मुंबई : सध्या कथाबाह्य कार्यक्रमांमध्ये ‘इंडियन आयडॉल’ (Indian Idol 12) या कार्यक्रमाचं 12वं पर्व सरस ठरतंय. यातील स्पर्धक आणि त्यांचे गोड आवाज ऐकून सगळेच रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले आहेत. मात्र, आता अचानक या कार्यक्रमाभोवतीची वाद वलय वाढत चालली आहेत. सायली कांबळे या नावामुळे सध्या इंडियन आयडॉल हा कार्यक्रम पुन्हा चर्चेत आला आहे. सायली कांबळेला (Sayali Kamble) गरीब दाखवून, कार्यक्रमाने प्रेक्षकांची फसवणूक केली, असा आरोप प्रेक्षकांकडून केला जात आहे. या आधीही सवाई भट या स्पर्धकाला गरीब असल्याचे दाखवल्यामुळे हा शो चर्चेत आला होता (Indian Idol 12 contestant Sayali Kamble poverty Controversy).