‘रामायणा’तील ‘कैकयी’ने अमिताभ बच्चन यांच्यासोबत केलेय काम, जाणून घ्या आता काय करते अभिनेत्री…

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jun 26, 2021 | 7:52 AM

रामानंद सागर (Ramanand Sagar) यांची लोकप्रिय मालिका ‘रामायण’ (Ramayana) आणि त्यातील प्रत्येक पात्र इतके लोकप्रिय झाले होते की, लॉकडाऊन दरम्यान पुन्हा एकदा शो परत आणण्यात आला. लॉकडाऊन दरम्यान पुन्हा एकदा हा कार्यक्रम टीव्हीवर प्रक्षेपित झाला होता, तेव्हा त्याने टीआरपीच्या बाबतीत 'गेम ऑफ थ्रोन्स'चाही विक्रम मोडला होता.

‘रामायणा’तील ‘कैकयी’ने अमिताभ बच्चन यांच्यासोबत केलेय काम, जाणून घ्या आता काय करते अभिनेत्री...
अमिताभ बच्चन आणि पद्मा खन्ना

Follow us on

मुंबई : रामानंद सागर (Ramanand Sagar) यांची लोकप्रिय मालिका ‘रामायण’ (Ramayana) आणि त्यातील प्रत्येक पात्र इतके लोकप्रिय झाले होते की, लॉकडाऊन दरम्यान पुन्हा एकदा शो परत आणण्यात आला. लॉकडाऊन दरम्यान पुन्हा एकदा हा कार्यक्रम टीव्हीवर प्रक्षेपित झाला होता, तेव्हा त्याने टीआरपीच्या बाबतीत ‘गेम ऑफ थ्रोन्स’चाही विक्रम मोडला होता. या कार्यक्रमात ‘कौशल्या’च्या व्यक्तिरेखेला खूप पसंती मिळाली असतानाच, ‘कैकयी’च्या व्यक्तिरेखेनेही एक वेगळी छाप सोडली (Ramayan Fame Kaikeyi aka Actress Padma Khanna Know where is she now).

खऱ्या आयुष्यातही द्वेष करू लागले लोक

असे म्हणतात की, कैकेयीच्या व्यक्तिरेखेत पद्मा खन्ना (Padma Khanna) यांनी अशी जादू केली होती की, त्या काळात लोक तिला वास्तविक जीवनातही नावं ठेवत असत. तथापि, अभिनेत्री म्हणून तिचा हा सर्वात मोठा विजय होता. रामानंद सागर यांच्या रामायणात ‘कैकेयी’ची भूमिका साकारणाऱ्या कैकेयीने बॉलिवूड सुपरस्टारबरोबरही पडद्यावर रोमान्स केला आहे, हे फार कमी लोकांना ठाऊक आहे.

कैकेयीची भूमिका साकारण्यास दिला नकार

1961मध्ये पद्मा खन्ना यांनी ‘भैय्या’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात हेलन, अचला सचदेव आणि शुभा खोटे यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. रामानंद सागर यांना पद्मा यांनी कैकेयीची भूमिका करण्यास नकार दिला होता आणि ही एक नकारात्मक भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. तथापि, नंतर रामानंद सागर यांनी तिला काहीतरी सांगितले, ज्यानंतर त्या भूमिकेसाठी तयार झाल्या.

रामानंद सागर म्हणाले…

रामानंद सागर म्हणाले की, लोक रामायणातील कोणतेही पात्र विसरतील, पण कैकेयीचे पात्र मात्र कधीही विसरू शकत नाहीत. रुपेरी पडद्याबद्दल बोलायचे झाले, तर भोजपुरी सिनेमापासून करिअरची सुरूवात करणाऱ्या पद्मा अमिताभ बच्चन यांच्याबरोबर ‘सौदागर’ या चित्रपटात झळकल्या होत्या. या चित्रपटाने त्यांना ओळख मिळाली. या चित्रपटातील गाणे ‘सजना है मुझे’ खूप लोकप्रिय झाले आणि दोघेही चित्रपटात रोमांस करताना दिसले होते.

रामायणातील ‘कैकयी’ सध्या कुठे गायब आहेत?

पण इतकी लोकप्रियता मिळवणाऱ्या पद्मा खन्ना सध्या कुठे आहेत आणि अचानक त्या रुपेरी पडद्यावरुन कुठे गायब झाल्या?, हा प्रश्न त्यांच्या सगळ्याच चाहत्यांना पडला आहे.  80च्या दशकात पद्मा खन्ना यांनी दिग्दर्शक जगदीश एल सिडाना यांच्याशी लग्न केले. ‘सौदागर’ चित्रपटाच्या सेटवर सिडाना आणि पद्मा खन्ना यांची भेट झाली होती. लग्नानंतर पद्मा खन्ना यांनी सिनेमा जगताला निरोप दिला आणि त्या अमेरिकेत शिफ्ट झाल्या. तिथे त्यांनी मुलांना शास्त्रीय नृत्य शिकवायला सुरुवात केली.

(Ramayan Fame Kaikeyi aka Actress Padma Khanna Know where is she now)

हेही वाचा :

Devmanus | सरू आजी अंध नाही?, अजितकुमार आणणार सरू आजीचं सत्य सगळ्यांसमोर!

Shah Rukh Khan | बॉलिवूड कारकिर्दीला 30 वर्ष पूर्ण, शाहरुख खान चाहत्यांसाठी शेअर केली भावूक पोस्ट!

Non Stop LIVE Update

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI