Happy Birthday Ankita Lokhande | सुशांतशी नातं तुटल्यानंतर विकीने अंकिताला सावरलं, अशी होती दोघांची लव्हस्टोरी…

नुकतेच लग्नबंधनात अडकलेल्या अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांची प्रेमकहाणी एखाद्या परीकथेपेक्षा कमी नाही. चला जाणून घेऊया दोघे पहिल्यांदा कसे भेटले?

Happy Birthday Ankita Lokhande | सुशांतशी नातं तुटल्यानंतर विकीने अंकिताला सावरलं, अशी होती दोघांची लव्हस्टोरी...
Ankita Lokhande
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Dec 19, 2021 | 8:00 AM

मुंबई : दिर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) यांनी 14 डिसेंबरला लग्न केले. त्यांचे चाहते त्यांच्या लग्नाची खूप दिवसांपासून वाट पाहत होते. आता अंकिता मिसेस जैन बनल्याचे पाहून तिचे मित्र, कुटुंब आणि चाहते सर्वांनाच खूप आनंद झाला आहे. अंकिता आणि विकीने मोठ्या थाटामाटात लग्न केले. दोघांच्या लग्नाची तयारी खूप दिवसांपासून सुरू होती. लग्नाच्या प्रत्येक फंक्शनमध्ये दोघेही एकमेकांसोबत डान्स आणि मस्ती करताना दिसले.

दोघांचे लग्न एखाद्या परीकथेसारखे होते, तशीच या दोघांची प्रेमकथाही आहे. अंकिता विकीला भेटली जेव्हा ती तिच्या आयुष्यातील दुःखद टप्प्यात होती. सुशांत सिंग राजपूतसोबतच्या तिच्या ब्रेकअपमुळे खूप दु:खी झालेली, अंकिता तिचे जीवन पुन्हा सवरण्याचा प्रयत्न करत होती. त्याचवेळी विकी तिच्या आयुष्यात मार्गदर्शक म्हणून आला होता. मित्राप्रमाणे तिला प्रत्येक सुख-दुःखात साथ दिली, साथ दिली आणि मग तिने कायम त्याचा हात धरला.

अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूतबराच काळ सोबत होते आणि नंतर 2016 मध्ये अचानक दोघांचे ब्रेकअप झाले. या सगळ्याचा खापर अंकितावर फोडण्यात आले. पण एका मुलाखतीत अंकिता लोखंडे म्हणाली होती की, लोकांना वाटते की मी सुशांतला सोडले, पण ते खरे नाही. अंकिता लोखंडे म्हणाली, ‘सुशांतने करिअर निवडले आणि पुढे गेला. मी त्याला हे करण्यापासून रोखले नाही, परंतु माझ्यासाठी सर्व काही संपले. अडीच वर्षे मला काय करावे समजत नव्हते, पण या काळात माझे आई-वडील नेहमीच माझ्या पाठीशी उभे राहिले. त्यांनी मला पाठिंबा तर दिलाच पण पूर्ण वेळही दिला. त्यांनी सांगितले की या अडीच वर्षात मी फक्त हरवलेच नाही तर पुन्हा काम करण्याच्या स्थितीतही नव्हतो. अंकिताने सांगितले होते की, ‘मला फक्त सुशांतची खंबीर समर्थक व्हायचे होते, पण ब्रेकअपनंतर मला समजले की मी स्वतःही काहीतरी आहे.’

अंकिता आणि विकीची पहिली भेट

रिपोर्ट्सनुसार, अंकिता लोखंडे आणि विकी जैन एका कॉमन फ्रेंडच्या पार्टीत भेटले होते. ब्रेकअपनंतर अंकिताने प्रवास करणे, लोकांना भेटणे, बोलणे बंद केले होते. पण या गोष्टींपासून स्वत:ला दूर करण्यासाठी ती एका मित्राच्या पार्टीत सहभागी झाली. याच पार्टीत विकी जैनही उपस्थित असल्याने दोघांची नजरानजर झाली.ते एकमेकांना आवडले आणि हळू हळू संवाद सुरू झाला.

2018 साली एकमेकांना डेट करण्यास सुरुवात!

यानंतर त्यांच्या भेटीचा सिलसिला वाढू लागला आणि त्यांच्या अफेअरची चर्चाही आगीसारखी पसरली. अंकिता तिचे विकीसोबतचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असे, पण तिने त्यांच्या नात्याबद्दल कधीच काही सांगितले नाही. 2018 मध्ये अंकिताने विकीसोबतच्या नात्यावर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर दोघेही लवकरच लग्न करणार असल्याचे बोलले जात होते, पण दोघांनीही आपल्या नात्याला वेळ दिला, एकमेकांना समजून घेतले आणि मग लग्नाचा निर्णय घेतला.

वर्षभर एकमेकांसोबत राहिल्यानंतर विकी जैनने 2019 मध्ये अंकिताला प्रपोज केले. विकी जैनने गुडघ्यावर बसून अंकिताला प्रपोज केले. अंकितानेही तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अशाच काही फोटोंपैकी एक शेअर करत तिने कॅप्शन लिहिले होते की, ‘मी याचा विचार करेन विकी जैन’.

विकीने अंकिताला प्रत्येक वेळी साथ दिली!

सुशांतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता पूर्णपणे तुटली होती. अशा परिस्थितीत विकीने तिला प्रत्येक वेळी मित्राप्रमाणे सांभाळले. लोकांनी तिच्यावर अनेक आरोप केले आणि सोशल मीडियावर तिला खूप ट्रोल केले गेले. 2020 मध्ये सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतरही तिच्याकडे बोटे दाखवण्यात आली होती. पण विकी नेहमी तिच्यासमोर भिंतीसारखा उभा राहिला. सुशांत प्रकरणातही लोक अंकिताला ट्रोल करत असताना विकीने अंकिताला सपोर्ट करणाऱ्या लोकांना चोख प्रत्युत्तर दिले.

4 वर्षांच्या डेटिंगनंतर केले लग्न!

2019 मध्ये अंकिता आणि विकीचे लग्न होऊ शकते असे बोलले जात होते, पण तसे झाले नाही. 2020 मध्येही दोघांच्या लग्नाच्या बातम्या आल्या होत्या. पण 2021 मध्ये एका आघाडीच्या मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखतीत अंकिताने ती लवकरच लग्न करणार असल्याचे सांगितले होते. यानंतर डिसेंबरमध्ये त्यांच्या लग्नाच्या तारखा निश्चित झाल्या. 4 वर्षे एकमेकांसोबत डेटिंग केल्यानंतर डिसेंबर 2021 मध्ये दोघांनी लग्न केले. अंकिता आणि विकीच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सध्या दोघेही त्यांचा हनिमून पीरियड एन्जॉय करत आहेत.

हेही वाचा :

Pushpa Cast Fees : अल्लू अर्जुन ते रश्मिका मंदाना, जाणून घ्या ‘पुष्पा’साठी कोणाला मिळालं किती मानधन?

‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेत अभिनेत्री मुग्धा गोडबोलेंची होणार एण्ट्री, अपूर्वाच्या आयुष्यात होणार मोठा बदल!

काय म्हणता….लग्नानंतर लगेच विकी कौशलला सोडून सलमानकडे परतणार कतरिना कैफ!


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें