AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 15 | कतरिना कैफचा सलमान खानवर आरोप, अभिनेत्याने अशाप्रकारे केली चूक कबूल!

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) सध्या तिच्या आगामी 'सूर्यवंशी' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अभिनेत्री अलीकडेच 'बिग बॉस 15'च्या (Bigg Boss 15) 'विकेंड का वार'मध्ये पोहोचली होती. या अभिनेत्रीसोबत दिग्दर्शक रोहित शेट्टी देखील यावेळी हजार होता.

Bigg Boss 15 | कतरिना कैफचा सलमान खानवर आरोप, अभिनेत्याने अशाप्रकारे केली चूक कबूल!
Katrina Kaif in Bigg Boss 15
| Edited By: | Updated on: Oct 30, 2021 | 2:11 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) सध्या तिच्या आगामी ‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अभिनेत्री अलीकडेच ‘बिग बॉस 15’च्या (Bigg Boss 15) ‘विकेंड का वार’मध्ये पोहोचली होती. या अभिनेत्रीसोबत दिग्दर्शक रोहित शेट्टी देखील यावेळी हजार होता. कलर्स टीव्हीच्या नवीन प्रोमोमध्ये कतरिना गेमदरम्यान सलमानवर आरोप करताना दिसत आहे.

प्रोमोमध्ये कतरिना रोहितसोबत स्टेजवर दिसते आहे. एका गेममध्ये ती आणि सलमान एका टेबलावर समोरासमोर बसतात ज्यामध्ये रोहित जजची भूमिका करतो. कतरिनाने सलमानवर आरोप केला, ‘ये शूट पे हमेशा देर से आते हैं’. यावर सलमान देखील ‘हो’ म्हणतो.

सलमानने खास शैलीत गायले एक गाणे

यानंतर कतरिना सलमानला सांगते की, त्याला माझ्यासाठी एक गाणे गाऊन दाखवावे लागेल आणि सलमान खान त्याच्या मजेदार डान्स मूव्ह्स दाखवत ‘ओ मेरे दिल के चैन’ गातो. जे ऐकून सगळे हसू लागतात. कतरिना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अभिनेत्रीने ‘विकेंड का वार’ मधून तिच्या सुंदर लूकची काही छायाचित्रे देखील शेअर केली आहेत. तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करत तिने कॅप्शन लिहिले आहे की, ‘आज बिग बॉस आणि 5 नोव्हेंबरला सूर्यवंशी सिनेमागृहात’

याआधी प्रोमोमध्ये सलमान शमितावर रागावलेला दिसतो आणि म्हणतो की,  माझ्या हातात असतं तर मी एपिसोड सायलेंटमध्ये काढून टाकाला असता आणि आलो देखील नसतो. वास्तविक सलमान शमिताला म्हणतो की, तू स्वतःला राणी मानतेस का, यावर शमिता थोडेसे नखरे दाखवते आणि म्हणते, मी काय करू, माझा जन्म असा झाला आहे.

‘या’ चित्रपटांमध्ये सलमान आणि कतरिनाने एकत्र काम केले होते

कतरिना आणि सलमानने 2019 मध्ये आलेल्या ‘भारत’ चित्रपटासह काही चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्याच्या इतर चित्रपटांमध्ये ‘एक था टायगर’, ‘टायगर जिंदा है’, ‘मैने प्यार क्यूं किया’ आणि ‘हॅलो’ यांचा समावेश आहे. कतरिनाच्या 2018 मध्ये आलेल्या ‘झिरो’ चित्रपटात सलमानने स्पेशल डान्स नंबरही केला होता. ‘इश्कबाजी’ या गाण्यात तिने शाहरुख खानसोबत स्टेज शेअर केला होता.

त्याचबरोबर सलमान खानने त्याचा आगामी चित्रपट ‘अंतिम’चा ट्रेलरही रिलीज केला आहे. यामध्ये अभिनेत्यासोबत त्याचा मेहुणा आयुष शर्माही मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट 26 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

Ananya Pandey : पहिल्याच चित्रपटासाठी फिल्मफेअर अवॉर्ड; वयाच्या 22व्या वर्षी करोडोंची संपत्ती, वाचा अनन्या पांडेबद्दल

क्रुझ पार्टी, ड्रग्ज, अटक आणि पुन्हा ‘मन्नत’ वापसी, आर्यन खानचे ‘ते’ 28 दिवस! वाचा काय काय घडलं…

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.