सवतही व्हायचं नव्हतं आणि कोणाचं घरही तोडायचं नव्हतं…, वयाच्या 83 व्या वर्षी अभिनेत्री आजही एकटीच
Love Life : आमिर खानच्या काकांसोबत प्रेमसंबंध, पण अभिनेत्री वयाच्या 83 व्या वर्षी देखील एकटीच... म्हणाली, 'कोणाचं घर देखील तोडयचं नव्हतं आणि कोणाची सवतही व्हायचं नव्हतं...', कायम सुरु असते अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा

Love Life : बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आजपर्यंत लग्न केलं नाही. अभिनेत्रींच्या आयुष्यात कोणत्या पुरुषाची एन्ट्री झाली नाही, असं नाही पण त्यांनी कधीच लग्न करण्याचा निर्णय घेतला. एक काळ हिंदी सिनेविश्व गाजवणाऱ्या काही अभिनेत्री आजही एकट्याच आहेत. बॉलिवूडमध्ये अशीच एक अभिनेत्री होती, तिचं नाव अभिनेता आमिर खान याच्या काकांसोबत जोडण्यात आलं होतं. पण अभिनेत्रीला कधीच संसार थाटता आला नाही. सध्या ज्या अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री आशा आशा पारेख (Asha Parekh) आहेत. त्यांच्या चाहत्यांची संख्या आजही प्रचंड मोठी आहे.
आशा पारेख यांनी का नाही केलं लग्न?
आशा पारेख एका मॅगझिनसोबत संवाद साधताना म्हणाल्या होत्या, ‘लग्न म्हणजे इंद्रधनुष्य आणि फुलपाखरांसारखं नाही. कधी कधी तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे हट्ट पुरवावे लागतात. हे दोन्ही बाजूंनी असतं आणि लग्न न केल्याचा मला पश्चाताप नाही. आईने सांगितलं म्हणून, मी अनेक मुलांनी भेटली आहे. त्यामुळे लग्नावून माझं पूर्ण मन उडालं होतं. ज्या मुलांना मी भेटली त्या मुलांचे खूप नखरे होते. तयार होण्यासाठी त्यांना माझ्यापेक्षा अधिक वेळ लागत होता. त्याचं स्वतःवर प्रेम करणं मला आवडत नव्हतं. मला माहिती आहे हे विचित्र आहे. पण एक गोष्ट मला कायम त्रास देते… माझे को-स्टार राजेश खन्ना आणि विनोद खन्ना यांचा देखील एक किस्सा आहे, जेव्हा त्यांच्या गर्लफ्रेंड त्यांना खूप ओरडल्या होत्या. कारण, दोघे रात्रभर बाहेर फिरत होते.’ असं आशा पारेख म्हणाल्या होत्या.
नासिर हुसैन यांच्या प्रेमात होत्या आशा पारेख
फार कमी लोकांना माहिती आहे की, एक काळ असा होता जेव्हा, आशा पारेख आणि नासिर हुसैन यांच्या प्रेमाच्या चर्चांनी जोर धरला होता. पारेख म्हणालेल्या, ‘मला कोणाचं घर तोडायचं नव्हत आणि मला कोणाची सवत देखील व्हायचं नव्हतं… मी नासिर यांची लेक नुसरत आणि नातू इमरान यांना बूक लॉन्च दरम्यान पाहिलं होतं, तेव्हा मला खूप आनंद झालेला.. मला असं वाटतं मी कोणाल दुःख न पोहोचवता माझं आयुष्याचा आनंद घेतला आहे.’ असं देखील आशा पारेख म्हणालेल्या होत्या.
आशा पारेख यांच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, ‘पतंग’, ‘कटी पतंग’, ‘तीसरी मंजील’, ‘लव्ह इन टोक्या’ यांसारख्या सिनेमांसाठी आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. आशा पारेख त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिल्या. त्यांनी कधीच लग्न करण्याचा निर्णय घेतला. आज वयाच्या 83 व्या वर्षी देखील त्या एकट्याच आहेत.
