AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Controversy | ‘The Family Man 2’च्या वादावर मनोज बाजपेयीचं जाहीर निवेदन, सोशल मीडियावर पोस्ट लिहित म्हणाले…

'द फॅमिली मॅन 2'  (The Family Man 2 ) ही बहुप्रतिक्षित वेब सीरीज गेल्या काही दिवसांपासून बरीच वादात अडकली आहे. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर शोमध्ये तमिळ लोकांना दहशतवादी म्हणून दाखविल्याचा आरोप केला जात आहे.

Controversy | ‘The Family Man 2’च्या वादावर मनोज बाजपेयीचं जाहीर निवेदन, सोशल मीडियावर पोस्ट लिहित म्हणाले...
'द फॅमिली मॅन 2'
| Updated on: May 26, 2021 | 10:24 AM
Share

मुंबई : ‘द फॅमिली मॅन 2’  (The Family Man 2 ) ही बहुप्रतिक्षित वेब सीरीज गेल्या काही दिवसांपासून बरीच वादात अडकली आहे. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर शोमध्ये तमिळ लोकांना दहशतवादी म्हणून दाखविल्याचा आरोप केला जात आहे. ते म्हणतात की, या सीरीजमध्ये श्रीलंकेत आपल्या हक्कांसाठी लढा देणाऱ्या तामिळ बंडखोरांना आयएसआयएसशी संबंधित असल्याचे दाखवण्यात आले आहे. तमिळनाडूच्या मंत्र्यांनीही या सीरीजवर बंदी घालावी, अशी मागणी केली आहे. आता मात्र या वेब सीरीजचे निर्माते आणि मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) यांनी यासंदर्भात निवेदन जारी केले आहे (The Family Man 2 Controversy Actor Manoj Bajpayee share makers statement).

निर्मात्यांचे निवेदन पुन्हा पोस्ट करताना मनोजने संपूर्ण टीमच्या वतीने आपले स्पष्टीकरण दिले आहे. त्याने लिहिले की, ‘ट्रेलरचे काही शॉट्स पाहिल्यानंतर सीरीजबद्दल अनेक गृहितक तयार केली जात आहेत. आमच्या शोमधील बरेच कलाकार, क्रिएटिव टीमचे आणि लेखक टीमचे मेंबर्स तामिळ आहेत. आम्हाला तामिळ लोक आणि तामिळ संस्कृतीबद्दल माहित आहे आणि आम्ही तामिळ लोकांचा खूप आदर करतो. त्यांच्यावर प्रेम करतो.’

या निवेदनात पुढे असे लिहिले आहे की, ‘आम्ही बर्‍याच वर्षांपासून या सीरीजसाठी कठोर परिश्रम घेतले आहेत आणि आम्ही प्रेक्षकांसमोर एक संवेदनशील, संतुलित कहाणी या शोच्या पहिल्या सीझनमधून आणली आहे. आम्ही तुम्हा सर्वांना विनंती करतो की, आपण प्रतीक्षा करा आणि शो प्रदर्शित होऊ द्या. आम्ही आशा करतो की, सीरीज पाहिल्यानंतर आपण त्याचे नक्की कौतुक कराल.’

वाचा मनोज बाजपेयीचे स्टेटमेंट

(The Family Man 2 Controversy Actor Manoj Bajpayee share makers statement)

मनु थंगाराज यांचे प्रकाश जावडेकरांना पत्र

तामिळनाडूचे माहिती तंत्रज्ञान मंत्री मनु थंगाराज यांनी केंद्रीय प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून या सीरीजवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. Amazon प्राईमवर रिलीज होणाऱ्या ‘द फॅमिली मॅन 2’ च्या ट्रेलरमध्ये तामिळ लोकांना चुकीच्या पद्धतीने दाखवले गेले आहे. या सीरीजमुळे तामिळनाडूतील लोकांच्या भावनाही दुखावल्या गेल्या आहेत.

समांथावरही निशाणा

ट्रेलर रिलीज झाल्यापासून लोक समांथावरही आपला संताप व्यक्त करत आहेत. ही सीरीज करून समांथाने चूक केल्याचे, लोक म्हणत आहेत. या सीरीजचा तिच्या कारकीर्दीवर देखील प्रभाव पडू शकतो. ‘द फॅमिली मॅन 2’ मनोज बाजपेयी राष्ट्रीय तपास संस्थेमध्ये काम करणाऱ्या ‘श्रीकांत तिवारी’ची भूमिका साकारत आहेत. यापूर्वी हा सीझन फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु कोरोनामुळे त्याची रिलीज लांबणीवर पडली. आता ही सीरीज 4 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये मनोज बाजपेयी, समांथा, सीमा बिस्वास, शरद केळकर, दर्शन कुमार, सनी हिंदुजा, शहाब अली आणि वेदांत सिन्हादेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

(The Family Man 2 Controversy Actor Manoj Bajpayee share makers statement)

हेही वाचा :

Photo: माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धूची मुलगी राबिया नवी इंटरनेट सेन्सेशन; फोटो पाहाच

Arrest Yuvika Choudhary | अटकेच्या भीतीने घाबरली युविका चौधरी, सोशल मीडियावर पोस्ट लिहित मागितली माफी!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.