1971 चे चित्तथरारक भारत पाक युद्ध मोठ्या पडद्यावर, ‘नवरदेव’ विकी कौशलचा नवा चित्रपट ‘सॅम बहादूर’, हिरोईन कोण?

1971 चे चित्तथरारक भारत पाक युद्ध मोठ्या पडद्यावर, 'नवरदेव' विकी कौशलचा नवा चित्रपट 'सॅम बहादूर', हिरोईन कोण?
sam bahaadur

दिग्दर्शक मेघना गुलजार यांच्या वाढदिवसानिमित्ताने विक्की कौशलने सोशल मिडीयावर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्याने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा करत चित्रपटातील दोन प्रमुख व्यक्तीरेखी समोर आणल्या आहेत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मृणाल पाटील

Dec 13, 2021 | 3:25 PM

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या एकाच गोष्टीची चर्चा आहे ती म्हणजे विक्की कौशल आणि कॅटरिना कैफ यांच्या लग्नाची. या सुपर कपलनी 9 डिसेंबरला राजस्थानमध्ये लग्न बंधनात अडकले. हे असतानाच दुसरीकडे मात्र दिग्दर्शक मेघना गुलजार यांच्या वाढदिवसानिमित्ताने विक्की कौशलने सोशल मिडीयावर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्याने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा करत चित्रपटातील दोन प्रमुख व्यक्तीरेखी समोर आणल्या आहेत.

दिग्दर्शिक मेघना गुलजार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 

रॉनी स्क्रूवाला निर्मित आणि मेघना गुलजार दिग्दर्शित सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट ‘सॅम बहादूर’ या टिमची ओळख विक्कीने करुन दिली आहे. सोशल मिडीयावर फोटो शेअर करत विक्की कौशलने ”दिग्दर्शिक मेघना गुलजार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘सॅम बहादूर’ मधील प्रमुख भुमिकेत असणाऱ्या महिलांना भेटा” असे कॅप्शन दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

 

प्रमुख भुमिकेत कोण असणार
1971 च्या युद्धात आपल्या लष्कराला मिळालेल्या ऐतिहासिक विजयाला 50 वर्षे पूर्ण झाल्याचा अभिमान आहे. सान्या मल्होत्रा ​​आणि फातिमा सना शेख ‘सॅम बहादूर’च्या टीममध्ये सामील होत आहेत, हा प्रवास खूपच रोमांचक आहे. असे चित्रपटाची दिग्दर्शक मेघना गुलजार यांनी सांगितले,या सिनेमामध्ये सॅम माणेकशॉ यांची मुख्य भुमिका विक्की कौशल साकारणार असून सान्या मल्होत्रा ​​त्यांची पत्नी सिल्लूची भूमिका साकारणार आहे ज्या माणेकशॉ यांच्या आधारस्तंभ आणि शक्ती आहे. फातिमा सना शेख देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे.

सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारीत सिनेमा
माणेकशॉ यांची लष्करी कारकीर्द चार दशके आणि पाच युद्धांची होती. फील्ड मार्शल पदावर पदोन्नती मिळालेले ते पहिले भारतीय सैन्य अधिकारी होते आणि 1971 च्या भारत-पाक युद्धात भारतीय लष्कराचा निर्णायक विजय लष्करप्रमुख म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली झाला होता. विशेष म्हणजे या वर्षी 1971 च्या युद्धाला 50 वर्षे पूर्ण झाली.

हेही वाचा :

Mouni Roy | निळ्याशार समुद्र किनारी मौनी रॉयचा जलवा, बिकिनी लूकने चाहत्यांना केलेय घायाळ!

Video | असं काय झालं की, सारा अली खानला जान्हवी कपूरसोबत टॅक्सीत बसून घरी जावे लागले?

Miss Universe 2021 | कमी वजनाचा देखील ‘भार’ झाला! ‘मिस युनिव्हर्स’ हरनाज संधूलाही करावा लागला ‘बॉडी शेमिंग’चा सामना!

Miss Universe 2021 | Harnaaz Sandhu ला मिस युनिव्हर्सचा किताब, 21 वर्षांनी भारताची उंचावली मान


Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें