Video: शिवानीसाठी विराजसने घेतला उखाणा; उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला!

झी मराठी वाहिनीवरील 'किचन कल्लाकार'च्या (Kitchen Kallakar) मंचावर प्रेक्षकांना आपल्या आवडत्या कलाकारांची किचनमध्ये उडालेली तारांबळ पाहायला मिळते. या कार्यक्रमाच्या आगामी भागात प्रेक्षकांना एक सेलिब्रिटी जोडपं पाहायला मिळणार आहे.

Video: शिवानीसाठी विराजसने घेतला उखाणा; उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला!
Shivani and Virajas
Image Credit source: Instagram
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Apr 27, 2022 | 10:43 AM

झी मराठी वाहिनीवरील ‘किचन कल्लाकार’च्या (Kitchen Kallakar) मंचावर प्रेक्षकांना आपल्या आवडत्या कलाकारांची किचनमध्ये उडालेली तारांबळ पाहायला मिळते. या कार्यक्रमाच्या आगामी भागात प्रेक्षकांना एक सेलिब्रिटी जोडपं पाहायला मिळणार आहे.अभिनेता विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे (Shivani Rangole) मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहेत आणि ते दोघे या किचनमध्ये एकत्र कल्ला करताना दिसतील. किचन कल्लाकारमध्ये पाककलेसोबतच धमाल मजा मस्ती प्रेक्षकांना पाहायला मिळतेच. या भागात विराजसने शिवानीसाठी एक मजेदार उखाणादेखील घेतला.

“किचन कल्लाकारच्या मंचावर करायचंय आम्हाला श्रीखंड, शिवानी सोबत आहेच आता घेऊ का हे भांड?” हे विराजसचं उखाणं ऐकून एकच हशा पिकला. हे दोघे मिळून पदार्थ कसा बनवतील ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. या दोघांसोबत या भागात रेणुका शहाणे आणि अभिनेता पुष्कराज चिरपुटकरदेखील दिसतील.

पहा व्हिडीओ-

शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. या दोघांची लगीनघाई सुरू झाली असून नुकतंच अभिनेत्री सानिया चौधरीनं त्याचं केळवण केलं आहे. या केळवणाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे दोघं हे गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. 6 जानेवारी रोजी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत या दोघांनी साखरपुडा केला. आता 7 मे रोजी ही जोडी लग्नबंधनात अडकणार आहे. शिवानी लवकरच अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांची सून होणार आहे. विराजस हा प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता आहे. विराजस आणि शिवानी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एकमेकांसोबतचे फोटो नेहमीच शेअर करतात. मात्र सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांच्या लग्नसोहळ्याला जेव्हा दोघांनी एकाच रंगसंगतीचे कपडे परिधान करत हजेरी लावली, तेव्हापासून या दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या.


Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें