तिरस्कारापेक्षा अधिक प्रेक्षक मालविकाचं कौतुक होतं, अभिनेत्री अदिती सारंगधरने व्यक्त केल्या भावना!

झी मराठी वरील 'येऊ कशी तशी मी नांदायला' या लोकप्रिय मालिकेला प्रेक्षकांनी सुरुवाती पासूनच पसंती दर्शवली. प्रेक्षकांनी या मालिकेवरच नाही तर त्यातील व्यक्तिरेखांवर देखील प्रेमाचा वर्षाव केला आहे. शकू, नलू, ओम, स्वीटू, चिन्या, रॉकी आणि मालिकेतील सर्व पात्र ही प्रेक्षकांना आपलीशी आणि आपल्यातलीच एक वाटतात.

तिरस्कारापेक्षा अधिक प्रेक्षक मालविकाचं कौतुक होतं, अभिनेत्री अदिती सारंगधरने व्यक्त केल्या भावना!
आदिती सारंगधर

मुंबई : झी मराठी वरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या लोकप्रिय मालिकेला प्रेक्षकांनी सुरुवाती पासूनच पसंती दर्शवली. प्रेक्षकांनी या मालिकेवरच नाही तर त्यातील व्यक्तिरेखांवर देखील प्रेमाचा वर्षाव केला आहे. शकू, नलू, ओम, स्वीटू, चिन्या, रॉकी आणि मालिकेतील सर्व पात्र ही प्रेक्षकांना आपलीशी आणि आपल्यातलीच एक वाटतात. इतकंच काय तर या मालिकेतील खलनायिका म्हणजेच मालविका या व्यक्तिरेखेला देखील प्रेक्षकांनी उचलून धरलं आहे (Yeu Kashi Tashi Me Nandayla Malvika Fame Actress Aditi Sarangdhar open up about character).

मालविकाची व्यक्तिरेखा अभिनेत्री अदिती सारंगधर अगदी चोख साकारतेय. तिला यासाठी प्रेक्षकांकडून भरगोस प्रतिसाद देखील मिळतोय.

मालविका साकारताना रडू यायचं!

ही लोकप्रिय नकारात्मक व्यक्तिरेखा आणि त्याला मिळणारा प्रतिसाद याबद्दल बोलताना अदिती म्हणाली, ‘माझ्या 20 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये मी पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका निभावतेय. नकारात्मक भूमिकाच करायची आहे असं मी ठरवलं नव्हतं. पण कुटुंबासाठी वेळ आणि चित्रीकरणाचे तास हे गणित जुळवून काम करण्याची इच्छा होती. सुरुवातीला मालविकाचं पात्र साकारताना मला अक्षरशः रडू यायचं. कारण अशा प्रवृत्तीची माणसं मी माझ्या आजूबाजूला कधी पाहिली नाहीत.’

‘पण हळू हळू ते पात्र मी समजू लागले. मालविका ही एक कणखर आणि बेधडक व्यक्ती आहे. मालिकेत जरी माझी भूमिका नकारात्मक असली तरीही त्यातून शिकण्यासारखं बरच काही आहे. ‘घरातल्या व्यक्तींशी कसं वागू नये’ हे दाखवण्याचं काम मालविकाने केलं आहे. आता मला हे पात्र साकारताना खूप मजा येते. प्रेक्षक मालविकाचा जितका तिरस्कार करतात, तितकंच किंबहुना त्याहूनही जास्त मालविकाचं कौतुक करतात.’

स्वीटूचंही होतंय कौतुक!

या मालिकेत अभिनेत्री अन्विता फलटणकर ‘स्वीटू’ची भूमिका सकारात आहे. शरीराने काहीशी जाड पण मानाने अगदी निर्मल आणि संस्कारी स्वीटू सगळ्याच प्रेक्षकांना भावते आहे.

मालिकेची कथा

लग्न म्हणजे केवळ दोन व्यक्तींचं एकत्र येणं नव्हे, तर या नात्यात दोन कुटुंब जोडली जातात.आपलं माहेर, हक्काची माणसं सोडून मुलगी नव्या घरात जाते आणि तिथल्या माणसांना आपलसं करते. प्रत्येक गोष्ट शेअर करायला नवरा जरी सोबत असला तरीदेखील अनेकदा मुलींना त्यांच्या मैत्रिणींची उणीव भासत असते. परंतु, जर अशावेळी सासूचं मुलीची मैत्रीण झाली तर? खरं तर सासू-सुनेमधील मैत्रीचं हे नातं फार कमी वेळा पाहायला मिळतं. परंतु, येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत असंच सासू-सुनेचं मैत्रीचं नातं पाहायला मिळणार आहे.

(Yeu Kashi Tashi Me Nandayla Malvika Fame Actress Aditi Sarangdhar open up about character)

हेही वाचा :

Heennaa Panchaal | ‘ती निर्दोष असल्याने, कोणाचीही भीती नाही’, ड्रग्ज प्रकरणी अटकेत असलेल्या हीना पांचाळला बहिणीचा पाठींबा

‘प्रार्थना महत्वाची की प्रार्थनेचा आवाज?’, विचार करायला लावणारा ‘भोंगा’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI