Video | तृतीयपंथी आईच्या मुलाचा डान्स पाहून भारावले, मिथुनसह परिणिती, करणचेही डोळे पाणावले!

हर्षला जन्म देणारी आई कुणीतरी वेगळीच होती. एका तृतीयपंथीनं हर्षचं पालनपोषण केलंय. हर्षनं या कार्यक्रमात केलेला परफॉरमन्स त्यानं आपल्याला लहानाचं मोठं करणाऱ्या तृतीयपंथी आईला डेडिकेट केलाय.

Video | तृतीयपंथी आईच्या मुलाचा डान्स पाहून भारावले, मिथुनसह परिणिती, करणचेही डोळे पाणावले!
...आणि हुनरबाजचा संपूर्ण मंच भारावला!
Follow us
| Updated on: Jan 29, 2022 | 11:43 AM

‘हुनरबाज देश की शान’ (Hunarbaz Desh Ki Shaan) हा रियालिटी शो सध्या कलर्सवर (Colors TV) गाजतोय. या शोमध्ये वेगवेगळे स्पर्धक आपलं टॅलेंट दाखवण्यासाठी मंचावर येत असतात. नुकताच या शोमध्ये आलेल्या एका मुलानं आपल्या तृतीयपंथी आईसाठी डान्स डेडिकेट केला. मुलाची गोष्ट ऐकून चक्क या स्पर्धेतली परीक्षकांनाही भावना अनावर झाल्या. मिथुन चक्रवर्तीसह करण जोहर आणि परिणितीचेही डोळे या मुलाची गोष्ट ऐकून पाणावले होते. हुनरबाज देश की शान या शोमध्ये मिथुन चक्रवर्ती (Mithun chakraborty), परिणिति चोप्रा (Parineeti Chopra) आणि करण जोहर हे परीक्षकांच्या भूमिकेत दिसून आले आहेत. तर हर्ष लिंबाचिया आणि भारती सिंह या रीयालिटी शोचं सूत्रसंचालकाच्या भूमिकेत आहेत. नुकत्यात रीलिज करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या नव्या प्रोमोत शोच्या तिन्हीही परीक्षकांना अश्रू अनावर झाल्याचं दिसून आलं आहे. याचं कारण ठरलंय, एका स्पर्धकानं दिलेला एक हृदयस्पर्शी परफॉरमन्स!

हर्ष नावाचा एक स्पर्धक या हुनरबाजमध्ये आला होता. तारे जमीं पर या सिनेमातील माँ, या गाण्यावर त्यानं अत्यंत हृदयस्पर्शी असा डान्स परफॉरमन्स केला. हर्षचा डान्स आणि त्यांच्या आयुष्याची गोष्ट दोन्हीही हृदयस्पर्शी आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आपला परफॉरमन्स झाल्यानंतर हर्षनं आपल्या आयुष्याबद्दल आणि आपल्या आईबद्दल जेव्हा परीक्षकांना सांगितलं, तेव्हा सगळ्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं.

काय आहे हर्षची कहाणी?

हर्षला जन्म देणारी आई कुणीतरी वेगळीच होती. एका तृतीयपंथीनं हर्षचं पालनपोषण केलंय. हर्षनं या कार्यक्रमात केलेला परफॉरमन्स त्यानं आपल्याला लहानाचं मोठं करणाऱ्या तृतीयपंथी आईला डेडिकेट केलाय. खायचेही वांदे एकेकाळी असणाऱ्या हर्ष आणि त्याच्या आईनं अत्यंत बिकट परिस्थितीतून आयुष्यात संघर्ष केलाय. दरम्यान, हर्षमुळे मला आई होण्याच भाग्य लाभलं, असं त्याच्या आईनं म्हटलंय. तर तृतीयपंथींबाबत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी या मंचावरुन आपण संदेश देण्यासाठी आलो असल्याचं हर्षनं सांगितलंय.

हर्षचा परफॉरमन्स आणि त्याच्या आईला भेटून सगळेच गलबलून गेले होते. हर्ष आणि त्याच्या आईला पाहून आपल्याला माणूसकी दिसल्याची भावना करण जोहरनं व्यक्त केली आहे. दर्मयान, परिणिती चोप्रा आणि मिथुनदा देखील स्वतःला रोखू शकले नाही. सगळ्यांचे डोळे हर्ष आणि त्याच्या आईची कहाणी ऐकून पाणावले होते.

पाहा व्हिडीओ –

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

संबंधित बातम्या :

राखी बिचुकलेंवर भडकली, म्हणाली त्याने समाधी घेतली आहे; राखीचा पतीसोबतचा व्हिडीओ व्हायरल

Shweta Tiwari Viral Video : ‘तर मी माफी मागते!’, भोवती टीकेचं वादळ घोंगावत असताना श्वेता तिवारीचा माफीनामा

काखेतील केसांचा फोटो शेअर करत अभिनेत्री तिलोत्तमा म्हणते, ‘मी माफी मागणार नाही म्हणजे नाही!

Non Stop LIVE Update
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.