Dubai Returns | तब्बल 16 वर्षांपूर्वी चित्रित झाला होता इरफान खानचा चित्रपट, बांद्रा फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार प्रीमियर!

दिवंगत बॉलिवूड अभिनेता इरफान खान (Irrfan Khan) यांचा ‘दुबई रिटर्न’ (Dubai Return) हा चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही. आदित्य भट्टाचार्य दिग्दर्शित इरफानचा हा चित्रपट 2005मध्ये बनला होता. बर्‍याच कारणांमुळे हा चित्रपट थिएटरमध्ये किंवा ओटीटीमध्ये प्रदर्शित झाला नाही.

Dubai Returns | तब्बल 16 वर्षांपूर्वी चित्रित झाला होता इरफान खानचा चित्रपट, बांद्रा फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार प्रीमियर!
इरफान खान
Follow us
| Updated on: Jul 02, 2021 | 2:14 PM

मुंबई : दिवंगत बॉलिवूड अभिनेता इरफान खान (Irrfan Khan) यांचा ‘दुबई रिटर्न’ (Dubai Return) हा चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही. आदित्य भट्टाचार्य दिग्दर्शित इरफानचा हा चित्रपट 2005मध्ये बनला होता. बर्‍याच कारणांमुळे हा चित्रपट थिएटरमध्ये किंवा ओटीटीमध्ये प्रदर्शित झाला नाही. 2005 साली हा चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला होता, परंतु अद्याप तो मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होऊ शकलेला नाही. मात्र, आता टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार हा चित्रपट आता 2021च्या वर्चुअल वांद्रे फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित होणार आहे (Irrfan Khan Starrer Dubai Returns film premier in Virtual Bandra Film Festival).

या चित्रपटात इरफानने एका छोटा गँगस्टर आफताब अंगरेजची भूमिका साकारली होती. रिपोर्ट्सनुसार ‘दुबई रिटर्न्स’ हा विनय चौधरी यांनी लिहिलेला विनोदी चित्रपट आहे. आदित्य भट्टाचार्य यांचा दुसरा चित्रपट ‘राख’ही येथे प्रदर्शित होईल, ज्यात त्याचा मित्र आमिर खान आहे.

‘अंग्रेजी मीडियम’ शेवटचा चित्रपट

दिवंगत अभिनेता इरफान खान याचा शेवटचा चित्रपट ‘अंग्रेजी मीडियम’ हा होता, ज्यात त्याच्यासोबत करीना कपूर खान, राधिका मदन, डिंपल कपाडिया मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी इरफानवर कर्करोगाचा उपचार सुरू होता आणि चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर इरफानची तब्येत पुन्हा बिघडू लागली आणि हा त्याचा शेवटचा चित्रपट ठरला. इरफानला या चित्रपटाचे प्रमोशनही करता आले नाही.

अभिनेता इरफान खान याने 29 एप्रिलला या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्यामुळे कुटुंबीयच नव्हे तर चाहत्यांनाही धक्का बसला आहे. अभिनेता गेल्यानंतर त्यांचा मुलगा बाबिल खान आपल्या वडिलांसोबतच्या आठवणी शेअर करत असतो. पण, त्यानंतर अचानक बाबिलने अभिनेत्याशी संबंधित पोस्ट शेअर करणे बंद केले. जेव्हा एका चाहत्याने याचे कारण विचारले तेव्हा तो म्हणाला होता की, लोकांना असे वाटते की मी त्यांच्या या पोस्टद्वारे स्वत:ची जाहिरात करत आहे, म्हणून मी हे सर्व शेअर करणे थांबवले. होय, दरम्यान, जेव्हा मला वाटेल की वेळ योग्य आहे, तेव्हा मी त्यांच्या आठवणी तुमच्या सर्वांसह शेअर करेन.

बाबिल अभिनयात पदार्पण करणार

बाबिल लवकरच अभिनय क्षेत्रात आपल्या करिअरची सुरूवात करत आहे. अनुष्का शर्माच्या प्रॉडक्शन हाऊसद्वारे निर्मित ‘नेटकाफ्लिक्स’ फिल्म ‘काला’ मध्ये तो दिसणार आहे. या चित्रपटात तृप्ती डिमरी देखील झळकणार आहे. चित्रपटांमध्ये बाबिलला पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. बाबिल देखील आपल्या पदार्पणाविषयी उत्साही आहे.

(Irrfan Khan Starrer Dubai Returns film premier in Virtual Bandra Film Festival)

हेही वाचा :

Photo : ‘वडिलांसोबत चित्रपट बघताना अचानक आला इन्टिमेट सीन…’, तापसी पन्नूनं शेअर केल्या आठवणी

ED चा बॉलिवूडकडे मोर्चा, नववधू अभिनेत्री यामी गौतमला समन्स, पुढील आठवड्यात झाडाझडती

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.