अक्षय कुमार-परेश रावल धमाल करण्यास सज्ज, लवकरच सुरु होतंय या चित्रपटाचं शूटिंग!

अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि परेश रावल (Paresh Rawal) पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावरसोबत दिसणार आहेत.

अक्षय कुमार-परेश रावल धमाल करण्यास सज्ज, लवकरच सुरु होतंय या चित्रपटाचं शूटिंग!

मुंबई : अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि परेश रावल (Paresh Rawal) पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावरसोबत दिसणार आहेत. 2012 साली प्रदर्शित झालेल्या ‘ओह माय गॉड’ चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले. अक्षय कुमार आणि परेश रावल यांचा जबरदस्त अभिनय प्रेक्षकांनाही आवडला. आता परत एकदा याच चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार या चित्रपटाचे शूटिंग उन्हाळ्यामध्ये सुरू होईल. असं सांगितलं जात आहे की अक्षय, परेश आणि अश्विन बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटावर काम करत होते. (The shooting of the second part of Oh My God movie will start soon)

अक्षय कुमारचे बरेच चित्रपट वर्ष 2021 मध्ये रिलीज होणार आहेत. अक्षय सध्या त्याच्या आगामी बच्चन पांडे चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. काही दिवसांपूर्वी अक्षयने या चित्रपटाचा फस्ट लूक शेअर केला होता. अक्षय कुमार हिंदी चित्रपटसृष्टीचा सर्वात महाग सुपरस्टार बनला आहे. आता तो त्याच्या एका चित्रपटासाठी 135 कोटी शुल्क घेणार आहे.

बॉलिवूड हंगामाच्या वृत्तानुसार, अक्षयने 2022 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांसाठी फी वाढविली आहे. 2020 च्या सुरूवातीस त्याने 102 कोटी शुल्क घेण्याची घोषणा केली होती. नंतर त्याने ते वाढवून 123 कोटी केले. कोरोनापूर्वी त्यांचा सूर्यवंशी हा चित्रपट रिलीज होण्यास तयार होता पण लॉकडाऊनमुळे तो चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही.

अक्षयचा लक्ष्मी हा चित्रपट आधीच तयार होता तो ओटीटी प्लॅटफॉर्म हॉटस्टारवर प्रदर्शित झाला. अक्षय कुमार बॉलीवूडचा असा एक स्टार आहे. ज्याचे एका वर्षामध्ये किमान चार चित्रपट प्रदर्शित होतात. आणि सर्व चित्रपट देखील हिट होतात. यामुळे अशा स्थितीत अक्षय कुमारकडे बरेच चित्रपट येत आहेत. अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटांमध्ये सूर्यवंशी, अतरंगी रे, प्रथमराज, मिशन लायन, राम सेतु आणि रक्षा बंधन या चित्रपटांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या :

Varun Dhawan Car Accident | लग्नाला जाताना वरुण धवनच्या गाडीला अपघात

मोत्यांच्या ड्रेसमध्ये दिसला नोराचा ‘मधुबाला’वाला लूक, डिझायनर कोण?

(The shooting of the second part of Oh My God movie will start soon)

Published On - 10:11 am, Sun, 24 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI