लाल सिंह चड्ढा चित्रपटाचे शेवटचे शेड्यूल, चाहत्यांची उत्सुकता शिगेला! 

आमिर खानचा (Aamir Khan) आगामी चित्रपट ‘लाल सिंह चड्ढा’ (Lal Singh Chaddha) गेल्या बर्‍याच दिवसांपासून चर्चेत आहे.

लाल सिंह चड्ढा चित्रपटाचे शेवटचे शेड्यूल, चाहत्यांची उत्सुकता शिगेला! 

मुंबई : आमिर खानचा (Aamir Khan) आगामी चित्रपट ‘लाल सिंह चड्ढा’ (Lal Singh Chaddha) गेल्या बर्‍याच दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटात करिना कपूर खान आमिर खानसोबत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहात आहेत. कारगिलमध्ये आता चित्रपटाचे शेवटचे शूटिंग होणार आहे. (The last scheduled shoot of Lal Singh Chaddha movie)

रिपोर्टनुसार चित्रपटाची टिम कारगिलमधील बर्फ वितळण्याची वाट पाहात आहेत. आमिर खान या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे शिवाय आमिर प्रोजेक्टचा निर्माता देखील आहे. हा चित्रपट सिनेमा घरात रिलीज होणार आहे. लाल सिंह चड्ढा हा गेल्या दोन वर्षातील सर्वाधिक प्रतीक्षित चित्रपटांपैकी एक मानला जातो. या चित्रपटात पुन्हा एकदा आमिर खान आणि करिना कपूर यांची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

2018 मध्ये आमिर खान अखेर मल्टीस्टारर चित्रपट ठग्स ऑफ हिंदुस्तानमध्ये दिसला होता. आमिर खान गेली दोन वर्षे चित्रपटांपासून दूर आहे. आता तो यावर्षी लाल सिंह चड्ढामध्ये दिसणार आहे. याशिवाय आमिर एका मुगल चित्रपटावरही काम करत आहे. यापूर्वी अशी चर्चा होती की, दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतूपतिही या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे पण आमिर आणि विजय सेतूपति यांच्यात सर्व काही ठीक नव्हते, अशी चर्चा होती.

विजय सेतूपतिच्या वाढलेल्या वजनामुळे आमिर खान चिडला होता. यानंतर विजय सेतूपतिने ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट सोडला अशी चर्चा सर्वत्र रंगली होती. मात्र,  या सर्व प्रकरणावर स्वत: विजय सेतूपतिने स्पष्टीकरण दिले आहे. त्याने लाल सिंह चड्ढा चित्रपट सोडण्याचे कारण सांगितले आहे की, तारखांमुळे त्याने हा चित्रपट सोडल्याचे सांगितले आहे. विजय सेतूपतीचा मास्टर चित्रपट मास्टर नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.

संबंधित बातम्या : 

अरे देवा! कंगना वडिलांबाबत हे काय बोलली?; चाहते म्हणाले, थू तुझ्यावर!

Video : अंकिता लोखंडेचा आणखी एक डान्स व्हिडीओ व्हायरल; सुशांतच्या चाहत्यांनी केलं ट्रोल

रणवीर सिंहच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी; ’83’ चित्रपट या तारखेला रिलीज होणार!

(The last scheduled shoot of Lal Singh Chaddha movie)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI