‘चला हवा येऊ द्या’ बंद होणार का? काय म्हणाले भारत गणेशपुरे?

Actor Bharat Ganeshpure on Chala Hawa Yeu Dya Streaming : 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम बंद होणार असल्याची चर्चा आहे. या मागचं सत्य काय आहे? खरंच हा कार्यक्रम बंद होणार आहे का? या कार्यक्रमातील कलाकारांचं काय म्हणणं आहे? 'चला हवा येऊ द्या'च्या प्रसारणाबाबतची बातमी, वाचा सविस्तर...

'चला हवा येऊ द्या' बंद होणार का? काय म्हणाले भारत गणेशपुरे?
Follow us
| Updated on: Mar 09, 2024 | 12:47 PM

मुंबई | 09 मार्च 2024 : कधी- कधी टीव्हीवर प्रसारित होणारे कार्यक्रम आपल्याच घराचा भाग होऊन जातात. असाच एक कार्यक्रम म्हणजे ‘चला हवा येऊ द्या…’ हा कार्यक्रम म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहातं. महाराष्ट्राला खळखळून हसवणारा हा विनोदी कार्यक्रम… मागची दहा वर्षे महाराष्ट्राचं निखळ मनोरंजन करणारा हा कार्यक्रम आता बंद होणार असल्याची चर्चा सुरु आहे. ही बाब चर्चेत आल्यापासून ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमावर प्रेम करणाऱ्या रसिकांमध्ये नाराजी पाहायला मिळते आहे. हा कार्यक्रम खरंच बंद होणार आहे का? याबाबत आम्ही अभिनेते भारत गणेशपुरे यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी याबाबत सविस्तर प्रतिक्रिया दिली.

भारत गणेशपुरे काय म्हणाले?

‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातील कलाकार, अभिनेते भारत गणेशपुरे यांच्याशी आम्ही संवाद साधला. तेव्हा या कार्यक्रमाच्या प्रसारणासंदर्भात त्यांनी माहिती दिली. सध्या तरी अशा चर्चा आम्ही सोशल मीडियावर ऐकतो आहोत. पण चॅनेलकडून आम्हाला अद्याप असा कोणताही मेसेज आलेला नाही. ‘चला हवा येऊ द्या’ मार्च महिन्यातील शूटिंग शेड्युल लागलेलं आहे. हे शेड्युल आम्हाला कळवण्यात आलेलं आहे. त्यामुळे तसं या महिन्यात शूटिंग होईल. मात्र हा कार्यक्रम बंद होणार असल्याचं अधिकृतरित्या आम्हाला कळवण्यात आलेलं नाही, असं भारत गणेशपुरे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं.

‘चला हवा येऊ द्या’ची लोकप्रियता

चला हवा येऊ द्या या कार्यक्रम महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रिय आहे. सोमवार मंगळवारी रात्री साडे नऊ वाजले की टीव्ही लावून हा कार्यक्रम बघणारा मोठा प्रेक्षकवर्ग आहे. या कार्यक्रमातील स्किट आणि कलाकाराचं कॉमेडीचं टायमिंग प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. अशात मागच्या काही दिवसांपासून हा कार्यक्रम बंद होणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यावर भारत गणेशपुरे यांनी तुर्तासतरी पडदा टाकला आहे.

निलेश साबळे ‘चला हवा येऊ द्या’तून बाहेर

काही दिवसांआधी चला हवा येऊ द्या कार्यक्रमाचा अँकर, दिग्दर्शक आणि अभिनेता निलेश साबळे याने हा कार्यक्रम सोडत असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले. अशातच आता हा कार्यक्रम बंद होणार असल्याचंही बोललं जात आहे. मात्र सध्यातरी या कार्यक्रमाच्या शूटिंगचं शेड्यूल लागलेलं आहे. त्यामुळे इतक्यात तरी हा कार्यक्रम बंद होणार नसल्याचं भारत गणेशपुरे यांनी स्पष्ट केलं आहे.

Non Stop LIVE Update
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.