AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिनेमाचा सीन की खरं आयुष्य.. थलपती विजय यांचा व्हिडीओ पाहून नेटकरीही चक्रावले

अभिनेते विजय यांना तमिळनाडूचे मुख्यमंत्री बनण्यापासून रोखण्यासाठी डीएमके आणि एआयएडीमके यांच्यात युती होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच विजय यांच्या 'सरकार' या चित्रपटातील एक सीन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सिनेमाचा सीन की खरं आयुष्य.. थलपती विजय यांचा व्हिडीओ पाहून नेटकरीही चक्रावले
थलपती विजयImage Credit source: Instagram
| Updated on: May 07, 2026 | 4:02 PM
Share

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सध्या तिथलं राजकारण चांगलंच चर्चेत आलं आहे. अभिनेते थलपती विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) या पक्षाने ऐतिहासिक यश मिळवलं आहे. 234 पैकी 108 जागांवर टीव्हीकेनं विजय मिळवला आहे. परंतु विजय यांना राज्याचे मुख्यमंत्री होण्यापासून रोखण्यासाठी डीएमके आणि एआयएडीमके यांच्यात युती होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. या दोन्ही विरोधी पक्षांच्या युतीची बातमी किती खरी आहे, हे स्पष्ट नसलं तरी थलपती विजय यांचा मुख्यमंत्री होण्यापर्यंतचा प्रवास काही सोपा नाही, हे मात्र स्पष्ट दिसतंय. अशातच तमिळनाडूच्या राजकारणात सध्या जो ट्विस्ट पहायला मिळतोय, तसाच हुबेहूब सीन विजय यांच्या एका चित्रपटातही दिसला होता.

2018 मध्ये विजय यांचा ‘सरकार’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटातील एक सीन सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. विजय यांच्यासोबत सध्या तसाच फिल्मी सीन सुरू असल्याच्या प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. ‘जेव्हा एखादा चित्रपट रिअॅलिटीमध्ये बदलतो..’ असेही कमेंट्स नेटकऱ्यांनी केले आहेत. चित्रपटातील या सीनमध्ये विजय हे मुख्यमंत्री होणार असतात. परंतु त्याआधी तमिळनाडूमधील दोन मोठे राजकीय पक्ष एकत्र येऊन त्याच्यासमोर अडथळा आणतात. खऱ्या आयुष्यातसुद्धा विजयसोबत हेच घडताना पाहून नेटकरी चकीत झाले आहेत.

बुधवारी विजय यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्याचा दावा केला. त्यांच्या टीव्हीके पक्षाने निवडणुकीत 108 जागा जिंकल्या असून बहुमताचा आकडा 118 आहे. काँग्रेसने टीव्हीकेला पाठिंबा दिल्याने त्यांचा आकडा 113 वर पोहोचला आहे. त्यानुसार विजय यांच्या पक्षाने 113 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र राज्यपालांना सादर केलं. मात्र राज्यपालांनी 118 आमदारांची मागणी केली. बहुमत मिळवण्यासाठी विजय यांनी त्यांच्याकडे अधिक वेळ मागितला आहे. अशातच डीएमके आणि एआयएडीमके एकत्र येण्याच्या बातम्या पसरू लागल्या आहेत. डीएमकेनं 51 जागा जिंकल्या आहेत, तर एआयएडीएमकेनं 47 जागा. या दोघांनी युती केली तरी 106 जागा होतात. त्यामुळे त्यांच्याकडेही बहुमत नाही.

विजय यांचा मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी आज (गुरुवारी) किंवा उद्या (शुक्रवारी) घेण्याचं नियोजन होतं. मात्र विजय यांनी बुधवारी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेतल्यानंतर राजकीय घडामोडींनी अनपेक्षित वळण घेतलं. सरकार स्थापनेचं निमंत्रण देण्यापूर्वी पक्षाने पाठिंब्याबाबत पुरावे द्यावेत, असं राज्यपालांनी सांगितल्याचं समजतंय. त्यामुळे शपथविधी लांबणीवर पडला आहे.

Follow Us
पद्मसिंह पाटलांच्या निर्दोष मुक्ततेनंतर मोठं घडणार; 8-10 दिवसांतच...
पद्मसिंह पाटलांच्या निर्दोष मुक्ततेनंतर मोठा निर्णय; 8-10 दिवसांतच... नातू मल्हार पाटलाने दिली सविस्तर माहिती
बापरे! थेट पूलच कोसळला, खडीने भरलेला ट्रक दरीत, पण ड्रायव्हर...
Video | बापरे! थेट पूलच कोसळला, खडीने भरलेला ट्रक दरीत, पण ड्रायव्हर...
लोकलचा दरवाजा बंद कर म्हणणं जीवावर बेतलं! 22 वर्षीय तरुणाची चाकूने....
मोठी बातमी! लोकलचा दरवाजा बंद कर म्हणणं जीवावर बेतलं! 22 वर्षीय तरुणाची चाकूने हत्या, नेमकं घडलं काय?
पेणमधील मुर्तीकारांची मेहनत पाण्यात! गणेशोत्सव काही महिन्यांवर असतानाच
पेणमधील मुर्तीकारांची मेहनत पाण्यात! गणेशोत्सव काही महिन्यांवर असतानाच भयंकर घडलं...
पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई! कुर्ला-सायनमध्ये पाण्यामुळे वाहतूक कोलम
Mumbai Rain Traffic | पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई! कुर्ला-सायनमध्ये पाण्यामुळे वाहतूक कोलमडली
टीका, ट्रोलिंग अन् राजकीय गदारोळ; वाद वाढताच नार्वेकरांनी मागितली माफी
Rahul Narvekar | टीका, ट्रोलिंग अन् राजकीय गदारोळ; वाद वाढताच राहुल नार्वेकरांनी मागितली माफी, जे घडलं ते चुकीचं...
अखरे प्रकरण पेटलंच! रिक्षावाल्यांसारखं नार्वेकरांनाही मारायचं का?
अखरे प्रकरण पेटलंच! रिक्षावाल्यांसारखं नार्वेकरांनाही मारायचं का? बड्या नेत्याचं ते तुफान विधान चर्चेत
ते नार्वेकर नाही, नॉर्वेकर! राऊतांचा विधानसभा अध्यक्षांवर हल्लाबोल
Sanjay Raut UNCUT | ते नार्वेकर नाही, नॉर्वेकर! संजय राऊतांचा विधानसभा अध्यक्षांवर हल्लाबोल, थेट पदावरून...
तर मी पेपरवेटच फेकून मारला असता; संजय राऊतांचं थेट विधानसभा अध्यक्ष...
Sanjay Raut | तर मी पेपरवेटच फेकून मारला असता; संजय राऊतांचं थेट विधानसभा अध्यक्षांबाबत खळबळजनक विधान
मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन मागे; 3 दिवसांच्या...
CM Fadnavis | मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन मागे; 3 दिवसांच्या आंदोलनानंतर रात्री उशिरा अंत्यसंस्कार, नेमकं काय घडलं?