तुनिशा शर्मा हिने आईसाठी सोडली नाही करोडोंची प्रॉपर्टी, आजही किरायाचे घर…

शितल मुंडे, Tv9 मराठी

|

Updated on: Jan 04, 2023 | 4:06 PM

तुनिशाने मालिकेच्या सेटवर शीजान खान याच्याच मेकअप रूममध्ये गळफास घेतला.

तुनिशा शर्मा हिने आईसाठी सोडली नाही करोडोंची प्रॉपर्टी, आजही किरायाचे घर...

मुंबई : बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरूवात करणारी टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मा हिने मालिकेच्या सेटवर गळफास घेत आत्महत्या केली. तुनिशाच्या आत्महत्येनंतर अनेक आरोप केले जात आहेत. तुनिसाच्या आत्महत्येनंतर शीजान खान याला पोलिसांनी अटक केलीये. तुनिशाच्या आईने शीजान खान याच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तुनिशाने मालिकेच्या सेटवर शीजान खान याच्याच मेकअप रूममध्ये गळफास घेतला. तुनिशाच्या आत्महत्येपूर्वी फक्त 15 दिवसांपूर्वीच तुनिशा आणि शीजान खान यांचे ब्रेकअप झाले होते.

आज दिवंगत अभिनेत्री तुनिशा शर्मा हिचा 21 वा वाढदिवस आहे. तुनिशाच्या वाढदिवसानिमित्त तिच्या आईने अगोदरच तयारी करत मुलीला सरप्राईज देण्याचे ठरवले होते. मात्र, 24 डिसेंबरलाच तुनिशा शर्मा हिने जगाचा निरोग घेतलाय.

तुनिशाच्या वाढदिवसाच्या दिवशी तुनिशाची आई वनिता शर्मा यांनी माध्यमांसोबत संवाद साधलाय. तुनिशाच्या आत्महत्येनंतर सांगितले जात होते की, तुनिशाने करोडो रूपयांची संपत्ती मागे सोडली आहे.

आज बोलताना तुनिशाच्या आईने हे स्पष्ट केले आहे की, आमच्याकडे स्वत: चे घर देखील नाहीये. गाडी किंवा तुनिशाचा लॅपटाॅप वगैरे हे सर्वकाही ईएमआयवर घेतलेले आहे. आम्ही किरायाच्या घरात राहात असल्याचे तुनिशाच्या आईने सांगितले.

तुनिशाने तिच्या मागे आलिशान घर वगैरे सोडले हे सर्व चुकीचे असल्याचे तिच्या आईने म्हटले आहे. तुनिशाच्या आईने पुढे म्हटले की, तुनिशाला सर्व लग्जरी गोष्टी आवडायच्या. यावेळी तुनिशाच्या आईने हे देखील स्पष्ट केले आहे की, यानंतर त्या मुंबईमध्ये राहणार नाहीयेत. त्या फक्त तुनिशासाठी मुंबईमध्ये राहात होत्या.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI