Bigg Boss Marathi 3 | घरात वाईल्ड कार्ड एंट्री होताच वादाचा नवा अध्याय सुरु, जय-आदिश आपापसांत भिडले!

आदिश घरात प्रवेश करताच कॅप्टन झाला आहे. त्याच्याकडे विशेष अधिकार देण्यात आले आहेत. घरात येताच त्याने घरातील कामे सगळ्यांमध्ये वाटून दिली आहेत. यात त्याने जय, दादुस, मीनल यांना पाहरेकरी म्हणून निवडले आहे.

Bigg Boss Marathi 3 | घरात वाईल्ड कार्ड एंट्री होताच वादाचा नवा अध्याय सुरु, जय-आदिश आपापसांत भिडले!
Bigg Boss Marathi 3
Follow us
| Updated on: Oct 12, 2021 | 2:23 PM

मुंबई : ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वाची (Bigg Boss Marathi 3) जोरदार सुरुवात झाली आहे. आता घरातील स्पर्धक एकमेकांसोबत खऱ्याअर्थाने स्पर्धा करायला सुरुवात करत आहे. मराठी मनोरंजन विश्वातील 15 चर्चित नाव या घरात नांदत होती. विशाल निकम, उत्कर्ष शिंदे, संतोष चौधरी, विकास पाटील, अविष्कार दारव्हेकर, मीरा जगन्नाथ, मीनल शाह, तृप्ती देसाई, गायत्री दातार, स्नेहा वाघ, जय दुधाने, सुरेखा कुडची, शिवलीला पाटील, सोनाली पाटील, अक्षय वाघमारे यांनी यंदा घरात प्रवेश केला आहे. मात्र, आठवडाभारतच आता शिवलीला बाहेर पडली आहे. आजारी असल्याकारणाने तिने या शोमधून माघार घेतली होती.

मात्र, आता शिवलीलाची रिती जागा भरायला एक नवा वाईल्ड कार्ड पाहुणा ‘बिग बॉस मराठी 3’च्या घरात एण्ट्री झाली आहे. अर्थात उर्वरित 14 सदस्यांसाठी हे खास सरप्राईज ठरलं आहे. शनिवारच्या ‘बिग बॉस चावडी’ स्पेशल भागात तो या शोमध्ये त्याने घरात एण्ट्री केली आहे. हा स्पर्धक आहे अभिनेता आदिश वैद्य.

पहिल्याच दिवशी जोरदार वाद

आदिश घरात प्रवेश करताच कॅप्टन झाला आहे. त्याच्याकडे विशेष अधिकार देण्यात आले आहेत. घरात येताच त्याने घरातील कामे सगळ्यांमध्ये वाटून दिली आहेत. यात त्याने जय, दादुस, मीनल यांना पाहरेकरी म्हणून निवडले आहे. यांना तिघांना देखील रात्रभर दारावर उभे राहून पाहारा द्यायचा आहे. यावेळी आपलं काम सोडून बसलेला जय पाहून आदिशने त्याला नियम समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावर जयने त्याच्याशी वाद घालायला सुरुवात केली. हा वाद जोर पकडतच होता की घरातील इतर स्पर्धकांनी मध्ये पडत दोघांना शांत केले.

पाहा व्हिडीओ :

कोण आहे आदिश वैद्य?

आदिश वैद्य मराठी टीव्ही इंडस्ट्रीमधील खूप लोकप्रिय नाव आहेत. त्याने ‘रात्रीस खेळ चाले सीझन 1’, ‘कुंकू टिकली आणि टॅटू’, ‘जिंदगी नॉट आऊट’ सारख्या प्रसिद्ध शोमध्ये काम केले आहे. ‘सेक्स वेब ड्रग्स आणि थिएटर’ या मराठी वेब सीरिजमध्येही त्यांनी काम केले आहे. सध्या तो ‘गुम है किसी की प्यार मे’ या हिंदी मालिकेत दिसत होता. मात्र, नुकतीच त्याने ही मालिका सोडली आहे.

स्नेहाने सांगितली आपबिती

स्नेहा वाघ हिंदी टीव्हीची एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने इमॅजिन टीव्हीच्या शो ‘ज्योती’ मधून प्रेक्षकांवर छाप पाडली. या मालिकेत ती मुख्य भूमिकेत होती. यानंतर तिने ‘चंद्रगुप्त मौर्य’ या मालिकेत ‘मुरा’ची भूमिका साकारली आणि नंतर ती ‘वीरा’ या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसली होती. नुकतीच तिने ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आपली आपबिती सांगितली.

तो मला खूप मारायचा…

स्नेहाचे पहिले लग्न अविष्कर दारवेकर यांच्याशी झाले होते. त्यावेळी ती फक्त 19 वर्षांची होती. पहिल्या लग्नात तिला शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरे जावे लागले, असे स्नेहा सांगते. त्यानंतर तिने पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतला. यावेळी आपली आपबिती सांगताना स्नेहा म्हणाली की, ‘एक वेळ अशी होती की, मला घरी जायची देखील भीती वाटायची.. शूटवर जाताना देखील माझी अर्धी शुद्ध हरपलेली असायची. अशावेळी सेटवरचे लोक मला खूप सांभाळून घायायचे. अनेकदा शूट करतानासुद्धा मला मारहाण झालेल्या खुणा सर्वांना दिसायच्या…’

हेही वाचा :

Wrap UP | अक्षय कुमारने ‘रक्षाबंधन’चे शूटिंग केले पूर्ण, पुढील वर्षी ‘या’ तारखेला रिलीज होणार चित्रपट!

तिसरी घंटा पुन्हा वाजणार, नाट्यगृहे पुन्हा उघडण्याचा मुहूर्त ठरला, काय आहेत नियम?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.