Video | ‘युवर मराठी अ‍ॅक्सेंट इस सो डिफ्रंट’ म्हणत ‘या’ मराठी तारकांनी दाखवला भाषेतील फरक, तुम्हाला माहितीयत का ‘हे’ शब्द?  

आपल्या देशात दर 32 पावलांवर भाषा बदलते, असे म्हटले जाते. मात्र हे खरंच असे असेल का?, असा प्रश्न ही अनेक लोकांना पडतो. यावर उत्तर देत आता लाडक्या मराठी तारकांनी एक खास व्हिडीओ तरी केला आहे.

Video | ‘युवर मराठी अ‍ॅक्सेंट इस सो डिफ्रंट’ म्हणत ‘या’ मराठी तारकांनी दाखवला भाषेतील फरक, तुम्हाला माहितीयत का ‘हे’ शब्द?  
Marathi Actress

मुंबई : आपल्या देशात दर 32 पावलांवर भाषा बदलते, असे म्हटले जाते. मात्र हे खरंच असे असेल का?, असा प्रश्न ही अनेक लोकांना पडतो. यावर उत्तर देत आता लाडक्या मराठी तारकांनी एक खास व्हिडीओ तरी केला आहे. तसं सोशल मीडियावर एखादा ट्रेंड आला की, तो विलंब न करता लगेच फॉलो करण्यात सगळेच माहीर असतात. त्यातही कालकार आणि सोशल मीडिया ट्रेंड यांचं फार जवळचं नातं आहे. नुकताच सोशल मीडियावर ‘युवर मराठी अ‍ॅक्सेंट इस सो डिफ्रंट’ असं म्हणत काही शब्द बोलून दाखवण्याचा ट्रेंड सुरु आहे.

‘युवर मराठी अ‍ॅक्सेंट इस सो डिफ्रंट’ हा ट्रेंड फॉलो करत आता मराठी मनोरंजन विश्वातल्या चार प्रसिद्ध अभिनेत्रींनी आपल्या चाहत्यांना बोलीभाषा आणि प्रमाण भाषा यातील फरक समजवला आहे. मराठी प्रमाण भाषा, आणि विदर्भाची बोली भाषा यात त्यांचा बोलण्याचा लहेजा भलताच भाव खाऊन गेला आहे.

पाहा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by Samidha Guru (@samidhaofficial)

या व्हिडीओमध्ये अभिनेत्री समिधा गुरु, मृणाल देशपांडे, भार्गवी चिरमुले, सई रानडे या मराठी तारका दिसत आहेत. ‘युवर मराठी अ‍ॅक्सेंट इस सो डिफ्रंट’ म्हणत समिधा गुरु या व्हिडीओची सुरुवात करते. या नंतर त्या एकेक शब्दांचा प्रमाण भाषा आणि बोली भाषेतील शब्द म्हणून दाखवतात. म्हणजेच ‘मला’चा ‘मले’, ‘का’चा ‘काऊन’, ‘सैरभर’ म्हणजे ‘छमल छमल’ आणि ‘मूर्ख’ म्हणजे ‘भयताड’ हे शब्द त्यांनी या व्हिडीओत म्हणून दाखवले आहेत. वऱ्हाडी भाषेतील हे शब्द त्यांच्या चाहत्यांनाही खूप पसंत पडले आहेत.

काय आहे हा नाव ट्रेंड?

सोशल मीडियावर दररोज नव्या नव्या ट्रेंडचं पीक येतच असतं. कधी यात गाणी असतात तर, कधी नवे चॅलेंज… यातच नुकताच सोशल मीडियावर ‘युवर मराठी अ‍ॅक्सेंट इस सो डिफ्रंट’ असं म्हणत काही मराठी शब्द आपल्या लहेजात बोलून दाखवण्याचा ट्रेंड सुरु झाला आहे. यात अनेकांनी सहभागी होत आपल्या शैलीत हे शब्द म्हणून दाखवले आहेत.

(Marathi Actress follows Your Marathi Accent Is So Different trend goes viral on social media)

हेही वाचा :

15 वर्षाची मेहनत कचऱ्यात, गाणं लिहिताना ढसढसा रडले; गीतकार अम्बादेंच्या बाबतीत नेमकं काय घडलं?

Video | सोशल मीडिया ट्रेंडचा मोह ‘वहिनीसाहेबांना’ही आवरेना, ‘बसपन का प्यार’वर धनश्री काडगांवकरचे लेकासह ठुमके!

Savaniee Ravindrra : सावनी रविंद्रच्या आयुष्यात चिमुकलीचं आगमन, खास व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिली माहिती

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI