Video | चक्क चेहरा लपवत जवान चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये पोहचली ‘ही’ अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल
शाहरुख खान याचा जवान हा चित्रपट आज रिलीज झालाय. विशेष म्हणजे या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठे क्रेझ हे बघायला मिळत आहे. शाहरुख खान याचा हा चित्रपट मोठा धमाका करेल असे सांगितले जात आहे. शाहरुख खान याचा काही दिवसांमध्येच आता डंकी चित्रपट रिलीज होईल.

मुंबई : शाहरुख खान याचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असा जवान हा चित्रपट (Movie) आज रिलीज झालाय. विशेष म्हणजे सकाळी सहापासूनच चाहत्यांनी थिएटरमध्ये हा चित्रपट बघण्यासाठी मोठी गर्दी केल्याचे हे बघायला मिळाले. शाहरुख खान (Shah Rukh Khan) याच्या जवान चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये एक मोठी क्रेझ बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे शाहरुख खान हा देखील जवान चित्रपटाचे धमाकेदार पद्धतीने प्रमोशन करताना दिसला. शाहरुख खान याचा दुबईतील एका क्लबमधील व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसला.
दुबईच्या क्लबमध्ये आपल्या चाहत्यांसोबत धमाल करताना शाहरुख खान हा दिसला. शाहरुख खान याने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर एक खास सेशन घेतले. या सेशनमध्ये शाहरुख खान हा आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना देखील दिसला. शाहरुख खान याचा शेवटी जवान हा चित्रपट रिलीज झालाय.
शाहरुख खान याच्या चाहत्यांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण हे बघायला मिळतंय. कारण शाहरुख खान याचे एका मागून एक असे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आता जवान चित्रपटानंतर लगेचच शाहरुख खान याचा डंकी हा चित्रपट देखील रिलीज होईल. यापूर्वीच रिलीज झालेला पठाण हा चित्रपट शाहरुख खान याचा सुपरहिट ठरलाय.
View this post on Instagram
शाहरुख खान याच्या जवानची क्रेझ फक्त चाहत्यांमध्येच नाही तर कलाकारांमध्येही बघायला मिळत आहे. बाॅलिवूड अभिनेत्री राधिका मदान ही देखील थेट शाहरुख खान याचा चित्रपट बघण्यासाठी पोहचलीये. मुंबईमध्ये शाहरुख खान याचा जवान चित्रपट बघण्यासाठी पोहचलेली राधिका मदान ही थिएटरबाहेर स्पाॅट झाली. यावेळी राधिका ही चेहरा लपवताना देखील दिसली.
आता राधिक मदान हिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत. शाहरुख खान याचा पठाण चित्रपटाच्या अगोदर 2019 मध्ये झिरो हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, शाहरुख खान याचा झिरो हा चित्रपट फ्लाॅप गेला. ज्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. तेंव्हापासून शाहरुख खान हा मोठ्या पडद्याापासून दूर होता.
