Khatron Ke Khiladi 12: ज्याला सिंहसुद्धा घाबरतो, त्याच प्राण्यासोबत एकाच पिंजऱ्यात उभं केलं अभिनेत्रीला; काय झालं पुढे?

विविध सेलिब्रिटी या शोमध्ये भाग घेतात आणि अत्यंत कठीण स्टंट्स (Stunts) ते करून दाखवतात. यामध्ये शेवटपर्यंत तो टिकतो, तो विजेता ठरतो. साप, किटक अंगावर सोडणे, आगीशी खेळणे, उंचावर विविध स्टंट्स करणे असे असंख्य प्रकारचे स्टंट्स सेलिब्रिटींना करायला सांगितलं जातं.

Khatron Ke Khiladi 12: ज्याला सिंहसुद्धा घाबरतो, त्याच प्राण्यासोबत एकाच पिंजऱ्यात उभं केलं अभिनेत्रीला; काय झालं पुढे?
Kanika Mann
Image Credit source: Instagram
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Jul 05, 2022 | 6:01 PM

‘खतरों के खिलाडी 12’ (Khatron Ke Khiladi 12) या बहुचर्चित रिॲलिटी शोचं शूटिंग सध्या दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये होत आहे. प्रत्येक सिझननुसार या शोमधील स्टंट्सची लेव्हल आणखी वाढवली जात आहे. नुकताच एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून व्हिडीओ पाहून सर्वसामान्यांचाही थरकाप उडेल. विविध सेलिब्रिटी या शोमध्ये भाग घेतात आणि अत्यंत कठीण स्टंट्स (Stunts) ते करून दाखवतात. यामध्ये शेवटपर्यंत तो टिकतो, तो विजेता ठरतो. साप, किटक अंगावर सोडणे, आगीशी खेळणे, उंचावर विविध स्टंट्स करणे असे असंख्य प्रकारचे स्टंट्स सेलिब्रिटींना करायला सांगितलं जातं. नुकत्याच दाखवलेल्या या प्रोमोममध्ये तरस (Hyena) या प्राण्याला दाखवलं गेलंय. या प्राण्यासोबत केले गेलेला स्टंट पाहून तुमचाही थरकाप उडेल.

अभिनेत्री कनिका मानचा सामना तरस या प्राण्याशी होताना या व्हिडीओत पहायला मिळतंय. “हायना म्हणतात याला, जेव्हा मोठ्या संख्येने हे प्राणी एकत्र येतात, तेव्हा सिंहसुद्धा घाबरून पळून जातो”, असं सूत्रसंचालक रोहित शेट्टी या प्रोमोमध्ये म्हणताना दिसत आहे. तरससोबत एका पिंजऱ्यात कनिकाला ठेवण्यात येईल, असं तो पुढे म्हणताच सर्वांना आश्चर्याचा मोठा धक्का बसतो. त्या प्राण्याला पाहून कनिकासुद्धा भीतीने ओरडू लागते. कनिकाला ओरडताना पाहून इतर सेलिब्रिटींच्याही अंगावर काटा येतो.

पहा व्हिडीओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

प्रोमोमध्ये पुढे डॉक्टर कनिकावर उपचार करताना दिसत आहेत. कनिकाची अवस्था पाहून सेलिब्रिटींच्या डोळ्यात अक्षरश: पाणी येतं. जन्नत जुबैर, राजीव अदातिया आणि रुबिना दिलैक हे रडू लागतात. पुढे कोरिओग्राफर तुषार कालियाचा आवाज ऐकू येतो. तो म्हणतो, “त्याने खाऊन टाकलं”. आता पिंजऱ्यात कनिकासोबत नेमकं काय घडतं हे मात्र स्पष्ट होऊ शकलं नाही. हा एपिसोड जेव्हा टेलिव्हिजनवर प्रसारित केला जाईल, तेव्हाच त्यामागी सत्य समजू शकेल. हा प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट होताच कनिकाच्या अनेक चाहत्यांनी तिच्याविषयी चिंता व्यक्त केली आहे.

काही दिवसांपूर्वीच कनिकाचा ‘खतरों के खिलाडी’च्या सेटवरून एक फोटो व्हायरल झाला होता. यामध्ये तिच्या शरीरावर विविध जखमा झाल्याचं पहायला मिळालं होतं. शोमध्ये स्टंट करताना कनिकाला बरीच दुखापत झाली होती. याच दुखापतीचा फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. ‘खतरों के खिलाडी’च्या याआधीच्या सिझनमध्येही बरेच कलाकार दुखापतग्रस्त झाले होते. तेजस्वी प्रकाशच्या डोळ्याला दुखापत झाल्यानंतर तिला तो शो मध्येच सोडावा लागला होता. पायाला जखम झाल्याने भारती सिंगलाही शोमधून बाहेर पडावं लागलं होतं. नंतर तिची जागा तिच्या पतीने घेतली होती.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें