मुंबई : लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री जन्नत झुबैर (Jannat Zubair) हिने अगदी लहान वयात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते आणि चाहत्यांसाठी व्हिडीओ व फोटो शेअर करत राहते. जन्नतने आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात 2009पासून केली होती. बाल कलाकार म्हणून करिअरची सुरुवात करणारी जन्नत आता कोट्यवधींच्या मालमत्तेची मालकीण बनली आहे (TikTok Star, Social Media Sensation Jannat Zubair Rahmani Net Worth).
आज आपण जन्नतच्या नेट वर्थबद्दल जाणून घेणार आहोत. अभिनेत्री होण्याव्यतिरिक्त ती एक मॉडेल आणि कलाकार देखील आहे. इतक्या लहान वयात ती इंडस्ट्रीतील सर्वात बक्कळ कमाई करणारी अभिनेत्री आहे. जन्नतला जगभरातील तरुणाईकडून खूप प्रेम मिळते आहे. सोशल मीडियावर कोट्यावधी लोक तिला फॉलो करतात.
कॅकनॉज डॉट कॉमच्या अहवालानुसार जन्नत झुबैर या वयातच तब्बल 7 कोटींच्या मालमत्तेची मालकीण आहे. ही सर्व संपत्ती जन्नतने तिच्या व्यवसायात कष्ट करून मिळवली आहे. अगदी लहान वयातच ती एक यशस्वी अभिनेत्री बनली आहे.
अभिनयाव्यतिरिक्त, जन्नत बर्याच ब्रँडसाठी काम करते आणि अँडॉर्स करते. ज्यामुळे तिची संपत्ती लक्षणीय वाढली आहे.
View this post on Instagram
जन्नत पूर्वी टीकटॉक स्टार फैजल शेखसोबत दिसली होती. मीडिया रिपोर्टनुसार, दोघेही एकमेकांना डेट करत आहेत. पण, फैजल यांनी नंतर हे स्पष्ट केले की, हे दोघेही चांगले मित्र आहेत आणि दुसरे काहीच नाही.
जन्नतने आपल्या करिअरची सुरुवात सन 2009 मध्ये एका टीव्ही मालिकेद्वारी केली. या शोमधून तिला फारशी ओळख मिळालेली नाही. त्यानंतर, 2011मध्ये जन्नत ‘फुलवा’ या शोमध्ये दिसली होती, ज्याने तिला एक वेगळी ओळख मिळवून दिली. जन्नतला ‘फुलवा’ मधून घरोघरी ओळख मिळाली. त्यानंतर तिने अनेक मालिकांमध्ये आणि चित्रपटांत काम केले आहे.
(TikTok Star, Social Media Sensation Jannat Zubair Rahmani Net Worth)
Photo : ‘वडिलांसोबत चित्रपट बघताना अचानक आला इन्टिमेट सीन…’, तापसी पन्नूनं शेअर केल्या आठवणी
ED चा बॉलिवूडकडे मोर्चा, नववधू अभिनेत्री यामी गौतमला समन्स, पुढील आठवड्यात झाडाझडती