63 वर्षांचा हा सुपरस्टार चौथ्यांदा लग्न करणार; 26 वर्षांनी लहान अभिनेत्रीशी थेट अंतराळात बांधणार लग्नगाठ?
एक सुपरस्टार अभिनेता चक्क वयाच्या 63 व्या वर्षी चौथ्यांदा लग्न करणार आहे. तेही त्याच्यापेक्षा 26 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत. तसेच हे लग्न थेट अंतराळात करणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे नक्कीच त्यांच्या चाहत्यांसाठी हे मोठं सरप्राईज असणार आहे.

आजकाल सेलिब्रिटी वयाच्या कोणत्याही वर्षी लग्न करतात. अगदी पन्नाशीपासून ते वयाच्या साठीतही लग्नगाठ बांधताना दिसतात तेही त्यांच्यापेक्षा कितीतरी लहान वयाच्या अभिनेत्रीसोबत. आताही अशाच एका अभिनेत्याची चर्चा होताना दिसत आहे. कारण हा सुपरस्टार अभिनेता चक्क वयाच्या 63 व्या वर्षी चौथ्यांदा लग्नगाठ बांधणार आहे तेही त्याच्यापेक्षा 26 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत.
अभिनेत्याच्या डेटिंगच्या बातम्या बऱ्याच काळापासून पसरत होत्या
दरम्यान या अभिनेत्याच्या डेटिंगच्या बातम्या बऱ्याच काळापासून पसरत होत्या. पण आता त्याच्या नात्यावर आणि लग्नावर शिक्कामोर्तब झालं आहे. हा अभिनेता म्हणजे हॉलिवूडचा सुपरस्टार ज्याची क्रेझ भारतातही पाहायला मिळते तो म्हणजे टॉम क्रूझ. एका वृत्तानुसार, तो लवकरच हॉलिवूड अभिनेत्री अना डे आर्माससोबत लग्न करणार आहे. तथापि यावर या जोडीने कोणतेही भाष्य केलेलं नाही.
वयाच्या ६३ व्या वर्षी ती अंतराळात लग्न करणार?
एका वृत्तानुसार, टॉम क्रूझ आणि अॅना डी आर्मास लग्न करणार असून त्यांना त्यांचे लग्न हे चित्रपटासारखे थ्रील बनवायचे आहे. म्हणजे सूत्रांनुसार त्यांना “त्या दोघांनाही साहस आणि थरार आवडतो. म्हणून, त्यांना असे लग्न हवे आहे जे या आवडीचे प्रतिबिंबित करेल.” टॉमला अंतराळ प्रवासाची आवड आहे आणि तो अंतराळात लग्न करण्याचा विचारही करू शकतो.” स्कायडायव्हिंग करताना ते एकमेकांसोबत राहण्याची, म्हणजे लग्नाची शपथ घेण्याचीही चर्चा सुरु आहे. तसेच सूत्राने पुढे म्हटले आहे की, “ते जे काही करतील ते नेहमीपेक्षा खूप वेगळे असेल एवढं नक्की.” जुलैमध्ये जेव्हा त्यांना एकत्र फिरताना पाहिले गेले तेव्हा दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.
View this post on Instagram
अभिनेत्याचे याआधी तीन लग्न झालेत
63 वर्षीय टॉम क्रूझने यापूर्वी तीन लग्न केले आहेत. त्याने मिमी रॉजर्स, निकोल किडमन आणि केटी होम्सशी लग्न केले होते. तथापि, त्याने तिघांनाही घटस्फोट दिला. एका सूत्रानुसार, “टॉम जेव्हा पहिल्यांदा केटीच्या प्रेमात पडला तेव्हा तो जितका उत्साहित होता तितकाच तो आताही चौथं लग्न करताना उत्साहित आहे, कदाचित त्याहूनही अधिक. पण तो ते लपवण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून लोक त्याच्यावर टीका करू नयेत.” टॉम आणि अॅना यांचे लग्न हे त्यांच्या चाहत्यांसाठी नक्कीच एक मोठं सरप्राईज असणार आहे.
