AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय करते जगातील सर्वात श्रीमंत सासूबाईंची सूनबाई, इतक्या कोटींची संपत्ती

The richest mother-in-law in the world: सासूबाई जोरात, तर सूनबाई..., काय करते जगातील सर्वात श्रीमंत सासूबाईंची सून? श्रीमंतांच्या यादीत अव्वल स्थानी... कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असतात चर्चेत...

काय करते जगातील सर्वात श्रीमंत सासूबाईंची सूनबाई, इतक्या कोटींची संपत्ती
| Updated on: Apr 18, 2025 | 2:35 PM
Share

The richest mother-in-law in the world: आपण रोज सासू – सून यांच्यात असलेल्या ३६ च्या आकड्याबद्दल वाचत असतो, ऐकत असतो… पण भारतात एक असं कुटुंब आहे, त्या कुटुंबातील सासूबाईंचं नाव जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अव्वल स्थानी आहे. तर, त्या सासूबाईंच्या सूनबाई देखील कोट्यवधींची कमाई करतात. भारतातील जिंदाल कुटुंबाबद्दल तर तुम्ही ऐकलं असेल. जिंदाल कुटुंब भारतातील प्रतिष्ठित कुटुंबांपैकी एक आहे. जिंदाल कुटुंबातील सावित्री जिंदाल यांचं नाव तुम्ही ऐकलंच असेल. त्या आज देशातील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक आहे आणि जिंदाल ग्रुपचा व्यवसाय सांभाळत आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का सावित्री जिंदाल यांची सून कोण आहे आणि ती काय करते?

सावित्री जिंदल यांची नेटवर्थ…

सावित्री जिंदाल या जगातील श्रीमंतांच्या यादीत अव्वल स्थानी आहेत. फोर्ब्सच्या रिअल टाईम नेट वर्थनुसार, मार्च 2025 पर्यंत सावित्री जिंदाल आणि त्यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती 37.3 अब्ज डॉलर होती. त्यापैकी सावित्री जिंदाल यांची एकूण संपत्ती 270 कोटी रुपये आहे.

भारतातील टॉप ५ श्रीमंत व्यक्तींमध्ये सावित्री जिंदाल 5 व्या क्रमांकावर आहे. यामध्ये मुकेश अंबानी पहिल्या स्थानावर, गौतम अदानी दुसऱ्या स्थानावर, शिव नाडर तिसऱ्या स्थानावर आणि शापूर मिस्त्री चौथ्या स्थानावर आहेत.

सावित्री जिंदाल यांची सून

जिंदाल स्टील ही जगातील सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक आहे. सावित्री जिंदाल यांची सून शालू जिंदाल आहे, जी कुचीपुडी नृत्यांगना आहे आणि राष्ट्रीय बाल भवनची अध्यक्ष आहे. शालू जिंदाल, ज्यांचे पूर्वी नाव ओसवाल असं होतं. त्यांचा जन्म 1970 मध्ये एका पंजाबी कुटुंबात झाला. शालू जिंदाल या शैल ओसवाल आणि पंकज ओसवाल यांची बहीण आणि ओसवाल अ‍ॅग्रो मिल्स आणि ओसवाल ग्रीनटेकची स्थापना करणारे कुमार ओसवाल यांच्या कन्या आहेत.

शालू जिंदाल यांचे पती नवीन जिंदल हे भारतातील एक प्रसिद्ध उद्योगपती आहेत. शालू जिंदाल या जिंदाल स्टील अँड पॉवरच्या सीएसआर शाखा, जिंदाल फाउंडेशनच्या अध्यक्षा देखील आहेत आणि त्या शिक्षण, आरोग्यसेवा आणि ग्रामीण विकास क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत आहेत.

शालू जिंदाल यांचं कलेवर देखील विशेष प्रेम आहे. शास्त्रीय नृत्य आणि संगीत क्षेत्रातील तरुण प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी जिंदल कला संस्थानची स्थापना केली आहे. एवढंच नाही तर, यापूर्वी त्यांनी मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय बालभवनच्या अध्यक्षा म्हणून काम केलं आहे.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.