VIDEO | गुडघ्यावर बसून प्रपोज, Indian Idol फेम सायली कांबळेच्या साखरपुड्यातील हा क्षण पाहिलात?

VIDEO | गुडघ्यावर बसून प्रपोज, Indian Idol फेम सायली कांबळेच्या साखरपुड्यातील हा क्षण पाहिलात?
गायिका सायली कांबळेचा साखरपुडा

सायली कांबळेच्या आवाजातील एकाहून एक गाणी 'इंडियन आयडल'च्या 12 व्या सिझनमध्ये गाजली. चाहत्यांनी तिचं भरभरुन कौतुकही केलं. नुकताच बॉयफ्रेण्ड धवलसोबत तिचा साखरपुडा झाला

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अनिश बेंद्रे

Dec 26, 2021 | 9:01 AM

मुंबई: ‘इंडियन आयडल’च्या 12 व्या सिझनमध्ये (Indian Idol 12) आपल्या मनमोहक आवाजाने देशभरातील प्रेक्षकांचं मन जिंकणारी मराठमोळी गायिका सायली कांबळे (Sayali Kamble) हिचा नुकताच साखरपुडा पार पडला. बॉयफ्रेण्ड धवलसोबत (Dhawal) ती लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

धवलने साखरपुड्यातील काही फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. धवलने गुडघ्यावर बसून सायलीला प्रपोज करतानाचा साखरपुड्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

पाहा सायली कांबळेच्या प्रपोजचा व्हिडीओ :

सायली कांबळे आणि वाद

सायली कांबळेच्या आवाजातील एकाहून एक गाणी ‘इंडियन आयडल’च्या 12 व्या सिझनमध्ये गाजली. चाहत्यांनी तिचं भरभरुन कौतुकही केलं. मात्र सोबतच सायली कांबळेची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याचं दाखवून ‘इंडियन आयडल’ कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी प्रेक्षकांची फसवणूक केली, असा आरोप केला जात होता.

या कार्यक्रमात प्रत्येक स्पर्धकाचा या मंचापर्यंतचा प्रवास दाखवण्यात येतो. अशाच व्हिडीओमध्ये सायली अत्यंत गरीब घरातून आली असून, तिचे वडील रुग्णवाहिका चालक आहेत, असे दाखवण्यात आले होते. त्यांच्या घरची परिस्थिती जेमतेम असल्याचेही तिने म्हटले होते.

दरम्यान, अभिनेता जॅकी श्रॉफ यांच्या उपस्थितीत झालेल्या भागात सायलीने तिच्या घरी टीव्ही नसल्याचे सांगितले होते. मात्र, सायलीचा दिग्गज गायकांसोबत गाणी गातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि प्रेक्षकांमध्ये संतापाची लाट उमटली. प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्यासोबत सायली मंचावर गाताना दिसल्याने ती खरंच इतकी गरीब आहे का, असं चाहते विचारत होते.

संबंधित बातम्या :

आधी सवाई आता सायली कांबळे, ‘इंडियन आयडॉल’मध्ये गरिबी दाखवण्याचा अट्टाहास का?, प्रेक्षकांचा संतप्त सवाल!

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें