‘योगयोगेश्वर जय शंकर’ मालिकेत दाखवणार शंकर महाराजांचा जीवनअध्याय; उमा पेंढारकर महत्त्वपूर्ण भूमिकेत

'योगयोगेश्वर जय शंकर' मालिकेत दाखवणार शंकर महाराजांचा जीवनअध्याय; उमा पेंढारकर महत्त्वपूर्ण भूमिकेत
Uma Pendharkar
Image Credit source: Tv9

उमाने याआधी कलर्स मराठीवरील स्वामिनी मालिकेमध्ये पार्वतीबाईंची भूमिका साकारली होती. तिला प्रेक्षकांची पसंती मिळाली आणि आता ती पुन्हा एकदा योगयोगेश्वर जय शंकर या मालिकेमध्ये पार्वतीबाई यांची भूमिका साकारणार आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

May 22, 2022 | 3:08 PM

कलर्स मराठी वाहिनीवर येत्या 30 मेपासून शिरीष लाटकर लिखित ‘योगयोगेश्वर जय शंकर’ (Yogyogeshwar Jai Shankar) ही नवी मालिका सुरू होत आहे. शंकर महाराजांचे (Shankar Maharaj) भक्तगण त्यांना साक्षात शंकराचाच अवतार मानतात. मैं कैलाश का रहने वाला हू, मेरा नाम है शंकर असं बोलत ज्यांनी अनेक पीडितांच्या दु:खांचं निवारण केलं, ज्यांचा भक्तसमुदाय संपूर्ण जगात विखुरलेला आहे, एक सिद्ध आणि अवलिया सत्पुरुष शंकर महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित ही मालिका आहे. मालिकेमध्ये शंकर महाराजांच्या आईची भूमिका अभिनेत्री उमा पेंढारकर (Uma Pendharkar) साकारणार आहे. उमाने याआधी कलर्स मराठीवरील स्वामिनी मालिकेमध्ये पार्वतीबाईंची भूमिका साकारली होती. तिला प्रेक्षकांची पसंती मिळाली आणि आता ती पुन्हा एकदा योगयोगेश्वर जय शंकर या मालिकेमध्ये पार्वतीबाई यांची भूमिका साकारणार आहे. तर, वडिलांची (चिमणाजी) भूमिका अतुल आगलावे साकारणार आहेत आणि बाल शंकर महाराजांची भूमिका आरुष बेडेकर साकारणार आहे.

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना उमा म्हणाली, “कलर्स मराठी वाहनीवर स्वामिनी मालिकेत पार्वतीबाई पेशवा हे पात्र साकारल्यावर आता प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आणि महाराजांच्या आशीर्वादामुळे पुन्हा एकदा पार्वतीबाई म्हणून मी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. दोन्ही पार्वतीबाईंमधील एक समान धागा म्हणजे त्यांच्यातील मातृत्वाचे भाव, देवावर अपार श्रध्दा. महाराजांची आई साकारण्याची संधी मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि म्हणूनच त्या पात्राविषयी अभ्यास करून काम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या मालिकेतून महाराजांचा विचार, त्यांचं कार्य, पोहचविण्याची संधी मला मिळाली हा त्यांचा एक मोठा आशीर्वाद असे मी मानते. म्हणूनच अतिशय मनापासून आणि जबाबदारीने या भूमिकेसाठी मी सज्ज झाली आहे”.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

शंकर महाराज यांचा बालपणापासून ते महानिर्वाणापर्यंतचा प्रवास ‘योगयोगेश्वर जय शंकर’ या मालिकेत बघायला मिळणार आहे. ही मालिका येत्या 30 मेपासून संध्याकाळी 7 वाजता कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें