कधीकाळी ‘नॅशनल क्रश’ होती ही अभिनेत्री, या गाण्यामधील डान्समुळे मिळाली ओळख, पण सर्जरीने केलं करिअर उद्ध्वस्त
2004 मध्ये संजय दत्तसोबत दिसणारी ही अभिनेत्री बनली होती नॅशनल क्रश. ओ साकी साकी गाण्यामधील डान्समुळे एका रात्रीत झाली होती लोकप्रिय. पण एका चुकीमुळे करिअर झालं उद्ध्वस्त. कोण आहे ती अभिनेत्री? जाणून घ्या सविस्तर

2004 मध्ये चित्रपटगृहांमध्ये संजय दत्तसोबत एक तरुणी ‘ओ साकी साकी’च्या ठेक्यावर कंबर लचकवताच दिसली. तिला पाहून प्रेक्षक अक्षरशः वेडे झाले होते. त्यावेळी सर्वात मोठी पोस्टर गर्ल बनून ती तरुणी समोर आली होती. जिचे नाव कोएना मित्रा होते. कोलकात्यातील लेडी ब्रेबोर्न कॉलेजमधील अभ्यासू मुलीपासून ‘नॅशनल क्रश’ बनण्यापर्यंतचा तिचा प्रवास जितका झगमगता होता तितकाच तो संघर्षांनीही भरलेला होता.
कोएना मित्राचा जन्म 7 जानेवारी 1984 रोजी कोलकात्यातील एका सुसंस्कृत बंगाली कुटुंबात झाला. शिक्षण घेत असतानाच तिने मॉडेलिंगकडे वळण्याचा निर्णय घेतला. 2001 मध्ये ‘ग्लैडरैग्स मेगा मॉडल इंडिया’ हा किताब जिंकून तिने आपल्या करिअरचा पहिला मोठा टप्पा गाठला. केवळ सौंदर्यच नाही तर कोएना एक प्रशिक्षित बास्केटबॉल खेळाडू, जलतरणपटू आणि टेनिस प्लेअरही होती. या क्रीडापार्श्वभूमीमुळे तिच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळीच ‘अॅथलेटिक शार्पनेस’ दिसून येत होता.
यानंतर जर्मनीमध्ये झालेल्या ‘मिस इंटरकॉन्टिनेंटल’ स्पर्धेत टॉप 12 मध्ये स्थान मिळवून कोएनाने बंगाली सौंदर्य आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरही आपली छाप पाडू शकते हे सिद्ध केलं.
‘मुसाफिर’ने दिली ओळख
राम गोपाल वर्मा यांच्या ‘रोड’ चित्रपटात छोट्याशा भूमिकेनंतर कोएनाला खरी ओळख मिळाली ती ‘मुसाफिर’ चित्रपटातून. ‘ओ साकी साकी’मधील तिच्या धडाकेबाज डान्स मूव्ह्समुळे ती रातोरात प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली. त्यानंतर ‘एक खिलाड़ी एक हसीना’ आणि ‘अपना सपना मनी मनी’ यांसारख्या चित्रपटांतून तिने केवळ आयटम गर्ल नाही तर थ्रिलर आणि कॉमेडीमध्येही सक्षम अभिनेत्री असल्याचं दाखवून दिलं. फरदीन खानपासून अक्षय कुमारपर्यंत त्या काळातील अनेक मोठ्या कलाकारांसोबत तिने स्क्रीन शेअर केली.
2026 मध्ये नवी ओळख
2026 मध्ये कोएना मित्राची ओळख केवळ माजी अभिनेत्री म्हणून मर्यादित राहिलेली नाही. ती सोशल मीडियावर एक ठाम आणि आक्रमक मत मांडणारी व्यक्ती म्हणून ओळखली जात आहे. पश्चिम बंगालमधील अवैध घुसखोरीचा मुद्दा असो वा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न. कोएनाची डिजिटल सक्रियता आणि स्पष्ट भूमिका अनेकदा राजकीय नेत्यांनाही आव्हान देणारी ठरते.
एकेकाळी ग्लॅमरची प्रतीक असलेली कोएना मित्रा आज निर्भीड मतप्रदर्शन आणि संघर्षातून उभं राहिलेलं व्यक्तिमत्त्व म्हणून पुन्हा चर्चेत आहेत. तिची कहाणी ही केवळ यशाची नाही तर अपयश स्वीकारूनही स्वतःची ओळख नव्याने घडवण्याची प्रेरणादायी गोष्ट आहे.
