‘मन उडु उडु झालं’ मालिकेला पडली ‘मनी हाईस्ट’ची भुरळ, हॉट एअर बलूनची सैर करत केलं प्रमोशन!

झी मराठीवरील ‘मन उडू उडू झालं’ (Man Udu Udu Jhala) या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली ही मालिका अल्पावधीत त्यांची आवडती बनली असून, त्यातील व्यक्तिरेखा देखील प्रेक्षकांना आपल्याशा वाटतात.

‘मन उडु उडु झालं’ मालिकेला पडली ‘मनी हाईस्ट’ची भुरळ, हॉट एअर बलूनची सैर करत केलं प्रमोशन!
Man Udu Udu Zaal

मुंबई : झी मराठीवरील ‘मन उडू उडू झालं’ (Man Udu Udu Jhala) या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली ही मालिका अल्पावधीत त्यांची आवडती बनली असून, त्यातील व्यक्तिरेखा देखील प्रेक्षकांना आपल्याशा वाटतात. उडू उडू म्हंटल्यावर आपल्या मनात येते ती म्हणजे उंच भरारी आणि या मालिकेतील इंद्रा आणि दिपू म्हणजेच अभिनेता अजिंक्य राऊत आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे यांनी अशीच उंच भरारी घेतली आहे. हो हे खरं आहे, मालिकेतील या कलाकारांनी हॉट-एअर बलूनची सैर केली आणि आकाशाला गवसणी घातली.

मालिकेच्या प्रमोशनसाठी ही खास योजना करण्यात आली होती. यासाठी दोन्हीही कलाकार अगदी उत्सुक होते आणि त्यांनी या ऍक्टिव्हिटीचा मनसोक्त आनंद घेतला. तसेच, या हॉट-एअर बलूनमध्ये मालिकेचे काही सिन देखील चित्रित करण्यात आले आहेत, जे प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळतील. त्यामुळे हा वेगळा अनुभव टीव्हीवर अनुभवण्यासाठी प्रेक्षकांनी या मालिकेचा एकही भाग चुकवता कामा नये.

कलाकारही झाले खुश

याबद्दल बोलताना हृता म्हणाली, ‘मला अजूनही विश्वास बसत नाही आहे की, आम्ही अशी अ‍ॅक्टिव्हिटी केली हे माझ्या कल्पेने पलीकडचं होतं. मन उडू उडू झालं म्हणत आम्ही खरोखरच उडतोय.’

या अनोख्या अनुभवाबद्दल बोलताना अजिंक्य म्हणाला, “मन उडू उडू झालं या मालिकेला प्रेक्षक खूप उदंड प्रतिसाद देत आहेत, याचा आम्हाला खूप जास्त आनंद आहे. उडू उडू या शब्दाशी संदर्भ लागणाऱ्या सगळ्या गोष्टी या मालिकेमुळे आम्हाला अनुभवायला मिळत आहेत आणि ही अ‍ॅक्टिव्हिटी देखील त्याचाच एक भाग आहे. प्रेक्षकांनी आमच्यावर असंच प्रेम करत राहावं आणि त्यांच्या अफाट प्रेमाने आमची मालिकादेखील लोकप्रियतेची गगनभरारी घेतेय असं म्हणेन.”

पाहा व्हिडीओ :

हृता दुर्गुळेचे पुनरागमन

आपल्या सौंदर्याने आणि अभिनय कौशल्याने लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) हिने तमाम प्रेक्षकांच्या मनाला भुरळ पाडली आहे. ती अक्षरशः तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. ‘फुलपाखरू’ या मालिकेनंतर हृताचे चाहते तिच्या नवीन मालिकेची अत्यंत आतुरतेने वाट बघत होते. या मालिकेच्या निमित्ताने ती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

मालिकेबद्दल सांगताना ‘इंद्रा’ म्हणतो…

या मालिकेतील आपल्या भूमिकेबद्दल सांगताना अजिंक्य राऊत म्हणतो की, ‘यात मी इंद्रजीत नावाची व्यक्तिरेखा साकारत असून, हा इंद्रा या नावानं ओळखला जातो. हा कॅालेजमध्ये गोल्ड मेडल मिळवलेला मुलगा आहे. खूप सोफेस्टिकेटेड, आईचा लाडका, कुटुंबात थोरला आहे. मनाप्रमाणं किंवा गुणवत्तेनुसार काम मिळत नसल्यानं तो एक प्रकारचं काम स्वीकारतो. त्यातही तो प्रामाणिकपणा आणि माणूसकी जपतो. काम वेगळ्या धाटणीचं असल्यानं ते करताना त्याला मजा येतेय. मूळात अजिंक्य म्हणून मी असा मुळीच नाही. माझा स्वभाव नसताना ते उत्तमरीत्या प्रेक्षकांसमोर सादर करण्याचं आव्हान या कॅरेक्टरमध्ये आहे.’

हेही वाचा :

Tiger 3 | ‘तेनु काला चष्मा जचाताए…’, इंटरनॅशनल शूटिंग संपवून भारतात परतलेल्या कतरिना कैफचा स्वॅग लूक!

अनलॉक थिएटरच्या घोषणेनंतर मनोरंजनाची मेजवानी, प्रथमेश-रितिकाचा ‘डार्लिंग’ ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI