AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तरुणीला 6 आत्म्यांनी झपाटलेलं… 67 वेळा उतरवली भूतबाधा, पण तिचा वेदनादायी मृत्यू; हैराण करणारं रहस्य….

एनालिस मिशेल या तरुणीबद्दल फार कोणाला माहिती नसेल. एनालिसा हिने लहान वयाचं असं काही भोगलं आहे, ज्यामुळे अखेर तिने अखेरचा श्वास घेतला... तिला 6 भयानक आत्म्यांनी झपाटलं होतं... जाणून घ्या त्या तरुणीबद्दल...

तरुणीला 6 आत्म्यांनी झपाटलेलं... 67 वेळा उतरवली भूतबाधा, पण तिचा वेदनादायी मृत्यू; हैराण करणारं रहस्य....
| Updated on: May 16, 2026 | 9:23 AM
Share

हॉरर सिनेमा पाहण्याचा एक वेगळाच थ्रिल असते… ते अचानक घाबरवणारे प्रसंग आणि भयानक माणसं मोठ्या पडद्यावर, काही क्षणांसाठी का होईना, बघायला मजा येते. अनेक हॉरर सिनेमे केवळ दिग्दर्शकाच्या कल्पनेतून तयार होतात, पण काही वास्तविक जीवनातून प्रेरित असतात. हॉलिवूडची ‘द कॉन्जरिंग’ सिनेमा सीरिड ही घरांतून भूत किंवा आत्मा बाहेर काढण्याचं काम करणाऱ्या एका खऱ्याखुऱ्या जोडप्यावर आधारित होती. मात्र एक सिनेमा असा देखील आहे, जो सत्या घटनेवर आधारित आहे… ज्या सिनेमाबद्दल फार कोणाला माहिती देखील नाही.

20 वर्षांपूर्वी एक सिनेमा प्रदर्शित झालेला सिनेमाचं नाव होतं, ‘द एक्सॉर्सिज्म ऑफ एमिली रोझ’, एक सिनेमा ज्यामध्ये सुपरनॅचुरल हॉररसोबतच प्रेक्षकांना कोर्ट रुम ड्रामा देखील अनुभवता आला. सिनेमाची कथा एक जर्मन तरुणी एनालिस मिशेल हिच्या भोवती फिरत आहे. तरुणीचं वयाच्या 23 व्या वर्षी निधन होतं.

एनालिझ मिशेलची कथा भुतांवर विश्वास न ठेवणाऱ्यांसाठी एक आव्हान आहे. 1952 मध्ये एका ख्रिश्चन कुटुंबात जन्मलेल्या तिच्या कुटुंबातील प्रत्येकाचा त्यांच्या देवावर पूर्ण विश्वास होता. पण 1968मध्ये, जेव्हा अ‍ॅनालिझ 16 वर्षांची झाली, तेव्हा तिचं आयुष्य पूर्णपणे बदललं. एनालिस सतत आजारी पडू लागली, एवढंच नाही तर, विचित्र गोष्टी घडत असल्याची आणि आवाज ऐकू येत असल्याची ती तक्रार करू लागली.

डॉक्टर आणि धर्मगुरूही अयशस्वी

जेव्हा एनालिस हिला डॉक्टरांकडे नेण्यात आलं, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. एनालिस हसूही शकत नव्हती आणि खाऊ देखील शकत नव्हती. दिवसागणिक तिची प्रकृती खालावत होती. ज्यामुळे डॉक्टर आणि कुटुंबिय देखील घाबरले होते… काही दिवसांनंतर एनालिस हिच्यावर उपचार करणं देखील थांबवण्यात आलं… कारण कुटुंबियांना कळलं होतं की, एनालिस हिच्यावर कोणत्या तरी वाईट शक्तीचा प्रभाव आहे… पण कुटुंबियांना माहिती नव्हतं की, एनालिस हिला 6 आत्म्यांनी झपाटलेलं आहे.

सांगायचं झालं तर, इंटरनेटवर एनालिस हिचे अनेक व्हिडीओ आहेत. एनालिस हिची प्रकृती स्थिर करण्यासाठी कुटुंबियांनी अनेक प्रयत्न केले. यापैकी एक म्हणजे भूतबाधा उतरवणं. एनालिसला वेगवेगळ्या चर्चमध्ये नेण्यात आलं आणि तिच्यावर भूतबाधा उतरवण्याचे विधी करण्यात आले. अनेक उच्चपदस्थ धर्मगुरूंनी तिच्यावर भूतबाधा उतरवण्याचे विधी केले, परंतु ते तिच्यातील सहा आत्म्यांना बाहेर काढू शकले नाहीत. असं म्हटलं जातं की, ही प्रक्रिया एनालिसवर अंदाजे 67 वेळा करण्यात आली, परंतु तिच्यावर काहीही परिणाम झाला नाही.

असं देखील सांगितलं जातं की, एनालिस हिच्यावर ल्युसिफर, केन, ज्युडास इस्कारिओट, ॲडॉल्फ हिटलर, नीरो आणि फ्लेशमन यांच्या आत्म्यांचा ताबा होता. मात्र, डॉक्टरांनी अद्याप या दाव्याची पुष्टी केलेली नाही, त्याचप्रमाणे त्यांनी एनालिसमध्ये आत्म्यांचं अस्तित्वही मान्य केलेलं नाही. भूतबाधा उतरवण्याच्या विधींदरम्यान, एनालिसला जाड साखळ्यांनी बांधलं जात असे, कारण ती कधीकधी खूप हिंसक बनत असे. तिने सुमारे सात वर्षे हे सहन केलं.

याकाळात अनेक जण एनालिस हिला घाबरु लागले होते. मृत्याच्या बरोबर एक दिवस आधी 30 रोजी एनालिस हिच्यावर असलेली भूतबाधा उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला. पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही. त्यानंतर एनालिस स्वतःच प्रचंड थकली आणि तिने मृत्यूची इच्छा व्यक्त केली… 1 जून 1976 रोजी एनालिस हिने अखेरचा श्वास घेतला…

Follow Us
मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर
Breaking! मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर, प्रशासन अॅक्शन मोडमध्ये
'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं
Sunetra Pawar | 'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं भावनिक विधान
कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
Heavy Rain | कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! अचानक मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
NDAमध्ये शरद पवारांची एन्ट्री? जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्...
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्... भुस्खलनाचा थरारक व्हिडीओ समोर
मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
Amit Satam | मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही पूरस्थितीचा फटका
खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा
Navi Mumbai | खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता...
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता या शहरावर ओढावलं ढगफुटीचं संकट
संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा...
Ashadhi Wari 2026 | संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा, विठ्ठल... विठ्ठलच्या गजरात दुमदुमलं पैठण