AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवेंद्रजी 30-35 पुरणपोळ्या सहज पातेलंभर तूपासोबत खायचे, अमृता फडणवीसांची किचनमध्ये ‘कल्ला’कारी

आमच्या फ्रीजमधून मध्यरात्री पदार्थ गायब व्हायचे. त्यामुळे मी सीआयडी चौकशी लावली. मी त्यांची संगिनी आहे. फ्रीज बदलले आणि कुलूप किल्ल्यांचे फ्रीज आणले. फ्रीजच्या चाव्या मी माझ्याकडे ठेवते, असं अमृता फडणवीस यांनी आल्या-आल्या सांगितलं.

देवेंद्रजी 30-35 पुरणपोळ्या सहज पातेलंभर तूपासोबत खायचे, अमृता फडणवीसांची किचनमध्ये 'कल्ला'कारी
देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस
| Updated on: Feb 16, 2022 | 12:35 PM
Share

मुंबई : विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) गवय्येगिरीच्या क्षेत्रात मुशाफिरी केल्यानंतर खवय्येगिरी करताना दिसणार आहेत. झी मराठी वाहिनीवरील ‘किचन कल्लाकार’ (Kitchen Kallakar) या सुप्रसिद्ध कार्यक्रमात त्या झळकणार आहेत. देवेंद्र फडणवीसही यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत. यावेळी पत्नी सुगरण आहे की आई, असा कोड्यात टाकणारा प्रश्न सूत्रसंचालक संकर्षण कऱ्हाडेने विचारल्यामुळे भल्याभल्यांची फिरकी घेणारे फडणवीसही बुचकळ्यात पडले. एका बैठकीत देवेंद्रजी किती पुरणपोळ्या खाऊ शकतात? या प्रश्नावर ते 30-35 पुरणपोळ्या सहज पातेलंभर तूपासोबत खायचे, असं उत्तर अमृता फडणवीसांनी दिलं. तर लग्नानंतर तुमची अपूर्ण राहिलेली इच्छा कोणती, या प्रश्नावर त्यांना 30-35 पुरणपोळ्या खाताना पाहण्याची, त्याही मी न बनवलेल्या, असं उत्तर मिसेस फडणवीस यांनी दिलं.

फ्रीजच्या चाव्याही मिसेस फडणवीसांकडे

मा. देवेंद्र फडणवीस यांच्या ग्लॅमरस पत्नी, सजग आई, प्रेमळ सून, बँकर, निर्मात्या, गायिका, टेबल टेनिस चॅम्पियन, परफॉर्मर अशी अमृता यांची लांबलचक ओळख सूत्रसंचालक संकर्षण कऱ्हाडेने करुन दिली. आमच्या फ्रीजमधून मध्यरात्री पदार्थ गायब व्हायचे. त्यामुळे मी सीआयडी चौकशी लावली. मी त्यांची संगिनी आहे. फ्रीज बदलले आणि कुलूप किल्ल्यांचे फ्रीज आणले. फ्रीजच्या चाव्या मी माझ्याकडे ठेवते, असं अमृता फडणवीस यांनी आल्या-आल्या सांगितलं. हा भाग आज (बुधवारी) रात्री 9.30 वाजता झी मराठीवर पाहता येणार आहे.

आई सुगरण की बायको?

या कार्यक्रमात महाराजांच्या भूमिकेत असलेले प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी देवेंद्र फडणवीस यांना गुगली टाकली. “माझी आई आणि बायको जेवण बनवतात, आणि विचारतात, कोणाचं चांगलं झालंय, तेव्हा पंचाईत होते. तर तुम्ही मला सांगा, की तुमच्या आईच्या हातचा कोणता पदार्थ तुम्हाला आवडतो, आणि अमृताताईंच्या हातचा कोणता पदार्थ तुम्हाला आवडतो, मुळात आवडतो की नाही?” असं प्रशांत दामलेंनी विचारताच अमृता फडणवीसांनी त्यांच्याकडे लटक्या रागाने पाहिले.

आईला कधीच राग येत नाही

यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, की खरं म्हणजे प्रशांतजी असे प्रश्न कधीच विचारु नयेत. कोणी विचारलंच, तर लक्षात ठेवावं, की आईला म्हटलं, की तुझ्यापेक्षा पत्नीच्या हातचा एखादा पदार्थ जास्त आवडतो, तर आईला कधीच राग येत नाही. याच्या उलट केलं, तर जगणं मुश्किल होऊ शकतं. त्यामुळे असे प्रश्न विचारत जाऊ नका, असं फडणवीस म्हणताच प्रशांत दामले आणि संकर्षण कऱ्हाडे हे दोघेही खो-खो हसत सुटले.

माझी आई अतिशय सुगरण आहे. ती सगळेच पदार्थ उत्तम बनवते, मला पोहे अतिशय आवडतात. ती पोहे अतिशय छान बनवते. चिवडाही छान करते. अमृताही बरेच पदार्थ छान करते, पण मला पिझ्झा सर्वात जास्त आवडतो. पिझ्झा आणि चिवडा यातलं काय उत्तम हे कधीच सांगता येणार नाही, असं फडणवीस यांनी म्हणताच, अमृता म्हणाल्या की हे राजकीय उत्तर आहे.

याशिवाय अभिनेत्री स्मिता जयकर आणि अभिनेता स्वप्नील बांदोडकरही या शोमध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे अमृता फडणवीस यांना कोणता पदार्थ तयार करण्याचं चॅलेंज मिळणार आणि विजेतेपदाचा मान कोण पटकावणार, या प्रश्नाचं उत्तर भागाच्या अखेरीसच मिळणार आहे.

संबंधित बातम्या :

अमृता फडणवीसांचं व्हॅलेंटाईन स्पेशल गीत, नवा लूकही चांगलाच चर्चेत

बाहेरुन पाठिंबा चालेल का? पंकजांचा प्रश्न, रोहित पवार म्हणतात, आताचं सेशन बघता भाजपचा बाहेरुन पाठिंबा वाटतोय

आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.