Anjali Arora: MMS व्हिडीओप्रकरणी ‘कच्चा बदाम’ फेम अंजलीने सोडलं मौन; म्हणाली “हेच तुमच्या बहिणीसोबत घडलं असतं तर?”

अंजलीचा कथित एमएमएस व्हिडिओ (MMS Video) लीक झाल्याचा दावा केला जात आहे, जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यावर अखेर अंजलीने मौन सोडलं आहे.

Anjali Arora: MMS व्हिडीओप्रकरणी 'कच्चा बदाम' फेम अंजलीने सोडलं मौन; म्हणाली हेच तुमच्या बहिणीसोबत घडलं असतं तर?
Anjali Arora Video: 'कच्चा बदाम' फेम अंजली अरोराचा MMS व्हिडीओ लीक?
Image Credit source: Instagram
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Aug 12, 2022 | 3:14 PM

‘कच्चा बदाम’ (Kaccha Badam) या सोशल मीडियावर गाजलेल्या गाण्यावर डान्स करत नेटकऱ्यांना वेड लावणारी अभिनेत्री अंजली अरोरा (Anjali Arora) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अंजलीचा कथित एमएमएस व्हिडिओ (MMS Video) लीक झाल्याचा दावा केला जात आहे, जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यावर अखेर अंजलीने मौन सोडलं आहे. व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांना अंजलीने सवाल केला की, “त्यांच्याच कुटुंबातील कोणत्याही सदस्यासोबत असं घडलं असतं तर त्यांना कसं वाटलं असतं?” या मुलाखतीत कथित एमएमएस व्हिडिओबद्दल बोलताना अंजलीला अश्रू अनावर झाले. असा प्रकार पहिल्यांदाच घडला नसून तिच्या पालकांनी यापूर्वीही याबाबत तक्रार केल्याचं तिने सांगितलं.

आरजे सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत अंजली म्हणाली, “हे लोक काय करत आहेत ते मला माहीत नाही. माझं नाव टाकून, माझा फोटो टाकून, हा अंजली अरोराचा एमएमएस आहे असं ते दाखवतायत. ते असं का करत आहेत हे मला माहित नाही. त्यांचंही कुटुंब असेल, माझंही कुटुंब आहे.’ असं म्हणताना अंजलीला अश्रू अनावर झाले. ती पुढे म्हणाली, “कधी कधी मला प्रश्न पडतो की हे लोक असं का करतात. युट्यूबवरील क्षुल्लक व्ह्यूजसाठी ते माझी बदनामी करत आहेत. पण माझं पण एक कुटुंब आहे, मला एक भाऊ आहे, एक बहीण आहे. माझे लहान भाऊ आहेत जे या सर्व गोष्टी पाहतात. जेव्हा तुम्ही कोणाशी बरोबरी साधू शकत नाही, तेव्हा तुम्ही बदनामी करता.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

अंजलीने सांगितलं की असं पहिल्यांदा घडलं नाही. ‘लॉक अप’ या शोमधून आल्यावर तिला कळालं की हा प्रकार त्याआधीही सुरू होता. शोच्या चौथ्या आठवड्यात असाच काहीसा प्रकार घडला होता आणि तिचा चेहरा एडिट करून काही बनावट व्हिडिओ व्हायरल केले जात असल्याची तक्रार तिच्या पालकांनी पोलिसांकडे केली होती. “का? मी काय चूक केली आहे? मी काय केलंय? मी ती नाहीये,” अशा शब्दांत तिने तीव्र नाराजी व्यक्त केली.

“तुम्ही लोक मला प्रेम देता, मला खूप पाठिंबा देता आणि मग अशा गोष्टी करता. लोक असे का करतात हे मला कळत नाही. अशा गोष्टी करण्याआधी कुणाच्या घरच्यांचं काय होईल, कुटुंबावर काय परिणाम होईल याचा विचार ते करत नाहीत. त्यांचे कुटुंबीय हे सहन करू शकतील की नाही? मी फक्त 21 वर्षांची आहे. मी या सर्व गोष्टींसाठी तयार नाही. हे सर्व सहन करण्यास मी सक्षम नाही. तुमच्या बहिणीसोबत असं झालं असतं तर? तुमच्यातील माणुसकी हरवली आहे का”, असा सवाल तिने केला.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें