AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | डेस्क जॉबमध्ये अडकलाय मनोज बाजपेयी, ‘The Family man 2’च्या नव्या प्रोमोत दिसला अनोखा अंदाज!

अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओने बहुप्रतिक्षित वेब सीरीज 'द फॅमिली मॅन 2' (The Family Man 2 ) चा नवीन प्रोमो व्हिडीओ प्रदर्शित केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee ) उर्फ ​​श्रीकांत तिवारी एका डेस्क जॉबवर 'मिनिमम मॅन' म्हणून काम करताना दिसला आहे.

Video | डेस्क जॉबमध्ये अडकलाय मनोज बाजपेयी, ‘The Family man 2’च्या नव्या प्रोमोत दिसला अनोखा अंदाज!
‘द फॅमिली मॅन 2’
| Updated on: May 25, 2021 | 10:50 AM
Share

मुंबई : अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओने बहुप्रतिक्षित वेब सीरीज ‘द फॅमिली मॅन 2’ (The Family Man 2 ) चा नवीन प्रोमो व्हिडीओ प्रदर्शित केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee ) उर्फ ​​श्रीकांत तिवारी एका डेस्क जॉबवर ‘मिनिमम मॅन’ म्हणून काम करताना दिसला आहे. त्याचा हा लूक पहिल्या सिझनमधील त्याच्या लूकपेक्षा वेगळा दिसला आहे (The Family Man 2 new promo released manoj Bajpayee new look).

‘द फॅमिली मॅन 2’ बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. 2019 चा स्मॅश हिट म्हणजेच ‘फॅमिली मॅन’चा हा दुसरा सीझन आहे. पहिल्या सीझनमध्ये चाहत्यांनी या सीरीजचे खूप कौतुक केले होते. सिक्वेलची घोषणा झाल्यापासून चाहते पुढची कहाणी जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. ‘द फॅमिली मॅन 2’च्या ट्रेलरलाही चांगला प्रतिसाद मिळाला. राज आणि डीके मिळून ही वेब सीरीज तयार करत आहेत.

यात साऊथची सुपरस्टार अभिनेत्री समांथा अक्किनेनी देखील एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. समांथा अक्किनेनी या सीरीजमधून तिचा डिजिटल डेब्यू करत आहे.

पाहा नवा प्रोमो

आणखी कोण कोण दिसणार या सीरीजमध्ये?

या वेब सीरीजमध्ये अभिनेता मनोज बाजपेयी आणि अभिनेत्री समांथाशिवाय प्रियामनी, शरिब हाश्मी, सीमा विश्वास, दर्शन कुमार, शरद केळकर, सनी हिंदुजा, श्रेया धनवंतरी, शहाब अली, वेदांत सिन्हा आणि महेक ठाकूर यासारख्या प्रतिभावान कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहेत. यामध्ये माइम गोपी, रवींद्र विजय देवदर्शिनी चेतन, आनंदसामी आणि एन. अलगमपेरूमल सारखे तमिळ मनोरंजन विश्वातले दिग्गज कलाकार देखील आहेत (The Family Man 2 new promo released manoj Bajpayee new look).

आश्वासनाची पूर्तता!

या सीरीजविषयी बोलताना निर्माते राज आणि डीके म्हणाले होते की, “निर्माता म्हणून आम्ही बहुप्रतिक्षित नवीन सीझनचा ट्रेलर रिलीज करण्यासाठी फार काळ वाट पाहत होतो. आम्ही आश्वासन दिले होते की, आम्ही या शोचा नवीन सीझन या वर्षाच्या उन्हाळ्याच्या अखेरीस रिलीज करू आणि प्रेक्षकांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करताना आम्हाला आनंद झाला. आता 4 जून रोजी आमची आणि प्रेक्षकांची या शोच्या नवीन सीझनची प्रतीक्षा संपेल. या शोमध्ये श्रीकांत तिवारी ‘फॅमिली मॅन’ म्हणून परत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या सीरीजमध्ये श्रीकांतची शत्रू म्हणून समांथा अक्किनेनीने जबरदस्त ‘खलनायिकी’ भूमिका केली आहे.

टीझरला उत्स्फूर्त प्रतिसाद

मनोज बाजपेयीची वेब सीरीज ‘द फॅमिली मॅन’ 2019 मध्ये प्रदर्शित झाली होती. या वेब सीरीजला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर या वेब सीरीजचा सीझन 2 आणण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘द फॅमिली मॅन 2’च्या टीझरने देखील भरपूर वाहवा मिळवली. या टीझरमध्ये मनोजची बदललेली स्टाईल पाहायला मिळाली होती. यावेळी प्रेक्षक मोशे जिवंत आहेत की, मृत हे जाणून घेण्याची प्रतीक्षा करत आहेत. या सीरीजमध्ये क्रूर दहशतवादी मुसाची भूमिका अभिनेता नीरज माधव यांनी साकारली होती. या भूमिकेसाठी नीरजला बरीच वाहवा मिळाली होती.

(The Family Man 2 new promo released manoj Bajpayee new look)

हेही वाचा :

पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला, नंतर अचानक गायब झाली रणबीरची अभिनेत्री, जीवघेण्या आजाराशीही दिली होती झुंज!  

हीर जन्मली त्याच गावात जन्म; आयुष्य प्रबोधनाच्या गाण्यांसाठी वेचलं; गायिका शीलादेवींची ही माहिती हवीच

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.