Bigg Boss Marathi 3 | ‘मैत्रीची व्याख्या यांना माहितच नसावी…’, मीरा-उत्कर्षच्या ‘त्या’ videoवर रंगली चर्चा!

‘बिग बॉस मराठी’चं तिसरं पर्व (Bigg Boss Marathi Season 3) सध्या खूप गाजतं आहे. या पर्वात अनेक राडे, भांडण आणि मैत्रीचे नवे बंध पाहायला मिळाले. मात्र, आता या घरातील नात्यांना काही वेगळीच वळणं मिळायला लागली आहेत. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे.

Bigg Boss Marathi 3 | ‘मैत्रीची व्याख्या यांना माहितच नसावी...’, मीरा-उत्कर्षच्या ‘त्या’ videoवर रंगली चर्चा!
Utkarsh-Meera

मुंबई : ‘बिग बॉस मराठी’चं तिसरं पर्व (Bigg Boss Marathi Season 3) सध्या खूप गाजतं आहे. या पर्वात अनेक राडे, भांडण आणि मैत्रीचे नवे बंध पाहायला मिळाले. मात्र, आता या घरातील नात्यांना काही वेगळीच वळणं मिळायला लागली आहेत. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे. यात उत्कर्ष शिंदे, मीरा जगन्नाथचे हात दाबताना दिसत आहे. यावरून आता चर्चा रंगली आहे.

या व्हिडीओत एकीकडे उत्कर्ष मीराचे हात दाबताना दिसत आहे, तर दुसरीकडे विकास आणि सोनाली यांच्यात त्यांच्यावरून चर्चा सुरु आहे. दोघांमध्ये काहीतरी शिजतंय अशी चर्चा विकास आणि सोनालीमध्ये रंगली होती. यावर आता मीराच्या अधिकृत इंस्टा पेजवरून एक पोस्ट करण्यात आली आहे.

पाहा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by 〽️ira Jagannath (@mirajagga)

काय आहे ‘ही’ पोस्ट?

‘आपल्या मीराच्या हाताला लागलं आहे, ह्याचा तिने issue केला नाही ते बहुतेक तिचं चुकलं कारण उत्कर्ष तिचा हात दाबून देत होता फक्त ह्या एकच विडिओच आता भांडवल केलं जातं आहे. ह्याला विकसित बुध्दी म्हणावं की अविकसित?मैत्री काय असते ही व्याख्याच मुळात यांना माहित नसावी. काय वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ पाहून?’, असं या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे. या पोस्टमध्ये हा चर्चित व्हिडीओ देखील आहे.

काय म्हणाले चाहते?

या व्हिडीओ आणि पोस्टवर प्रतिक्रिया देताना काही प्रेक्षकांनी मीरालाच उलट बोल सुनावले आहेत, तर काहींनी मीराची बाजू घेत विशाल आणि सोनालीला खरी-खोटी सुनावली आहे. एका चाहत्याने लिहिले की, ‘जेव्हा ती घरात फेक love story म्हणून. चिढवत होती विशाल आणि सोनाली ला तेव्हा काय होते मग …तेव्हा कुठली बुध्दी होती विकसित की अविकसित ….’, तर आणखी एका प्रेक्षकाने लिहिले की, ‘विकास मुलीची आजिबात रिस्पेक्ट करत नाही. पहिले हयांनी विशाल सोनालीमध्ये काड्या लावून सोनालीच कॅरक्टरची वाट लावली त्यामध्ये त्याने विशालला व्हिलन दाखवल आणि स्वतःला हिरो करण्याचा प्रयत्न केला. नंतर गायत्री आणि जयमध्ये हात चेपण्याचा चुकीचा अर्थ लोकांसमोर उभा करण्याचा प्रयत्न केला. आणि आता मीरा च चरित्र खराब करण्याचा प्रयत्न करत आहे. Game साठी तो कोणत्याही लेव्हल ला जात आहे @maheshmanjrekar इथे तुमची मुलगी असती तर काय केले असते. आणि ह्या मध्ये सोनाली पण साथ देत आहे त्याचा. खूपच चुकीचं आहे हे..’

तर, मीरा आणि उत्कर्षच्या एका चाहत्याने म्हटले की, ‘चोराच्या मनात चांदण.. एवढं घाण कस बोलू शकतात हे सोनाली न विकास…सोनालीची मैत्री ती मैत्री आणि दुसऱ्यांचं प्रेम का ?? सोनालीने तर विशालच्या मागे मागे करून त्याला शेवटी सगळ्यांसमोर बोलायला भाग पाडलं…@maheshmanjrekar एखाद्याला गेम साठी एवढं बदनाम नका करू..उत्कर्ष शिंदेच खूप वेगळं नाव आहे तो गरिबांसाठी खूप काही केलाय..तो ऍक्टर नाही आहे..गेम खेळा पण कोणाबद्दल वाईट नका बोलू…सोनालीनी तरी हे बोलू नये..तुमचे एवढे घाण विचार असतील तर मग सर्वसामान्य जनता चांगली की…तुमच्यासारखी सेलिब्रिटी लाईफ न जगता पण एवढा घाण विचार नाहीत करत…’ यावरूनचा आता चाहते देखील दोन गटांत विभाजित होऊन आपल्या आवडत्या कलाकारांना पाठींबा देताना दिसत आहे.

हेही वाचा :

Jacqueline Fernandes | मनी लाँड्रिंग प्रकरण : जॅकलिन फर्नांडिसला भारत सोडण्यास बंदी, ईडीने जारी केली लुकआउट नोटीस

BanLipstick | प्राजक्ता माळी का म्हणाली मला लिपस्टिकचा रंग नकोय, मला लिपस्टिक आवडत नाही, बॅन लिपस्टिक


Published On - 11:37 am, Mon, 6 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI