श्रीजिता डे ही बिग बाॅसच्या घराबाहेर पडल्यानंतर आता टीना दत्ता हिच्या आईने मोठे विधान केले आहे.

एका मुलाखतीमध्ये बोलताना टीना दत्ता हिची आई म्हणाली, बिग बाॅसच्या घरात असताना श्रीजिता डे हिने टीना दत्ता हिच्याबद्दल काही चुकीच्या गोष्टी बोलल्या आहेत. ज्यामुळे तिचे वडील देखील खूप रागावले आहेत. मला यासर्व गोष्टी बिग बाॅसच्या घरात बोलायच्या नव्हता.

आता श्रीजिता डे ही बाहेर आलीये. मला तिला पर्सनली विचारायचे आहे की, टीना दत्ता हिने नेमके कोणाचे घर तोडले आहेत. याचे पुरावे हवे मला दे. जर तिने खूप लोकांची घरे तोडली आहे तर चार ते पाच जण तरी तू समोर घेऊन ये किंवा पुरावे दे.

जोपर्यंत श्रीजिता डे या गोष्टीचे पुरावे देणार नाही, तोपर्यंत तिने केलेले आरोप खरे कसे ठरू शकतात. इतकेच नाहीतर टीना दत्ता हिची आई म्हणाली की, एक बंगाली असून दुसऱ्या बंगालीची श्रीजिता बदनामी करत आहे.

आता टीना दत्ता हिच्या आईला खरोखरच श्रीजिता डे काही पुरावे देणार का? हे पाहण्यासारखे ठरणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून टीना आणि श्रीजिता डे या चांगल्या मैत्रिणी आहेत. मात्र, बिग बाॅसच्या घरात दाखल होताच, यांच्यामध्ये वाद होण्यास सुरूवात झाली.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI