AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

The Kerala Story: केरळमधून 32 हजार महिला बेपत्ता कशा झाल्या? अंगावर काटा आणणारी कहाणी

'द काश्मीर फाइल्स'नंतर आता 'द केरळ स्टोरी'; टीझर पाहून अंगावर काटा येईल!

The Kerala Story: केरळमधून 32 हजार महिला बेपत्ता कशा झाल्या? अंगावर काटा आणणारी कहाणी
The Kerala StoryImage Credit source: Youtube
| Updated on: Nov 03, 2022 | 5:15 PM
Share

मुंबई- केरळ राज्यांतील महिलांबाबत घडलेल्या एका प्रकरणाने संपूर्ण जग हादरलं होतं. केरळमधील 32 हजार महिला संशयास्पदरित्या बेपत्ता झाल्या होत्या. ISIS या दहशतवादी संघटनेने त्यांचं अपहरण केलं होतं. याच घटनेवर आता चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘द केरळ स्टोरी’ असं या चित्रपटाचं नाव आहे. त्याचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. बेपत्ता झालेल्या महिलांसोबत नेमकं काय झालं, हे यातून पहायला मिळणार आहे. या टीझरमध्ये महिला अंगावर काटा आणणारी कथा सांगतेय.

‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित आहे. सुदिप्तो सेन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. या चित्रपटासाठी त्यांनी चार वर्षे संशोधन आणि अभ्यास केला. हा चित्रपट केरळ आणि मँगलोरमधील जवळपास 32 हजार महिलांच्या अपहरणावर आधारित आहे. या चित्रपटाच्या टीझरमध्ये अभिनेत्री अदा खान पहायला मिळत आहे.

या टीझरमध्ये अदा खान तिच्या भूमिकेची ओळख करून देताना म्हणते, “माझं नाव शालिनी उन्नीकृष्णन आहे. मला नर्स बनून लोकांची सेवा करायची होती. पण मी आता फातिमा बा झाली आहे. अफगाणिस्तानच्या तुरुंगात मी एकटी नाही तर माझ्यासारख्या 32 हजार मुली आहेत. ज्यांचं धर्मांतर झालंय. त्यांना सीरिया आणि येमेनच्या वाळवंटात दफन करण्यात आलंय. केरळमध्ये उघडपणे सर्वसामान्य मुलीला दहशतवादी बनवण्याचा भयानक खेळ सुरू आहे. याला कोणी थांबवणार नाही का? ही माझी कहाणी आहे.. ही त्या 32 हजार मुलींची कहाणी आहे.. ही केरळची कहाणी आहे.”

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2009 मध्ये केरळ आणि मँगलोरमधून सुमारे 32 हजार हिंदू आणि ख्रिश्चन मुलींचं अपहरण करण्यात आलं होतं. त्यांना बळजबरीने इस्लाम धर्म स्वीकारायला लावलं होतं. त्यांच्यापैकी बहुतांश मुलींना नंतर सीरिया, अफगाणिस्तान आणि इतर भागात पाठवलं गेलंय. या मुली पुन्हा घरी परतल्याच नाहीत, असं सांगण्यात येतं.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.