AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तिघी’ची आंतरराष्ट्रीय झेप; मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बाब

सोनाली कुलकर्णी, भारती आचरेकर आणि नेहा पेंडसे यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'तिघी' या चित्रपटाची न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये क्लोजिंग चित्रपट म्हणून निवड करण्यात आली आहे.

'तिघी'ची आंतरराष्ट्रीय झेप; मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बाब
TighiImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 10, 2026 | 3:57 PM
Share

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘तिघी’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू असून, प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा चित्रपट अजूनही चित्रपटगृहात यशस्वीपणे सुरू आहे. आशयघन कथा, दमदार अभिनय आणि प्रभावी भावनिक मांडणी यामुळे ‘तिघी’ने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. आता या यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, ‘तिघी’ची प्रतिष्ठित न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल 2026 (NYIFF) मध्ये क्लोजिंग फिल्म म्हणून निवड करण्यात आली आहे. ‘तिघी’ क्लोजिंग नाईट फिल्म म्हणून जाहीर करण्यात आलं असून, या घोषणेमुळे चित्रपटाच्या यशात आणखी भर पडली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेली ही दखल मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.

आई-मुलीच्या नात्यांतील गुंतागुंत, त्यांच्या मनात दडलेले भावविश्व, न बोललेले संवाद आणि काळानुसार बदलणारे नाते या सगळ्यांचा अत्यंत सूक्ष्म आणि वास्तववादी वेध या चित्रपटात घेतला आहे. कलाकारांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा आणि त्यांची नैसर्गिक अभिनयशैली यामुळे ‘तिघी’ला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. आई-मुलीच्या नात्यातील भावना सार्वत्रिक असतात. त्यामुळे मुंबई असो किंवा न्यूयॉर्क, या चित्रपटाची कथा जगभरातील प्रेक्षकांना जोडते आणि आपलीशी वाटते.

यापूर्वी या संचाच्या ‘पुणे 52’, ‘जून’, ‘गोदावरी’ आणि ‘रावसाहेब’ या चित्रपटांनी एनवायआयएफएफमध्ये आपली छाप पाडली होती. आता ‘तिघी’ हा चित्रपट या प्रतिष्ठित महोत्सवात दाखल होणारा त्यांचा पाचवा चित्रपट ठरला आहे. एनवायआयएफएफने सातत्याने त्यांच्या आशयप्रधान चित्रपटांना व्यासपीठ दिले असून, यंदा ‘तिघी’ला क्लोजिंग फिल्मचा मान देत ही परंपरा अधिक दृढ केली आहे.

याबद्दल दिग्दर्शिका जीजिविषा काळे म्हणतात, “एनवायआयएफ सारख्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘तिघी’ची क्लोजिंग फिल्म म्हणून निवड होणे ही आमच्यासाठी खूप मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे. हा चित्रपट अतिशय वैयक्तिक आणि मनाला भिडणाऱ्या नात्यांवर आधारित आहे. प्रेक्षकांनी त्याला दिलेलं प्रेम आमच्यासाठी खूप खास आहे. एनवायआयएफएफने याआधी आमच्या चित्रपटांना दिलेल्या व्यासपीठानंतर, ‘तिघी’ला मिळालेला हा सन्मान आमच्यासाठी आणखी खास आणि भावनिक आहे.”

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...