बँकेतील नोकरी सोडून ‘जेठालाल’च्या दुकानात काम करू लागला ‘बागा’, पूर्वी करायचा छोट्या-मोठ्या भूमिका!

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah chashmah) गेल्या 13 वर्षांपासून समस्त प्रेक्षकांचे सतत मनोरंजन करत आहे. या शोचे प्रत्येक पात्र लोकांच्या हृदयाच्या अगदी जवळ आहे. 2008मध्ये सुरू झालेल्या या शोने प्रत्येक कलाकाराला घरोघरी ओळख मिळवून दिली.

बँकेतील नोकरी सोडून ‘जेठालाल’च्या दुकानात काम करू लागला ‘बागा’, पूर्वी करायचा छोट्या-मोठ्या भूमिका!
Tanmay Vekariya


मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah chashmah) गेल्या 13 वर्षांपासून समस्त प्रेक्षकांचे सतत मनोरंजन करत आहे. या शोचे प्रत्येक पात्र लोकांच्या हृदयाच्या अगदी जवळ आहे. 2008मध्ये सुरू झालेल्या या शोने प्रत्येक कलाकाराला घरोघरी ओळख मिळवून दिली. प्रत्येक पात्राप्रमाणे, शोमध्ये आणखी एक पात्र आहे, ज्याने आपल्या निरागसतेने लोकांची मने जिंकलीच. ‘बाघा’ बनून हा अभिनेता घरोघरी लोकप्रिय झाला. होय, आपण अभिनेता तन्मय वेकारियाबद्दल (Tanmay Vekaria) बोलत आहोत. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये ‘बाघा’ची भूमिका कशी मिळाली आणि या भूमिकेसाठी त्याला किती मेहनत करावी लागली? चला जाणून घेऊया अभिनेत्याबद्दल अधिक…

या शोमध्ये काम मिळण्यापूर्वी तन्मय इतक्या कमी पगारामध्ये काम करायचा, की आकडा ऐकल्यावर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. तन्मय वेकारिया हा एका खासगी बँकेत बँकर म्हणून काम करत होता आणि त्याला या नोकरीसाठी फक्त चार हजार रुपये पगार मिळत असे. त्याने मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणूनही काम केले आहे. पण, तन्मयचे वडील अभिनेते होते आणि त्याला देखील नेहमीच अभिनेता व्हायचे होते.

छोट्या भूमिकांपासून केली सुरुवात!

तन्मय वेकारियाने छोट्या-छोट्या भूमिकांसह आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. याआधी याच शोमध्ये त्याने ऑटो ड्रायव्हर, टॅक्सी ड्रायव्हर, इन्स्पेक्टर आणि शिक्षक अशा वेगवेगळ्या भूमिका साकारल्या होत्या. वर्ष 2010 मध्ये, त्याला ‘बाघा’ची भूमिका मिळाली, ज्यामुळे त्याने घराघरांत नाव कमावले. ही भूमिका स्वीकारणे बाघाच्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय ठरला. 13 वर्षांनंतरही, तो अजूनही त्याचे पात्र अतिशय उत्तम प्रकारे सकारात आहे.

रंगमंच 15 वर्षे काम!

गुजरातमध्ये राहणाऱ्या तन्मय वेकारियाने 15 वर्षे अनेक गुजराती थिएटरमध्ये अभिनय केला. वडिलांकडून मिळालेली ही अभिनय कला बाघा उर्फ ​​तन्मयने खूप चांगल्याप्रकारे आत्मसात केली. तन्मयने त्याचे प्रत्येक पात्र इतक्या साधेपणाने आणि तपशीलाने साकारले की, ज्यांनी त्याला पाहिले ते पाहतच राहिले.

चित्रपटांमध्येही केले काम

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेपूर्वी तन्मयने चित्रपट आणि गुजराती मालिकांमध्ये आपले अभिनयकौशल्य दाखवले आहे. त्याने गुजराती कॉमेडी नाटक ‘घर घर नी बात’ मध्ये काम केले होते. या व्यतिरिक्त, तो 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘समय चक्र टाइम स्लॉट’ या चित्रपटातही दिसला आहे.

जेठालालचा खास आहे ‘बाघा’!

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये ‘बाघा’ची भूमिका साकारणारा तन्मय वेकारिया जेठालालचे खास आणि जवळचा व्यक्ती दाखवला आहे. जेठालालच्या दुकानात काम करणाऱ्या नट्टू काकांचा नातेवाईक आहेत. या शोमधील त्याची भूमिका चांगलीच पसंत केली गेली आहे. ‘बाघा’ची बोलकी शैली तर आहेच, पण त्याची उभे राहण्याची आणि चालण्याची देखील एक वेगळी शैली आहे.

हेही वाचा :

KBC 13 | ‘केबीसी 13’च्या मंचावर ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा बनला पोलीस, अमिताभ बच्चन यांचा प्रसिद्ध डायलॉग ऐकवला हरयाणवी भाषेत!

Aai Kuthe Kay Karte | देशमुखांच्या घरात गुंड शिरणार, अविनाशला मारहाण करणार! अरुंधतीवर पुन्हा नवीन संकट कोसळणार?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI