‘अहमदनगर महाकरंडक’च्या महाअंतिम सोहळ्यासाठी जय्यत तयारी, 26 ते 29 एप्रिल दरम्यान होणार महास्पर्धा

नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणारी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी एकांकीका स्पर्धा अहमदनगर महाकरंडक 2022 'उत्सव रंगभूमीचा, नवरसांचा'ची महाअंतिम फेरी अहमदनगर इथल्या माऊली सभागृहात 26 ते 29 एप्रिल दरम्यान जल्लोषात रंगणार आहे. अंतिम फेरीसाठी परीक्षक म्हणून दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, अभिनेत्री - निर्माती श्वेता शिंदे आणि अभिनेता - दिग्दर्शक अद्वैत दादरकर असणार आहेत.

'अहमदनगर महाकरंडक'च्या महाअंतिम सोहळ्यासाठी जय्यत तयारी, 26 ते 29 एप्रिल दरम्यान होणार महास्पर्धा
'अहमदनगर महाकरंडक'चा महाअंतिम सोहळा Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 24, 2022 | 8:20 AM

मुंबई : हौशी रंगकर्मींच्या कलाविष्काराला प्रोत्साहन देणारी, नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणारी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी एकांकीका स्पर्धा अहमदनगर महाकरंडक 2022 (Ahmednagar Mahakarandak) ‘उत्सव रंगभूमीचा, नवरसांचा’ची महाअंतिम फेरी अहमदनगर इथल्या माऊली सभागृहात 26 ते 29 एप्रिल दरम्यान जल्लोषात रंगणार आहे. अनुष्का मोशन पिक्चर्स अ‍ॅण्ड एंटरटेन्मेंट आणि शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन (Shantikumarji Firodia Memorial Foundation) प्रायोजित, श्री महावीर प्रतिष्ठान आयोजित आणि झी-मराठीच्या सहयोगाने होत असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रात झालेल्या प्राथमिक फेरीतून 120 एकांकिकांमधून तब्बल 33 एकांकिकांची अंतिम फेरीत निवड करण्यात आली आहे. पुणे, मुंबई, नाशिक, इस्लामपूर, जळगाव, धुळे, अमरावती, कोल्हापूर आणि नागपूर या केंद्रांवरील प्राथमिक फेरीतील विजेते संघ अंतिम फेरीत दाखल झालेत. 26 ते 28 एप्रिल दरम्यान सकाळी 10 ते रात्री 10 आणि 29 एप्रिल रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत अंतिम फेरीतील एकांकिकांचे प्रयोग अहमदनगर येथील माऊली सभागृहात होतील.

29 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता बक्षीस समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडेल..अंतिम फेरीसाठी परीक्षक म्हणून दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, अभिनेत्री – निर्माती श्वेता शिंदे आणि अभिनेता – दिग्दर्शक अद्वैत दादरकर असणार आहेत. यावेळी मराठी आणि हिंदीतील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित राहून स्पर्धकांचा उत्साह वाढवतील. त्यामुळे नाट्यप्रेमींनी कलेच्या या उत्सवात सहभागी होऊन उत्तम एकांकिकांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन अहमदनगर महाकरंडक समितीचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी केलंय.

या स्पर्धेबद्दल अधिक माहिती देतांना नरेंद्र फिरोदिया म्हणाले की, “स्पर्धेचे हे नववे वर्षे आहे. मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलावंतांचे मार्गदर्शन या स्पर्धेला लाभले आहे. अहमदनगर महाकरंडक स्पर्धेमुळॆ महाराष्ट्रभरातील रंगकर्मींना त्यांची कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. कोरोनामुळे दोन वर्षं स्पर्धा होऊ शकली नव्हती. पण दोन वर्षांचा गॅप पडूनही यंदा स्पर्धेला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद उल्लेखनीय आहे”

संबंधित बातम्या

Will Smith In Mumbai : ऑस्कर पुरस्कारामध्ये कानाखाली लगावल्यानंतर विल स्मिथ मुंबई विमातळावर दिसला, सोबत असलेले हे साधू नेमके कोण?

Navneet Rana Films Video: संजय राऊतांच्या ‘C’ ग्रेड अटॅकनंतर नवनीत राणांचे हे चार व्हिडीओ का चर्चेत आहेत ?

Singer Rihanna with Baby Bump: हॉलिवूडची स्टार गायिका रिहाना बेबीबंपसह समुद्र किनाऱ्यावरील फोटो व्हायरल

Non Stop LIVE Update
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.