Happy Birthday Jasmin Bhasin | बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी म्हणाली ‘मी सिंगल’, बाहेर पडताच बदललं जास्मीनचं रिलेशनशीप स्टेटस!

टीव्ही अभिनेत्री जास्मीन भसीन (Jasmin Bhasin) आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकत आहे. 'दिल तो हैप्पी है जी, ‘नागिन' आणि ‘दिल से दिल तक' अशा अनेक मालिकांमध्ये ती दिसली होती. नुकतीच जास्मीन ‘बिग बॉस 14’ या रिअ‍ॅलिटी शोचा भाग बनली होती.

Happy Birthday Jasmin Bhasin | बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी म्हणाली ‘मी सिंगल’, बाहेर पडताच बदललं जास्मीनचं रिलेशनशीप स्टेटस!
जास्मीन भसीन

मुंबई : टीव्ही अभिनेत्री जास्मीन भसीन (Jasmin Bhasin) आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकत आहे. ‘दिल तो हैप्पी है जी, ‘नागिन’ आणि ‘दिल से दिल तक’ अशा अनेक मालिकांमध्ये ती दिसली होती. नुकतीच जास्मीन ‘बिग बॉस 14’ या रिअ‍ॅलिटी शोचा भाग बनली होती. या शोपासून जास्मीनही चर्चेचा भाग राहिली आहे. जास्मीन आज तिचा 31वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्रीचा जन्म 28 जून 1990 रोजी कोटा येथे झाला होता (Happy Birthday Jasmin Bhasin actress claimed that she is single before entering in Bigg Boss 14).

बिग बॉस 14मध्ये भाग घेण्यापूर्वी जास्मीनने टीव्ही 9ला दिलेल्या मुलाखतीत दावा केला होता की, ती अद्याप सिंगल आहे आणि शोमध्ये देखील ती सिंगलच असेल. एवढेच नाही, तर जास्मीनने असेही म्हटले होते की, बिग बॉसमध्ये तिचे प्रेम जुळूचं शकत नाही. पण जास्मीनचा हा दावा पूर्णपणे उलट असल्याचे सिद्ध झाले.

जस्मीनसाठी शोमध्ये आला अली

‘बिग बॉस 14’मध्ये जास्मीननंतर तिचा मित्र म्हणून अली गोनी (Aly Goni) देखील शोमध्ये गेला होती. तो शो सुरू झाल्यानंतर काही आठवड्यासाठी जास्मीनला पाठिंबा देण्यासाठी आला होता. मात्र, या शोमधील दोघांचा रोमान्स आणि नो-झोक प्रेक्षकांना खूप आवडली. शोमध्येच दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले होते. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत जास्मीन म्हणाली होती की, अली आणि तो नेहमीच चांगले मित्र होते, पण शोमध्ये सहभागी झाल्यानंतर दोघांनाही समजले की, त्यांच्यातील नाते मैत्रीपेक्षा जास्त होते.

‘बिग बॉस’मध्ये केला प्रपोज

‘बिग बॉस 14’मध्येच अली आणि जास्मीन यांना एकमेकांबद्दल असलेले प्रेम कळले. त्यानंतर अलीने शोमध्येच जास्मीनला प्रपोज केले आणि अभिनेत्रीनेही त्याच्यावरील आपले प्रेम व्यक्त केले. अली आणि जास्मीनची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली होती आणि अलीच्या घरच्यांनीही दोघांच्या नात्याला पाठींबा दिला आहे.

‘मिंगल’ होऊन आऊट!

शोमध्य सहभागी होण्यापूर्वी जास्मीनने सिंगल असल्याचा दावा केला होता आणि जेव्हा ती या शोमधून बाहेर पडली, तेव्हा तिचे रिलेशनशिप स्टेटस बदललेले होते. ती आता बर्‍याचदा अलीबरोबर बघायला मिळते. सध्या जास्मीन आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी अली गोनीबरोबर गोव्याला गेली आहे. अलीने जास्मीनच्या वाढदिवसाला खास बनवण्याची विशेष योजना आखली आहे.

(Happy Birthday Jasmin Bhasin actress claimed that she is single before entering in Bigg Boss 14)

हेही वाचा :

Rashmika Mandanna : रश्मिकाला भेटण्यासाठी चाहत्याकडून 900 किलोमीटरचा प्रवास, सोशल मीडियावरुन दिली माहिती

Photo : निक्की तांबोळीचा सोशल मीडियावर जलवा, ब्लॅक शॉर्ट ड्रेसमध्ये फोटो शेअर

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI