अंकिता लोखंडेच्या वाढदिवसानिमित्त नवऱ्याने शेअर केली खास पोस्ट, वाचा काय आहे नेमके पोस्टमध्ये!

अंकिता लोखंडेच्या वाढदिवसानिमित्त नवऱ्याने शेअर केली खास पोस्ट, वाचा काय आहे नेमके पोस्टमध्ये!
अंकिता लोखंडे

अभिनेत्री अंकिता लोखंडे हिच्यासाठी आजचा दिवस खूप खास आहे. आज अंकिताचा वाढदिवस आहे. अंकिताने नुकतेच बॉयफ्रेंड विकी जैनसोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर अंकिताचा हा पहिलाच वाढदिवस आहे. जो खास बनवण्यासाठी तिचा पती विकी कोणतीही कसर सोडत नाहीये.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Dec 19, 2021 | 11:58 AM

मुंबई : अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिच्यासाठी आजचा दिवस खूप खास आहे. आज अंकिताचा वाढदिवस आहे. अंकिताने नुकतेच बॉयफ्रेंड विकी जैनसोबत  (Vicky Jain) लग्नगाठ बांधली. लग्नानंतर अंकिताचा हा पहिलाच वाढदिवस आहे. जो खास बनवण्यासाठी तिचा पती विकी कोणतीही कसर सोडत नाहीये. विकीने सोशल मीडियावर अंकिताला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. विकीची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

अंकिताच्या वाढदिवसानिमित्त विकीची खास पोस्ट

विकी आणि अंकिताने 14 डिसेंबरला लग्न केले आहे. हा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. लग्नाला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. अंकिता आणि विकीने लग्नाच्या प्रत्येक फंक्शनचा मनापासून आनंद घेतला. आता विकीने एक अतिशय चांगला फोटो शेअर करत अंकिताला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. फोटो शेअर करताना विकीने लिहिले आहे की, वाढदिवसाच्या शुभेच्छा मिसेज जैन…

चाहत्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या

विकीच्या पोस्टवर अनेक सेलेब्स कमेंट करून अंकिताला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. एका चाहत्याने लिहिले की, वाढदिवसाच्या शुभेच्छा मिसेज जैन. दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, तुम्ही दोघे एकत्र खूप छान दिसत आहात. काही दिवसांपूर्वी एका पार्टीत अंकिता आणि विकीने कॅमेरासमोरचुंबन घेत खळबळ उडवून दिली होती.

मराठमोळ्या पद्धतीने लग्न

पवित्र रिश्ता या टीव्ही मालिकेमुळे अंकिता लोखंडे सर्वांची लाडकी झाली होती. त्यादरम्यान ती सुशांत सिंह राजपूतसोबत नात्यात होती. पण नंतर त्यांचे नाते तुटले. नाते तुटल्यानंतरही अंकिता सुशांत सिंह राजपूतची चांगली मैत्रीण म्हणून त्याच्या आयुष्यात राहिली. पण, सुशांत सिंहने फार कमी वेळात या जगाचा निरोप घेतला.

संबंधित बातम्या :

चित्रपटगृहांनंतर आता जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते 2’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर करणार धमाका…जाणून घ्या कधी आणि कुठे प्रदर्शित होणार!

Katrina Kaif- Vicky Kaushal: कॅटरिना कैफने शेअर केला मेहंदीचा फोटो, चाहत्यांनी विचारला ‘हा’ खास प्रश्न!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें