फराह खान हिचा स्वयंपाकी दिलीपचे चमकले नशीब, थेट या शोमध्ये दिसणार?, म्हणाला, मला पण…
फराह खान ही मागील काही दिवसांपासून तिच्या ब्लॉगिंगमुळे तूफान चर्चेत आहे. फराह खान तिचा स्वयंपाकी दिलीप याच्यासोबत ब्लॉग तयार करते. विशेष म्हणजे लोकांना या दोघांची जोडी प्रचंड आवडते. कमी वेळात मोठी प्रसिद्धी दिलीपला मिळाली.

फराह खान मागील काही दिवसांपासून यूट्यूब ब्लॉगिंगमुळे चांगलीच व्यस्त दिसत आहे. विशेष म्हणजे फराह खानचे व्हिडीओ लगेचच व्हायरल होतात. कोट्यावधीची कमाई फराह खान ब्लॉगिंगच्या माध्यमातून करते. कूक दिलीपसोबतचे तिचे व्हिडिओ खूप जास्त व्हायरल होताना दिसतात. दिलीप आणि फराह खानची मस्करी लोकांनाही आवडते. विशेष म्हणजे मोठं मोठ्या कलाकारांच्या घरी जाऊन दिलीप जेवण बनवतो. फराह खानने दीड वर्षांपूर्वी तिचे यूट्यूब चॅनल लाँच केले आणि व्लॉग तयार करण्यास सुरुवात केली. तिच्या युट्युब चॅनलला मोठ्या संख्येने लोक फॉलो करतात. फराह खान हिच्यामुळे तिचा कुक दिलीप याला अल्पावधीतच मोठी ओळख मिळाली. तो एक सेलिब्रेटी झाला आहे. हेच नाही तर त्याला जाहिरातींमध्येही काम मिळत आहे.
काही दिवसांपूर्वीच फराह खान हिने मोठा खुलासा करत म्हटले की, मी चित्रपटांमुळे जेवढे पैसे कमावले नाहीत, त्यापेक्षा जास्त ब्लॉगिंगच्या माध्यमातून कमावत आहे. फराह खान हिच्यासोबत तिच्या प्रत्येक व्हिडीओमध्ये दिसणारा तिचा कूक दिलीप यालाही मोठे पैसे देते. आता दिलीप याचे नशीब उजाडले असून तो थेट बिग बॉसच्या घरात दिसणार असल्याची माहिती पुढे येतंय. होय तुम्ही अगदी खरे ऐकले असून दिलीप फराह खानचा कुक बिग बॉसच्या घरात दिसेल.
फराह खानच्या कुकची प्रसिद्धी इतकी वाढली की, फराह खान एखाद्या सेलिब्रिटीच्या घरी गेली तर फराहपेक्षा तिचा कुक दिलीप कुठे आहे असा सवाल लोक करतात. अगोदर दिलीप भेटतात आणि मग फराह खानला. हेच नाही तर आता मिळणाऱ्या प्रसिद्धीनंतर दिलीप हा मोठ्या प्रोजेक्ट्स हिस्सा बनण्याची तयारी करत आहे. बिग बॉस 19 मधील अभिषेक बजाज याच्याकडून दिलीपने बिग बॉसबद्दलची माहिती घेतली.
फराह खान हिने बिग बॉस 19 मधील सदस्य अभिषेक बजाज याच्यासोबत नवीन ब्लॉग तयार केला आहे. यादरम्यान फराह खान आणि दिलीप त्याच्या शोबद्दल बोलताना दिसले. अभिषेकला भेटल्यानंतर दिलीप चांगलाच उत्साही झाला. दिलीपने अभिषेकला म्हटले की, सर, मला पण काही टिप्स द्या. मला पण बिग बॉसच्या घरात जाणून स्वत:चे नशीब चमकावायचे आहे. यावेळी अभिषेक आणि दिलीप यांचे बोलणे फराह खान ऐकते. त्यावेळी फराह खान दिलीपला चांगलीच झाडताना दिसली.
