चित्रपटाच्या सेटवर बाॅलिवूडच्या ‘या’ अभिनेत्याला गंभीर दुखापत, व्हिडीओ पाहून चाहते हैराण, थेट पायाला
चित्रपटाच्या सेटवर बऱ्याच वेळा मोठे अपघात घडतात. यामध्ये अभिनेते आणि अभिनेत्रींना गंभीर दुखापत देखील होते. नुकताच बाॅलिवूडच्या अभिनेत्याला शूटिंग सुरू असताना मोठी दुखापत झालीये. या अभिनेत्याचे फोटो आणि व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत आल्याचे बघायला मिळतंय.

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) याचा काही दिवसांपूर्वीच बवाल हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटामध्ये वरुण धवन याच्यासोबत बोनी कपूरची लेक जान्हवी कपूर ही मुख्य भूमिकेत दिसली. विशेष म्हणजे वरुण धवन आणि जान्हवी कपूर या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना देखील दिसले. वरुण धवन याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. वरुण धवन हा सोशल मीडियाच्या माध्यमातूनही बवाल चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत होता. मात्र, वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांच्या बवालला खास धमाका करण्यात यश मिळाले नाही.
वरुण धवन याने एका मुलाखतीमध्ये जान्हवी कपूर हिच्याबद्दल मोठा खुलासा केला. वरुण धवन म्हणाला की, मी बवाल चित्रपटाच्या सेटवर सर्वांना बोलत होतो. फक्त मी काही महिने जान्हवी कपूर हिच्याकडे दुर्लक्ष केले. कारण काही सीनमध्ये व्यवस्थित करायचे होते. मी आणि जान्हवी कपूर खूप लवकर मित्र झालो असतो म्हणून मी तिला बोलणे टाळले. विशेष म्हणजे जान्हवी कपूर हिने देखील ही गोष्टी समजून घेतली.
वरुण धवन हा सध्या त्याच्या आगामी वीडी 18 या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. मात्र, नुकताच वरुण धवन याची पोस्ट पाहून त्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण हे बघायला मिळत आहे. कारण वरुण धवन याला मोठी दुखापत झालीये. वरुण धवन याने इंस्टा स्टोरीवर व्हिडीओ हा शेअर केला आहे. चित्रपटाच्या सेटवर त्याला ही दुखापत झालीये.
वरुण धवन याने आल्या पोस्टमध्ये म्हटले की, आजचा सेटवरील दिवस खूप जास्त अवघड होता. सेटवर दुखापत झाली. मात्र, कशी झाली हे मलाच त्यावेळी समजले नाही. आता आईस थेरेपी करत आहे. वरुण धवन याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याचा पाय बर्फामध्ये ठेवलेला दिसत आहे. यावरून हे स्पष्ट होत आहे की, वरुण धवन याला त्रास होतोय.
वरुण धवन याचे चाहते त्याला काळजी घेण्याचा सल्ला देताना दिसत आहेत. वरुण धवन याच्या वीडी 18 चित्रपटामध्ये भरपूर अॅक्शन आणि ड्रामा बघायला मिळणार आहे. वरुण धवन याचे चाहते हे त्याच्या वीडी 18 चित्रपटाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. विशेष म्हणजे अशी चर्चा आहे की, वीडी 18 मध्ये वरुण धवन हटके भूमिकेत दिसणार आहे. वरुण धवन याचा हा चित्रपट 2024 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
