पाकिस्तानी अभिनेत्रीचे 2 भारतीय, तर 2 पाकिस्तानी नवरे, ‘ती’ गुपचूप उरकायची लग्न
Actress Married Life: 2 भारतीय, तर 2 पाकिस्तानी नवरे असलेली 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री आता कसं जगतेय पाकिस्तानमध्ये आयुष्या, तुम्हालाही जाणून बसेल मोठा धक्का..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा...

Actress Married Life: भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर, भारताने पाकिस्तानला चेतावणी दिली की जर त्यांनी दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवले नाही, तर भारत पुन्हा लष्करी कारवाई करेल… अशी चेतावनी पाकिस्तानला देण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील वाढता तणाव पाहता पाकिस्तानी कलाकारांना देखील भारतात बॅन केलं आहे. पण एक अशी पाकिस्कानी अभिनेत्री आहे जिने एक दोन नाही तर, चार लग्न केले. त्यामधील अभिनेत्रीचे अभिनेत्रीचे 2 भारतीय, तर 2 पाकिस्तानी आहेत.
सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी कोणी नसून 1991 मध्ये दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्या ‘हीना’ सिनेमा तून पदार्पण करणारी झेबा बख्तियार आहे. झेबा बख्तियार यांनी ‘हिना’सारख्या दमदार सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, मात्र आज त्या चित्रपटसृष्टीपासून दूर आहेत.
सांगायचं झालं तर, राज कपूर यांनी झेबा यांना एका शोमध्ये पाहिलं होतं आणि झेबाला पाहताच आगामी सिनेमासाठी अभिनेत्रीला कास्ट करण्याचा निर्णय घेतला. सुमारे 33 वर्षांपूर्वी आलेल्या ‘हिना’ या सिनेमात त्यांनी ऋषी कपूर यांच्यासोबत काम केलं. झेबा बख्तियार या एक पाकिस्तानी अभिनेत्री आहेत, ज्यांनी आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकली.
झेबा बख्तियार ‘हिना’ सिनेमानंतर एका रात्रीत स्टार बनल्या. त्यानंतर झेबा यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं. पण त्यांना यश मिळालं नाही. ‘हिना’ सिनेमानंतर झेबा यांनी ‘जय विक्रांता’, ‘मोहब्बत की आरजू’, ‘चाफ साहिब’, ‘सरगम’ आणि ‘मुकदमा’ यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं. अनेत टीव्ही शोमध्ये देखील त्या दिसल्या. पण यश मिळालं नाही.
झेबा बख्तियार यांचं खासगी आयुष्य…
झेबा बख्तियारच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झाले तर, त्यांनी चार विवाह केलेत पाकिस्तानमध्ये छोट्या पडद्यावरून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या झेबा बख्तियारचं खरं नाव शाहीन होतं. त्या पाकिस्तानमधील प्रसिद्ध राजकारणी आणि माजी अटॉर्नी जनरल याह्या बख्तियार यांची कन्या आहेत.
झेबा यांनी पहिली लग्न क्वेटा येथील सलमान वल्लियानी यांच्याशी केली होती. दुसरं लग्न त्यांनी अभिनेता जावेद जाफरी यांच्याशी केलं. त्यानंतर त्यांनी गायक अदनान सामी यांच्याशी तिसरं लग्न केलं, आणि त्यांच्यापासून त्यांना अजान सामी खान हा मुलगा आहे.
अजान हा आता पाकिस्तानी मनोरंजन क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव आहे. झेबा यांच्या चौथ्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी चौथं लग्न सोहेल खान लेघारी यांच्यासोबत केलं. आता झेबा पाकिस्तानात राहतात. गेल्या अनेक वर्षांपासून त्या झगमगत्या विश्वापासून दूर आहेत.