AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यशच्या ‘टॉक्सिक’च्या प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर; श्रद्धा कपूरच्या ‘ईथा’शी होणार बॉक्स ऑफिसवर सामना

बहुप्रतीक्षित टॉक्सिक चित्रपटाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. फादर्स डेच्या निमित्ताने यशने या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. कधी होणार प्रदर्शित? जाणून घ्या सविस्तर

यशच्या ‘टॉक्सिक’च्या प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर; श्रद्धा कपूरच्या ‘ईथा’शी होणार बॉक्स ऑफिसवर सामना
| Updated on: Jun 21, 2026 | 12:44 PM
Share

दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार यशच्या बहुप्रतीक्षित ‘टॉक्सिक’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. सुरुवातीला हा चित्रपट मार्च महिन्यात प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जात होते, मात्र काही कारणांमुळे त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. आता अखेर चित्रपटाची नवी अधिकृत रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.

फादर्स डेच्या निमित्ताने यशने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चित्रपटाच्या नव्या प्रदर्शन तारखेची घोषणा केली. त्यानुसार ‘टॉक्सिक’ हा चित्रपट 26 ऑगस्ट 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. रिलीज डेटची निवड अत्यंत विचारपूर्वक करण्यात आल्याचे बोलले जात आहे. ऑगस्टच्या अखेरीस सणासुदीचे वातावरण असणार असल्याने चित्रपटाला त्याचा मोठा फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच काळात वरमहालक्ष्मी व्रत, ओणम आणि रक्षाबंधन यांसारखे महत्त्वाचे सण येत असल्याने प्रेक्षकांची चित्रपटगृहांकडे गर्दी वाढण्याची अपेक्षा आहे.

श्रद्धा कपूरच्या ‘ईथा’शी थेट टक्कर

‘टॉक्सिक’च्या प्रदर्शनासोबतच बॉक्स ऑफिसवर आणखी एक मोठा संघर्ष पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूर हिचा आगामी ‘ईथा’ हा चित्रपट 28 ऑगस्ट 2026 रोजी, म्हणजेच ‘टॉक्सिक’च्या प्रदर्शनानंतर अवघ्या दोन दिवसांनी प्रदर्शित होणार आहे.

रक्षाबंधनच्या सणाच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित होणाऱ्या ‘ईथा’लाही सणासुदीच्या वातावरणाचा फायदा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, यशसारख्या मोठ्या स्टारच्या ‘टॉक्सिक’शी थेट स्पर्धा असल्याने ‘ईथा’समोर आव्हान उभे राहू शकते.

View this post on Instagram

A post shared by Yash (@thenameisyash)

‘ईथा’चा टीझर चर्चेत

दरम्यान, ‘ईथा’ चित्रपटाचा टीझर ऑनलाइन लीक झाल्याची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर या टीझरला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.

‘केजीएफ’ मालिकेनंतर यशच्या पुढील मोठ्या चित्रपटाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे ‘टॉक्सिक’च्या प्रदर्शनाची घोषणा होताच चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे श्रद्धा कपूरच्या ‘ईथा’बाबतही प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. आता ऑगस्ट 2026 मध्ये बॉक्स ऑफिसवर ‘टॉक्सिक’ आणि ‘ईथा’ यांच्यातील लढतीत कोणता चित्रपट बाजी मारतो, याकडे संपूर्ण चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला